|
एकतीस उपग्रह सूयोभोवतीं फेर्या घालीत राहिलेले नवग्रह, त्या सर्वांचे मिळून एकतीस उपग्रह आहेत ते असे - पृथ्वी १, मंगळ २, गुरु १२, शनि ९, युरेनस् ५, व नेपच्यून २. (ज्योतिर्वैभव) एकतीस तत्त्वें सविकार क्षेत्राची (शरीराची) १ ते ५ पंचमहाभूतें, ६ अहंकार, ७ बुद्धि, ८ प्रकृति (अव्यक्त), ९ ते १८ दशेंद्रियें, १९ अंतःकरण (मन), २० ते २४ पंचविषय, २५ इच्छा. २६ द्वेष, २७ सुख, २८ दुःख, २९ संघात ३० चैतन्य आणि ३१ धृति. या एकतीस तत्त्वांच्या समुदायाला सविकार क्षेत्र म्हणतात. (वेदांतील राष्ट्र्दर्शन)
|