|
पु. तुकडा ; विभाग , विभाजन ; भिन्नीकरण ; वेगळें करणें ; भिन्न करणें . वियुक्तावस्था ; परिच्छेद - पृथकावस्था ; ( रेषा , चिन्हें , फटी , वगैरेनीं किंवा वर्ग - योग्यतेरुप निरनिराळी सदरें पाडून ). तैसीं सिनानीं चारीं पदें । श्लोक श्लोकावच्छेदें । - ज्ञा १८ . ५४ . विभागणारी , वेगळें करणारी खूण , चिन्ह , जागा ; फाड ; चीर ; छेद ; खाप ; खांच ; खांड ; सड ; फट ; सांध . ( ऽ ) अवग्रह , ( ॥ ) चरणरेघ , इत्यादि सामासिक शब्दांचीं पदें किंवा कवितेचे चरण दाखविणारीं चिन्हें . उध्दृत करणें ; उतारा . व्यतिरेक ; वर्जन ; व्यवच्छेद ; निष्कासन ; अवकर्षण . आक्रमण ; व्याप्ति ; वस्ती ( उ० पृथ्वीमध्यें गंध , अग्नींत उष्णता , विश्वांत ब्रह्म यांची ); स्वभावसिध्द किंवा अविनाशभूत अधिष्ठान ( उ० आदिभौतिक पदार्थांच्या ठायीं घटकावययांचें , सजीव प्राण्याच्या ठायी मृत्यूचें . ) आहारनिद्राभय जीवावच्छेदेंकरुन आहे . विशेष गुण - धर्म ; व्यावर्तक लक्षण ; वैशिष्ट्य . सीमा ; मर्यादा ; अवरोधक पदार्थ किंवा वस्तु . [ सं . ] अवच्छेदकावच्छेदेंकरुन - सर्वांना ( व्यक्ति , जाती , वर्ग , पंथ वगैरे ) घेऊन किंवा त्या सर्वांचा समावेश करुन ; सर्वांचा ( माणसे , प्रकरणें , गोष्टी वगैरेंचा ) स्वीकार करुन किंवा त्यांची गणना करुन ; कोणतेंहि वर्ज्य केलें असतां किंवा कसेंहि व्यक्त केलें असतां . एकसमयावच्छेदेंकरुन - एकदम ; एकाचवेळीं ; एकाच खेपेंत ; दुसरीकडे लक्ष न देतां ; विश्रांति न घेतां ( करणें , उरकणें ) एतत्कालावच्छेदेंकरुन - फक्त याच वेळीं , समयीं . शक्त्यवच्छेदेंकरुन - ( माझी , तुझी ) सर्व शक्ति खर्च करुन .
|