Dictionaries | References

ति

   
Script: Devanagari

ति

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Three. Only as a prefix. Ex. तिमज- ला, तिकोनी Of three stories or corners.

ति

 वि.  ( प्र . ) तीन ; संख्यावाचक उपसर्ग , प्रत्यय ; जसेः - तिमजला , तिकोनी = तीन मजल्यांचा , तीन कोपर्‍यांचा . [ सं . त्रिः ; प्रा . ति ] सामाशब्द - तिकटणे - न . १ शेतामध्ये तीन बांध ( वरोळ्या ) एका ठिकाणी असतात ते ठिकाण . २ तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण . ३ तीन काठ्या वगैरे एकत्र बांधून केलेली रचना ; तिकटी . [ त्रिकूट ] तिकटी - स्त्री . १ तीन काठ्या जुळवून केलेली एक त्रिकोणाकृति रचना . २ त्रिकोण . [ सं . त्रिकाष्ठ ; प्रा . तिकठ्ठ . त्रिकूट ] तिकटे - न . १ लांकडी त्रिकोण ( स्मशानांत अग्नि नेण्यासाठी , विहिरीतून पदार्थ काढण्यासाठी इ० केलेला तीन कामट्या , लांकडे यांचा ). २ त्रिदळ ; त्रिखंड पान ( पळस , बेल , निगुडी इ० चे ). ३ तीन पानांची पत्रावळ . ४ ( पंढरपूरकडे ) तिफण ; तीन नळकांड्यांची पाभर . ५ लाकडाची तिवई . ( गो . ) तीन काठ्यांची घडवंची .[ सं . त्रिकाष्ठ ; प्रा . तिकठ्ठ . तुल . त्रिकूट ] तिकडी - वि . तीन कड्यांची . जै कही अवचटे । हे तिकडी सांखळ तुटे । - ज्ञा १६ . ४ . ३८ . [ ति = तीन + कडी ] तिकळा - ळी - ळे - वि . तिखुळा पहा . तिकांडी - स्त्री . एक गवत . तिकांडी घोडेकुसळी । - गीता २ . ५२८६ . [ ति = तीन + कांडे = पेर ] तिकांडे - ड्या - न . मृगशीर्ष नक्षत्रपुंजातील तीन तारे ; शिवाचा बाण . लुब्धक पहा . [ सं . त्रिकांड ] तिकुटी - स्त्री . त्रयी ; तिघांची जोडी ; त्रिकूट . गुणी देवां त्रयी लाविली । गुणी लोकी तिकुटी पाडिली । - माज्ञा १८ . ८१७ . [ सं . त्रिकूट ] तिकोनी - वि . तीन कोपर्‍यांचा - कोरांचा - कोनांचा . [ सं . त्रिकोण ] तिक्कई - स्त्री . तिर्खई ; एकदम तीन तीन खडे घेऊन सागरगोटे ; खडे इ० खेळण्याचा मुलींचा खेळ . याप्रमाणे दुर्खई ; पांचखई इ० संज्ञा . [ सं . त्रिक ; म . तिक + ई प्रत्यय ] तिक्कल - स्त्री . गंजिफांच्या खेळांत अनुक्रमाने लागलेली एकाकडे आलेली तीन पाने . तिक्का - पु . तीन चिन्हे असलेले गंजिफांचे पान ; तिव्वा . तिखणी - स्त्री . ( घराचे ) तीन खण , भाग . - वि . तीन खण असलेले ; तीन खणी ( घर इ० ). [ ति = तीन + खण ] तिखळा - ळी - ळे - तिखुळा - ळी - ळे पहा . तिखुळा - ळी - ळे - वि . तीन खण असलेले ; तीन मुलगे अथवा मुलीच्या पाठीवर झालेला ( मुलगा , मुलगी किंवा सामान्यतः मूल ). तिगस्त - न . १ गेल्या वर्षाच्या मागचे वर्ष . तिगस्त बाकी - वहिवाट इ० . २ गंजिफांच्या खेळांतील एक संज्ञा , डांवातील एक विशिष्ट काल ; गंजिफांच्या खेळांत तिन्ही खेळणारांचा एक तरी हात होणे . [ तीन + फा . गस्त = गत ] तिगस्तां - क्रिवि . गेल्याच्या मागील साली . [ तिगस्त ] तिगुण - वि . १ त्रिगुण . २ तिप्पट . [ सं . त्रिगुण अप . ] तिगुणी - वि . १ तिहेरी ; त्रिगुणात्मक . जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणीया । अहंकाररज्जु । - ज्ञा १८ . ९१५ . तिघई - वि , तीन गस्ते असलेले , एकापुढे एक तीन वठारे असलेले ( घर ). तिघड - पु . ( राजा ) तीन आंबे , नारळ इ०चा घड . तिघड - वि . ( को . ) दर तीन लोटे बांधून झाले म्हणजे एक खापेकडाची जुळी वगळावी अशा रीतीने लोटे बांधलेली ( रहाटाची माळ ). - क्रिवि . माळ तिघड होईल अशा रीतीने ( बांधणे ). तिघडी - स्त्री . १ तिहेरी घडी ( कापड , कागद इ० ची ). २ तिहेरी घडी घातलेली , तिपदरी वस्तु . - वि . तीन घड्या घातलेली . [ ति = तीन + घडी ] तिघस्त - न . तिगस्त अर्थ २ पहा . तिजवर - पु . १ तिसर्‍यांदा लग्न करीत असलेला माणूस . २ तीन लग्ने लेलेला मनुष्य . [ तीजा + वर ] तिघारा - री - वि . १ तीन धारा - कडा असलेला . तिधारां अंदु फीटलियां । चरणीचिआ । - शिशु ७१६ . २ तीन कांठ किंवा काड्या असलेले ( धोतर इ० ). [ ति + धारा ] तिधारी निवडुंग - पुन . एक जातीचा निवडुंग . याच्या पेरास तीन कांट्यांच्या रांगा असतात ; याच्या उलट फड्यानिवडुंग . तिधारे - न . नकसगाराचे एक हत्यार . तिपट - वि . ( सामा . ) तिप्पट पहा . तिपटी - स्त्री . तिप्पट संख्या अथवा परिमाण . तिपडे - न . ( नाट्य ) बकर्‍याचे केस वळून गंगावनाच्या आकाराची स्त्री नटाकरितां तयार केलेली तीनपदरी वेणी . - पौराणिक नाटकाचा काळ . तिपदरी - वि . तीन घड्यांचे किंवा तीन पदर असलेले ( कापड ; दोर इ० ). तिपाई - ( व . ) तीन पायांची घडवंची ; तिवई . ( बिडाचा कारखाना ) डेरा तयार करण्यासाठी मातीत रोवण्याचे लाकडी धीरे व गोलाकार लोखंडी गज . तिपाठी - वि . तीन वेळां वाचून , ऐकून पाठ म्हणणारा . तिपांडी - स्त्री . ( को . ) तीन पांड भातजमीनीची प्रत्येक वीस पांडांच्या बिघ्यामागे रयतेस दिलेली जमीनीची सूट . - वगु ४ . १ . - वि . तीन पाने असलेले ; त्रिदल ( झाड , अंकुर ). [ सं . त्रिपर्णी ] तिपायी - स्त्री . तिवई . - वि . तीन पाय असलेले ( जनावर ; वस्तु ). [ तीन + पाय ] तिपिकी - वि . १ वर्षातील पिके देणारी ( जमीन ). तिपुडी - वि . १ तीन कप्पे , खण असणारी ( पेटी ). २ तीन पूड असलेला मृदंग . [ सं . तिपुटी ] तिपेडणे - सक्रि . तीन पेड देणे ; वळणे . तिपेडी - ढी - वि . तीन पेडांनी केलेली ( दोरी , वेणी इ० ). तिपेरी - स्त्री . नाचणीची एक हळवी जात . हिच्या काडास तीन पेरे आली म्हणजे कणीस येते . वि . तीन सांधे , पेरी असलेले ( बोट इ० ). तिप्पट - स्त्री . तीन पट संख्या ; तिप्पटपणा . - वि . १ तीनदां जमेस धरलेली ( संख्या ) त्रिगुणित . २ तीन घड्यांचे ; तिपदरी ( कापड इ० ) तिफण - णी - न . स्त्री . तीन पट संख्या ; तिप्पटपणाअ . - वि . १ तीनदा जमेस धरलेली ( संख्या ) त्रिगुणित . २ तीन घड्यांचे ; तिपदरी ( कापड इ० ) तिफण - णी - न . स्त्री . तीन नळ्या , फण असलेली पाभर , पेरण्याचे यंत्र . [ ति + फण ] तिफण - स्त्री . ( व . ) चार एकर ( जमीन ). तिफांटा - पु . जेथे रस्ता , नदी किंवा झाडाच्या खोड्याच्या तीन बाजूस फुटतात ती जागा . तिफांशी - सी - वि . १ तीन फाशांना खेळावयाचा ( सोंगट्याचा एक खेळ ). २ तीन फाशांनी युक्त ( दोरी इ० ). [ ति + फास ] तिबक - स्त्री . खेळांत विटी उडली असतां खाली पडण्यापूर्वी दांडूने तीनदां मारणे . हबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडूं । खेळ विटी दांडू । - भज ११३ . [ ति + ध्व . बक ? ] तिबंदी - स्त्री . दोन वरखां ( पानां ) चा एक बंद याप्रमाणे तीन बंदांची केलेली कागदाची घडी . तिब्राद - वि . ( पोर्तु . ) तिप्पट . [ पोर्तु . त्रेस्दो ब्रादो ] तिमजला - ली - वि . १ तीन मजल्यांची ( इमारत ). २ तीन , तिहेरी काठांचा ( शेला , धोतर इ० ). ३ तीन तळ ( डेक ) असलेले ( जहाज ). तिय्यम - वि . तिसर्‍या दर्जाचे . दुय्यम , तिय्यम अधिकारी . - सूर्यग्न ३४ . तिय्या - पुस्त्री . ( पत्त्यांचा खेळ ). तिर्री ; तीन ठिपक्यांचे पान . [ ति = तीन ] तिरकानी - रेघ - ओळ - स्त्री . कागदाच्या पाडलेल्या चार मोडीपैकी तीन मोडींमध्ये काढलेली रेघ . [ सं . त्रि - तिर + कान , रेघ ] तिवई - स्त्री . १ तीन पायांची घडवंची ; तिपाई . २ ( को . ) तिवटे ; भाताची रोपे उपटतांना शेतांत बसण्यासाठी घेतात ती पायांची तीन घडवंची . तिपाई पहा . [ सं . त्रिपदी ; प्रा . तिवई ] तिवटणा - ( महानु ) तीन वा‍टा मिळतात ती जागा ; चौक ; नाका ; तिवठा . कलियुगाचा तिवटणां . - भाए १०९ . [ सं . त्रि + वर्त्मन ; प्रा . तिवट्ट ] तिवट - स्त्री . ( गो . को . ) अवयवाची वक्रता . पाय तिवटी पडला . [ सं . त्रिवर्कि ; प्रा . तिवट्टि ] तिवटे - वितई अर्थ २ पहा . तिवठा - पु . १ तीन रस्ते मिळतात ती जागा . २ तिवडा अर्थ १ , २ पहा . [ सं . त्रि + वर्त्मन ; प्रा . तिवट्ट ] तिवडा , तिवंडा - पु . १ मळणी करण्याकरितां खळ्याच्या मध्यभागी पुरलेला खांब . हनुमंत तिवडा मध्ये बळे । पुच्छ पाथी फिरवितसे । - रावि २० . १९५ . ३ शेतांत धान्य वारवण्यासाठी उपयोगांत आणावयाची एक तीन पायाची घडवंची . ३ एक ताल अथवा गति . [ सं . त्रि + पद ] तिवण - १ त्रिदळ . २ तिहेरी घडी , पदर ( कापड , कागद वगैरे ). तिवणा - वि . तीन पानांचा ; त्रिदळ . त्रिविध अहंकारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे । - ज्ञा १५ . ९५ . - एभा ११ . १८८ . [ सं . त्रिपर्ण ; प्रा . तिवण्ण ] तिवंधा - पु . अनेक गांवांच्या सीमा ज्या ठिकाणी मिळतात ती जागा . [ सं . त्रि + बंध किंवा वृंद ; प्रा . तिबंद ] तिवनी - स्त्री . ( व . ) ( पळसाचे ) त्रिदळ ; तिवण . तिवने - न . तिघांचा समुदाय . तिवने - वि . तीन पानांचे . तिवण - णा पहा . [ सं . त्रिपर्ण ; प्रा . तिवण्ण ] तिवल - पु . ( तीन वेळ ) दीड आणा . [ तीन + वेळ = अर्धा आणा ] तिवळी - स्त्री . ( गो . ) पोटावर पडणारी तीन वळ्यांची आठी . त्रिवळी पहा . [ सं . त्रि + वली ] तिंवा - पु . ( गो . ) दगडाचा अगर मातीचा केलेला चुलीचा पाय . २ तिव्हा ; तिवई ; तिनपायी ; तिवारी ( ज्यावर उभे राहून उपणतात ती ). तिवडा अर्थ २ पहा . [ सं . त्रि + पदा ; प्रा . तिवय ] तिवाट - ठा - पु . तीन रस्ते एकत्र मिळण्याची जागा . तिवठा पहा . फाटाफूट ; ऐक्यभंग . केला तुवां देखत भर्तृघात । क्षणे तिवाटा रचिल्या तिघांत । - वामन , भरतभाव ७ . [ त्रि + वर्त्मन ; प्रा . तिवट्ट ; म . तिवाट ] तिवारा - पु . ( माळवी ) तीन दारे असलेला दिवाणखाना . [ सं . त्रि + द्वारिका ; प्रा . ति + वारिआ ; हिं . तिबारा ] तिवारी - स्त्री . ( व . ) तिवडा अर्थ २ पहा . तिन पायी ( जीवर उभे राहून उपणतात ती ) तिवा पहा . तिवाशी - वि . तीन वाशांचे केलेले ( घर , खोपट इ० उपहासार्थी ). [ तीन + वांसा ] तिवाळ - स्त्री . एकसंध विणलेले तीन पंचे ; तीन पंच्यांचे कापड ; चवाळे पहा . तिवाळी - स्त्री . एक कापडाची जात . - मुंब्या १२३ [ ति + आळे ] तिवेती - वेत - वि . तीनदां व्यायलेली ( गाय इ० ) [ ति + वेत ] तिवेळा - ळां - ळी - क्रिवि . तिन्हीवेळां ; सकाळी , दुपारी , संध्याकाळी ; त्रिकाळ . तिव्वा - वा - पु . ( गंजिफा , पत्त्यांचा खेळ ) तिर्री ; तीन ठिपके असलेले पान . तिव्हडा , तिव्हा - पु . तिवडा अर्थ २ पहा . तिव्हाळ - पु . ( महानु . ) तीन रस्ते एकत्र होतात ती जागा ; तिवाठा . तेथचि तिव्हाळां प्रकासदर्शन । - ऋ ११४ . तिशिंगी - वि . तीन शिंगांचा ( पशु ). [ तीन + शिंग ] तिशेंड्या - पु . ( डोक्यावरच्या तीन शेंड्यांवरुन ) मारवाडी ( निंदाव्यंजक शब्द ). [ ति + शेंडी ] तिसड - स्त्री . १ तीन वेळां अथवा तिसर्‍यांदा तांदूळ कांडणे . तिसडीने सडणे . २ ( ल . ) बारीक चौकशी ; छडा . [ तीन + सडणे ] तिंसड - डा - डी - वि . तीन वेळ सडलेले ( तांदूळ ). [ ति = तीन + सडणे ] तिसढ - स्त्री . तिसर्‍यानदा करणे ( काम इ० ) तिसड - वि . तीन थानांचे ( जनावर ). [ तीन + सड ] तिखाला - लां - विक्रिवि . लागोपाठ तीन वर्षांसबंधी ; तीन वर्षांकरिता ; त्रैवार्षिक ( हिशेब , बाकी इ० ). [ हिं . ] तिसरणी , तिसारणी - स्त्री . तिसारणे पासून धातुसाधित नाम . - क्रिवि . तिसर्‍यांदा करणे . - अक्रि . ( कोंबडा ) तिसर्‍यांदा आरवणे . [ तिसरा ] तिसुती - स्त्री . १ तिहेरी , तीन पदरी - फेरी दोरा ; दोरी ( जानवे इ० चा ). तिसुतीला पीळ भरुन झाला आहे , आतां नऊसुती करावयाची आहे . २ तीन कुटुंबांचा आपापसांतील लग्नसंबंध . तिरकूट अर्थ ३ पहा . - वि . तीन सुतांची , धाग्यांची , पदरांची ( दोरी ). [ तीन + सुती ] तिस्ती - स्त्री . ( प्र . ) तिसुती . ( को . ) ( जानव्याचे ) पातीवर मोजलेले सूत गुंडाळून ठेवतात ती गुंडाळी . [ सं . त्रि + सूत्र , त्रिसूती ] त्रिहोत्रा - पु . दरमहा दरशेकडा तीन असा व्याजाचा दर . [ तीन + उत्तर ]

ति

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
ति   for इ॑ति (after का॑), [ŚBr. xi, 6, 1, 3 ff.]

Related Words

ति   गत्य्   जात्य्   क्षितीगर्भ   ज्योतिःष्टोम   चतुर्विंशतिम   धृतसिंह   देवभूरि   नात्य्   ever-restless   कूण   दूति   तन्ती   पिण्डभृति   प्रदेशवर्तिन्   light footed   forgetful   गतधृति   सम्भूतविजय   सहस्रमूति   सांनिपातिन्   सप्ताविंशति   शतमूति   semi-lunar   single-minded   slouching   false-hearted   base-minded   गर्भघातिन्   जातीपत्त्री   दिम्भ्   तृणय   बीजविवृति   ब्रह्मस्तुति   नियुध्   परिदीप्   परिशॄ   परिस्पन्द्   प्रत्युपे   प्रेतिवत्   प्रेतीषणि   stiff-necked   suicidal   brainless   brainsick   branny   campaniform   lunated   doltish   chuffy   clouterly   free-born   good-humoured   saturnine   ill-natured   globate   good-natured   semicircular   fatuous   ज्योतीरथा   तिटाळी   दूरपातिन्   mindless   natured   gemmy   glomerous   उपपरे   उपसमे   कन्ति   गौरिवीत   विद्याधरमहाचक्रवर्तिन्   सम्प्रसञ्ज्   सम्प्रे   सांनिवेशिक   समनुपद्   समभिभाष्   समभ्यवे   समभ्युपे   समभ्ये   समानजाति   षातिन्   व्यवगाह्   व्युपे   शपथीय   अनुपर्ये   shaky   skipping   slily   अपघातिन्   अयतिन्   अर्द्धचन्द्राकृति   ready-witted   repercussive   expugn   fair-spoken   falcated   feeble-minded   heavy-headed   homicidal   ill-tempered   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP