|
स्त्री. १ डोक्यावरील केसांचा झुपका ; शिखा . सन्नमनी वार्धकी जशी शेंडी . । २ डोक्यावरील तुरा ; कल्ले ; मोराच्या डोक्यावरील पिसे . ३ धूमकेतूची शेपटी . ४ घोडयाच्या टाळूवरील केस ; झुलपे . ५ तेल्याच्या घाण्याच्या किंवा चरकाच्या मधल्या लाटेच्या टोकाचा भाग ; बोंड . ६ सोललेल्या नारळाच्या देठाकडील काथ्याचा झुबका . ७ ( कु . ) तडीस पागण्याचे जाळें . ८ मक्याच्या कणसांवरील तंतूंचा झुबका . ९ ( चांभारी ) तजास मधोमध ठेवलेले टोक . [ सं . शिखंडिका ; प्रा . शिहण्डिआ ] शेंडी फुटणें - अंदाजापलीकडे खर्चाची रक्कम वाढणे ; अपेक्षेपलीकडे कोणतीहि गोष्ट जाणे , वाढणे ; एखाद्या कामातून दुसरे , किरकोळ काम निघणे . शेंडी राखणें - लहान मुलास प्रथम शेंडी ठेवण्याचा विधि करणें ; चौल करणे . शेंडीस गांठी देणे - गुरु , शिक्षक , वडील मंडळी यांच्यावर उलटणे , त्यावर कडी करूं पहाणे , त्यास अक्कल शिकविणे , त्याचा उपमर्द करणे ; वरचष्मा करणे . एखाद्याच्या हातीं शेंडी सांपडणे , एखाद्याच्या हातीं शेंडी गुंतणे - कचाटयांत , तडाख्यांत सांपडणे ; अडचणीत येणे ; दुसर्याच्या आहारी जाणे . शेंडीस फूल बांधणे - एखाद्या मनुष्यास चढवून आपलासा करून घेणे ; एखाद्याची स्तुति करून आपले काम साधणे ; खुशामत करणे . स्त्री. ( कु . ) मासे मारण्याचे ( फेंकण्याचें ) जाळें . ०धर्म पु. हिंदूधर्म . ०पालवी स्त्री. १ झाडांच्या शेंडयाची पानें ; टिकशी ; अग्रचा पानांचा झुबका . ( क्रि० येणे ; फुटणे ). २ ( ल . ) म्हातारपणांत झालेले अपत्य . ०शृंगी वि. शेंडीखाली भोंवरा असलेला ( घोडा ) हे अशुभ लक्षण आहे . ०शेपटी स्त्री. ( झाडाचा ) अखेरचा भाग ; अगदी शेवटची पाने वगैरे ( बागवान आपल्या कामाबद्दल म्हणातात ). ( यावरून लक्षणेने ) गाळसाळ ; अखेरचा टाकाऊ भाग ; करावयाचे शेवटचे , कमी महत्त्वाचे काम ; ऊरपूर ; आवरसावर . ( क्रि० राहणे ). काम बहुत करून आपटले , शेंडीशेपटी मात्र राहिली .
|