Dictionaries | References

१०८

   { एकशें आठ }
Script: Devanagari

१०८     

Sanket Kosh | Marathi  Marathi
एकशें आठ उपनिषदे   
ऋग्वेदाच्या २१ शाखा, यजुर्वेदाच्या १०९ सामवेदाच्या १००० आणि अथर्ववेदाच्या ५० अशा एकूण ११८० शाखागणिक असलेल्या उपनिषदांपैकीं प्रमुख उपनिषदें १०८ आहेत तीं :-
१ ईशावास्य, २ केन, ३ कठ, ४ प्रश्न, ५ मुण्ड, ६ माण्डुक्य, ७ तैत्तिरीय, ८ ऐतरेय, ९ छांदोग्य, १० बृहदारण्य, ११ ब्रम्ह, १२ कैवल्य, १३ जाबाल, १४ श्वेताश्वेतर, १५ हंस, १६ आरुणि, १७ गर्म, १८ नारायण, १९ परम, ([हंस]) २० (अमृत) बिंदु, २१ (अमृत) नाद, २२ ([अथर्व]) शिरस् ‌. २३ ([अथर्व]) शिखा, २४ मैत्रायिणी, २५ कौषीतकी, २६ बृहज्जाबाल, २७ नृसिंहतापिनी, २८ कालाग्निरुद्र, २९ मैत्रेयी, ३० सुबाल, ३१ क्षुरि (का) ३२ मन्त्रिका, ३३ सर्वसार, ३४ निरालंब, ३५ शुक (रहस्य), ३६ वज्रसूचिका, ३७ तेजो -([बिन्दु]), ३८ नाद - ([बिन्दु]) ३९ ध्यान - ([बिन्दु]), ४० ब्रह्मविद्या, ४१ योगतत्व, ४२ आत्मबोधक, ४३ ([नारद])- परिव्राज्जक, ४४ त्रिशिखि - (ब्राह्मण) ४५ सीता, ४६ ([योग]) चूडा - (मणि), ४७ निर्वाण, ४८ मण्डल - (ब्राह्मण) ४९ दक्षिणा - (मूर्ती) ५० शरम, ५१ स्कंद, ५२ महानारायण, ५३ अद्वय - (तारक) ५४ राम - (रहस्य) ५५ रामतपन, ५६ वासुदेव, ५७ मुद्र्ल, ५८ शाण्डिल्य, ५९ पिङगल, ६० भिक्षुक, ६१ महा, ६२ शारीरक, ६३ ([योग])- शिखा, ६४ तुर्यातीत, ६५ संन्यास, ६६ (परमहंस)- परिव्राजक, ६७ अक्षमालिका, ६८ अव्यक्त, ६९ एकाक्षर, ७० (अन्न)- पूर्णा, ७१ सूर्य, ७२ अक्षिक, ७३ अध्यात्म, ७४ कुण्डिका, ७५ सावित्री, ७६ आत्म, ७७ पाशुपत, ७८ परव्रह्म, ७९ अवधूतक, ८० त्रिपूर तापन, ८१ देवी, ८२ त्रिपुर, ८३ कठ (रुद्र) ८४ भावना, ८५ रुद्र -(ह्रदय) ८६ ([योग])- कुण्डली, ८७ भस्म -([जाबाल]), ८८ रुद्राक्ष, ८९ गण - (पति) ९० (श्री जाबाल)- दर्शन, ९१ तारसार, ९२ महावाक्य, ९३ पञ्चब्रह्म, ९४ प्राण - (अग्निहोत्र), ९५ गोपाल (पूर्वतापिनी - उत्तरतापिनी), ९६ कृष्ण, ९७ याज्ञवल्क्य, ९८ वराह, ९९ शाठयानीय, १०० हयग्रीव, १०१ दत्तात्रेय, १०२ गुरुड, १०३ कलि (संतराण), १०४ जाबालि, १०५ सौभाग्यलक्ष्मी, १०६ सरस्वती (रहस्या), १०७ बव्ह्रच आणि १०८ मुक्तिकोपनिषद. "अष्टोत्तरशतस्यादौ प्रामाण्यं मुख्यमीरितम." ([रा. गी. १८-३])
या १०८ उपनिषदांव्यतिरिक्त अडया (मद्रास) वाचनालय संस्थेमार्फत आणखी ७१ उपनिषदें प्रसिद्ध झालीं आहेत. यांत दशोपनिषदें
(दहा अंका - खालीं पाहा) हीं मुख्य होत.
एकशें आठ मणी जपमाळेस   
(अ) सूर्य परब्रह्म आहे. सूर्याला सर्व ग्रह प्रदक्षिणा घालतात. ही प्रदक्षिणा सत्तावीस नक्षत्रांतून होत असते. प्रत्येक नक्षत्राचे चार पाद म्हणजे नक्षत्र चक्राचे १०८ भाग होत असल्यानें जपासाठीं ही नक्षत्रमाला - शास्त्रानें निश्चित केली आहे ([ज्ञानेश्वर मासिक श्रावण शके १८७३])
(आ) जप माळेचे प्रमाणः - २५ तत्त्वें, १० पवन पिंडीचे व ब्रह्मांडीचे, २० प्रकृति पुरुष लक्षणें, ५२ मातृका (५० क. पासून क्ष पर्थंत) ३४ व्यंजनें आणि १६ स्वर, ॐ नामाचीं मिळून २ गुप्त गुप्तगुरुघरचीं) आणि १ ॐ कार मिळून १०८ ([दु. श. को.])

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP