Dictionaries | References

   { द्वै, द्वि, दोन, दोघे }
Script: Devanagari

२     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दो, दो

२     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दोन, दोन

२     

Sanket Kosh | Marathi  Marathi
दोन (अठराहि पुराणांतर्गत सारवचनें)   
१ परोपकार हें पुण्य ब २ परपीडा हें पाप.
अष्ठादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ।
परोपकार : पुण्याय पापाय परपीडनम् ॥ ([सु.])
दोन अयनें   
१ दक्षिणायन आणि २ उत्तरायण. दक्षिणायनांत सूर्याची गति दक्षिणेकडे असते. आरंभ कर्कसंक्रातीपासून होतो. उत्तरायणांत सूर्याची गति उत्तरेस असते. आरंभ मकरसंक्रांतीपासून होतो.
'अग्रिज्योंतिरह : शुक्ल : षण्मासा उत्तरायणम् ।' ([भ, गी. ८-२४])
'धुमो रात्रिस्तथा कृष्ण : षण्मासा : दक्षिणायनम् ।' ([भ, गी. ८-२५])
दोन अंगें (घर्माची)   
(अ) १ तत्त्वज्ञान आणि २ आचार.
(आ) (सार्वकालिक) १ अभ्युदय आणि २ निश्रेयस.
दोन अंगें मुक्तीचीं   
२ त्रिविध दु:खनिवृत्ति व २ परमानंद प्राप्ति. ([हरिपाठ रहस्य])
दोन अधिष्ठानें (रोगाचीं)   
१ शरीर आणि २ मन.
दोन अधिष्ठानें (लक्ष्मीचीं)   
१ चंद्र आणि २ कमल. (संस्कृतीचीं प्रतीकें)
दोन अवस्था   
(अ) १ सुख आणि २ दु:ख ;
(आ) १ पृर्वावस्था (वाल्य आणि तारूण्य) आणि २ उत्तरावस्था (प्रौढता आणि वार्धक्य).
दोन अवस्था (जीवाच्या)   
१ साधनावस्था आणि २ सिद्धावस्था. (परमार्थ मार्ग)
दोन अवस्था ; जीवनाच्या   
१ जीवन आणि २ मृत्यु.
दोन अवस्था विश्वाच्या   
१ वज्र आणि २ मदन. (कुमार संभव)
दोन अश्विनीकुमार   
अश्चिनी नांवाच्या अप्सरेचे दोन जुळे मुलगे. हे देवांचे वैद्य होते.
दोन अक्षरी मंत्र   
"राम","शिव"हे प्रत्येकी दोन अक्षरांचे मंत्र काशीक्षेत्रांत तारक होतात.
दोन आदर्श भक्तश्रेष्ठ   
१ हनुमान् आणि २ अर्जुन. यांनीं राष्ट्रकार्यार्थ आपलें जीवित अर्पण केलें.
दोन आदिकारणभूत तत्त्वें सृष्टीचीं   
१ शिव आणि २ शक्ति किंवा १ पुरुष आणि २ प्रकृति.
दोन आद्य शाहीर भारतांतले   
१ कुश आणि २ लव. हे श्रीरामाचे पुत्र व वाल्मिकीचे शिष्यवर.
हे रामायण गीत ऋषिसमुदाय, यज्ञमंडप, अथवा राजमार्ग यांवर बहुजनमनोद्दीपनार्थ कोठेंहि गाऊन दाखवीत असत. ([आर्या - रामायण]) ([वा. रा. ७-९३-५])
दोन ईश्वरी देणग्या (मानवाला)   
१ स्मृति, आणि २ विस्मृति. ([समग्र सावरकर वाडमय.])
दोन उपाय चित्त नाशाचे   
१ योग आणि २ ज्ञान
"द्वौ क्रमौ चित्तनाशस्य योगो ज्ञानं च राघव।". ([योगवासिष्ठ])
दोन उपासना   
१ सगुणोपासना आणि २ निर्गुणोपासना.
दोन कारणास्तव परान्नभोजन विहित आहे   
१ परस्पर प्रेम असलें तर व २ उपासमार होत असेल तर. ([म. भा. उद्योग ९१-२५])
दोन कारणें कार्योत्पत्तीस आवश्यक (अध्यात्म)   
१ निमित्त कारण आणि २ उपादान कारण.
द्विकारणात्मकं सर्वकार्ये।(वेदान्तसार)
दोन गुण संस्कारांचे   
१ गुणांची निर्मिति व २ दोषांचे निराकरण. (तंत्रवार्तिक)
दोन गुप्त गंगा   
१ गयेची फलगु व २ प्रयागची सरस्वती या दोन गुप्त गंगा होत.
दोन गोष्टी आजन्म संपादणेच्या   
१ विद्या आणि २ धन.
"अजरामरवत् प्राज्ञ : विद्यामर्थे च साधयेत्। ([म. भा.])
दोन गोष्टींत भीड धरूं नये   
१ आहार, (भोजन) आणि २ व्यवहार.
"आहारे व्यवहारे च त्यक्तलज : सुखीभवेत ।"([सु.])
दोन गोष्टींनी मानवाचा नाश होतो   
१ चिता आणि २ चिंता.
दोन गोष्टी रोधतां येत नाहीं   
ईप्सितार्थ मिळविण्याचा द्दढनिश्चय करणारें मन आणि २ उताराकडे वाहणारा जलप्रवाह. (कुमार संभव)
दोन गोष्टींत संयम आवश्यक   
१ जिव्हेंद्रिय आणि २ जननेंद्रिय. ([गुरुचरित्र कलिप्रभाव])
दोन चाकें संसाररथाचीं   
१ स्त्री आणि २ पुरुष.
दोन गोष्टी स्वर्गसुखापेक्षां अधिक होत   
१ जननी आणि २ जन्मभूमि.
नेयं स्वर्णपुरी लङ्रका रोचते मम लक्ष्मण।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥ ([सु.])
दोन गोष्टी स्थिर (चिरंतन राहणार्‍या)   
१ धर्म आणि २ कीर्ति.
अस्थिरं जीवितं लोके अस्थिरे धनयौवने।
अस्थिरा : पुत्रदाराश्च धर्मकीर्तिद्वयं स्थिरम् ॥ ([सु.])
दोन गोष्टी परत जोडतां येत नाहींत   
१ फुटलें मोतीं आणि २ तुटलें मन.
'सोनें अथवा हस्तचरण। मोडिल्या सांधिती विचक्षण। फुटलें मोतीम तुटलें मन। सांधूं न शके विधाता।' ([मुक्तेश्वर म. भा. अ. १८])
दोन गोष्टींत जन्माची सफलता   
१ अनायासानें मरण व २ विना दैन्यानें जीवन.
"अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् ।"([सु.])
दोन गोष्टींमुळें तीन आपत्ति ओढवतात   
१ अपूज्यांची पूजा आणि २ पूज्यांची अवहेलना या दोन गोष्टी जेथें होतात तेथें १ दुर्भिक्ष, २ मरण आणि ३ भय या तीन आपत्ति ओढवतात.
अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानां तु विमानना।
त्रीणि तत्र प्रवर्तन्ते दुर्मिक्षं मरणं भयम् ॥ ([सु.])
दोन गोष्टी क्षणभंगुर   
१ तारुण्य आणि २ धन.
दोन ग्रहणें   
१ चंद्रग्रहण आणि २ सूर्यग्रहण.
दोन चिकित्सा   
१ मानसचिकित्सा आणि २ औषधी चिकित्सा.
दोन चैतन्यें   
१ जीव चैतन्य आणि २ ब्रह्मचैतन्य.
दोन तत्त्वें अनादि   
१ प्रकृति आणि २ पुरुष."प्रकृतिं पुरुषं चैव विद्धयनादी उभावपि।"([भ. गी. १३-१९])
दोन दोष (चित्ताचे)   
१ रजोगुण व २ तमोगुण हे चित्ताचे दोन दोष. 'रजस्तमश्च मनसो द्वौ दोषौ समुदीरितौ।' ([वाग्मट])
दोन द्रव्याचे अतिक्रम अथवा दुरुपयोग   
१ कुपात्रीं दान करणें व २ सत्पात्रीं दान न करणें ;
हे दोन संपादन केलेल्या द्वव्याचे अतिक्रम होत.
लब्धानामपि वित्तनां बोद्धव्यौ द्वावतिक्रमौ।
अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चाप्रतिपादनम् ॥ ([म. भा. शांति २७-३१])
दोन देवर्षि   
१ नारद व २ पर्वत.
दोन द्वारपाल (श्रीविष्णूचे)   
१ जय आणि २ विजय.
दोन धर्म   
(अ) १ विश्वधर्म व २ व्यवहारधर्म ;
(आ) १ सामान्य धर्म आणि २ विशेष धर्म.
दोन धर्म मनाचे   
१ वासना आणि २ विचार. ([नासदीय सूक्त भाष्य उत्तरार्ध])
दोन धर्मधुरंधर   
१ भीष्म आणि २ श्रीकृष्ण.
दोन धनें   
१ दैवधन (उपासना आणि कर्म) आणि २ मनुष्यधन (भूमि, पशु आणि सुवर्ण).
दोन धरुव   
१ उत्तर ध्रुव, २ दक्षिण ध्रुव.
दोन नर   
१ अर्जुन आणि २ अश्व.
दोन नृत्यें   
१ ताण्डव (शिव - नृत्य) आणि २ लास्य (पार्वती - नृत्य) असे दोन प्रकार.
दोन पक्ष   
१ शुक्ल पक्ष आणि २ कृष्ण पक्ष. पक्ष म्हणजे पंधरवडा.
अमावास्येपासून पौर्णिमेपर्येत शुक्ल पक्ष व पौर्णिमेपासून अमावास्येपर्येतचा कृष्ण पक्ष.
दोन परम - सूक्ष्म तत्त्वें   
१ चेतन आणि २ अचेतन ([बृहस्पति तत्त्व श्लोक ६])
दोन पापपुण्याचे साक्षीदार   
१ माणसाचा आत्मा व २ परमेश्वर.
पुराणकालीन पाकशास्त्र प्रवीण   
१ राजा नळ - गोड पदार्थ (स्वादिष्ट उंची पदार्थोची पाकनिष्पत्ति) आणि २ भीम - तामस (तिखट मिठाचे पदार्थ) यावरून त्या त्या पाकप्रकारांना अनुक्रमें नळपाक आणि भीमपाक अशा संज्ञा मिळाल्या आहेत, ([म. शब्दकोश])
दोन पुरुष   
१ क्षर (विनाशी) आणि २ अक्षर (अविनाशी) या विश्रांत असे हे दोनच पुरुष आहेत. ([भ. गी. १५, १६])
दोन पुरुषोत्तम   
१ मर्यादा पुरुषोत्तम - श्री रामचंद्र व २ पुराण पुरषोत्तम - श्रीकृष्ण.
दोन पुराणकालीन वार्ताहर   
१ नारद व २ संजय.
दोन पुराणकालीन प्रतिज्ञा   
१ कचप्रतिज्ञा आणि २ भीष्मप्रतिज्ञा.
दोन प्रकारचे अलंकार   
१ शब्दालंकार आणि २ अर्थालंकार.
दोन प्रकारचे आचार   
१ शास्त्रीय आचार आणि २ लौकिक आचार.
'आचारो द्विविध : प्रोक्त : शास्त्रीयो लौकिकस्तथा' ([देवी भाग. स्कंध ९ अ १-१६])
दोन प्रकार अवलोकनाचे   
१ सिंहावलोकन - मागचें अनुसंधान ठेवून पुढें पाहणें व २ विहंगमावलोकन - सूक्ष्म निरीक्षण.
दोन प्रकार (कर्माचे)   
१ सकाम आणि २ निष्काम् .
दोन प्रकार (सद्‌गुरुंचे)   
१ ध्यायी - शास्त्र आणि अनुभूति यांनीं युक्त आणि २ तत्त्वबित् - हा जन्मत : सिद्ध योगी असतो.
' द्वैविघ्यं सद्‌गुरुणां च घ्यायितत्त्वविदाविति.' ([योगसंहिता])
दोन प्रकार (काव्याचे)   
१ नारिकेलरस - काव्य - कठीन व २ द्राक्षा - रस काव्य - सगम.
दोन प्रकारचा काल महा कठीण   
मध्यान्ह काल २ अंतकाल.
दोन प्रकारची कुंडली   
१ शापित आणि २ अनुगृहीत ([ज्योतिष])
दोन प्रकार गणिताचे   
१ व्यक्त - अंकगणित व २ अव्यक्त - बीजगणित.
दोन प्रकार गुरूंचे   
(अ) १ कारण गुरु आणि २ कार्यगुरु (नित्या - नंद चरित्र)
(आ) दीक्षागुरु आणि २ शिक्षागुरु.
दोन प्रकार चोरांचे   
१ उघड चोर व २ गुप्त म्हणजे वरून साव दिसणारा.
' प्रकाशाश्चाप्रकाशाश्च द्विविधास्तस्करा : स्मृता :' (स्मृतिचंद्रिका)
दोन प्रकार ग्रंथपरीक्षणाचे   
१ अंतरंग परीक्षण आणि २ बहिरंग परीक्षण.
दोन प्रकारचे जन्म   
१ दिव्या आणि २ पार्थिव ([भ. गी. ४-९])
दोन प्रकार ज्योतिषाचे   
१ फ्लज्योतिष व २ गणित ज्योतिष.
दोन प्रकारचे छंद   
१ वैदिक आणि २ लौकिक (तत्त्व - निज - विवेक)
दोन प्रकारांनी र्धम साध्य आहे   
१ द्वव्यरूपानें - यज्ञ वगैरेमुळें व २ देहानें - तीर्थयात्रा वगैरेमुळें.
'धर्मश्व द्विविध : प्रोक्तो द्र्व्यदेहद्वयेन च'। शिव. पु. अ १३)
दोन प्रकार (धर्माचे)   
१ प्रवृत्तिपर आणि २ निवृत्तिपर. ([म. भा. शांति २४०-६])
दोन प्रकार (घ्यानाचे)   
१ सगुनध्यान व निर्गुणध्यान.
दोन प्रकार (नमस्काराचे)   
(अ) १ भावनमस्कार व २ द्वव्यनमस्कार ;
(आ) १ व्यवहारनमस्कार व निश्रयनमस्कार (रत्न कंरडक)
दोन प्रकार प्रपंचाचे   
१ विद्याप्रपंच आणि २ अविद्या प्रपंच.
"प्रपंचो द्विविध :"(वेदांत शास्त्र)
दोन प्रकार प्रयत्नाचे   
१ शास्त्रीय व २ अशास्त्रीय
"उच्छृंखलं शास्त्रियं चेति द्विविधं पौरुषं स्मृतम् "(यो. वा. २-५-४)
दोन प्रकारची बुद्धि   
१ संशयात्मिका आणि २ निश्चयात्मिका.
दोन प्रकारचे ब्रह्यचारी   
१ उपकुर्वाणक (जो फिरून गृहस्थाश्रम स्वीकारतो असा) आणि २ नैष्ठिक ब्रह्मचारी (आजन्मपर्येतचा) (दक्ष १-२)
दोन प्रकार भक्ताचे   
१ सकाम भक्त आणि निष्काम भक्त.
दोन प्रकार भक्ताचे   
(अ) १ ज्ञानपूर्व भक्ति व २ ज्ञानोत्तर भक्ति ([वामन पंडित])
(आ) १ गौणी भक्ति - ज्ञानपूर्व भक्ति अ २ पराभक्ति - ज्ञानोत्तर भक्ति. ([ज्ञानेश्वरी गूढार्थदीपिका खंद ३])
दोन प्रकार भ्रमाचे   
१ संवादीभ्रम - चांदी वाटून चांदी सांपडली तर आणि २ विसंवादीभ्रम - चांदी वाटून कथील सांपडलें तर (सावित्रीचरित्र)
दोन प्रकार मनाचे (अध्यात्म)   
१ शुद्ध - वासनांची भेसळ नसलेले आणि २ अशुद्ध - ज्यांत काम व संकल्प असतात असें
"मनो हि द्विबिधं प्रोक्तं शुद्ध चाशुद्धमेव च। अशुद्धं कामसंकल्पं शुद्धं कामविवर्जितम् ॥"([अमृत बिंदु उपनिषद्])
दोन प्रकार मौनाचे   
१ आकारमौन (उच्चार न करतां खुणेनें व्यक्त करणें) आणि २ काष्ठमौन. (उच्चारहि नाहीं व खुणोनेंहि नाहीं असे.) ([अमृतानुभव - टीका])
दोन प्रकार मंत्रांचे   
१ स्वयंभूमन्त्र आणि २ वरदमन्त्र - (वैदिक - सं. पुनर्घटना)
दोन प्रकारचे योगी   
१ गुप्तयोगी व २ व्यक्तयोगी (श्रीरामकृष्ण वाक्सुधा)
दोन प्रकारचें विज्ञान   
१ आलय विज्ञान - अहं असेम जें ज्ञान होतें त्यास म्हणतात अ प्रवृत्ति विज्ञान - इंद्रियांनीं होणारें ([बौद्धदर्शन])
दोन प्रकारचा विनय   
१ स्वाभाविक आणि २ कृत्रिम,
"द्विविधो विनय : स्वाभाविक : कृत्रिमश्च"([कौटिल्य])
दोन प्रकारचे शौच   
१ बाह्म शौच आणि २ आभ्यंतर शौच. हें दोन प्रकारचें शौच अथवा पावित्र्य.
"शौचं तु द्विविधं प्रोंक्तं बाह्ममाभ्यन्तरं तथा"([शिवतत्त्वरत्नाकर ६-९]), (द्क्षस्मृति)
दोन प्रकार श्रद्धेचे   
१ प्रयोजिका व २ निश्चयात्मिका,
दोन प्रकार ज्ञानाचे   
(अ) १ अनुभव व २ स्मृति - पुन : प्रत्यय. (न्यायदर्शन)
(आ) १ लौकिकज्ञान आणि व २ परमात्मज्ञान (सुफीसंप्रदाय)
(इ) १ शब्दज्ञान आणि २ अनुभवसिद्ध ज्ञान ([देवी. भा.])
(ई) यथार्थ ज्ञान आणि २ अयथार्थज्ञान (रर्क.)
दोन प्रज्ञा   
१ स्थितप्रज्ञा व २ अस्थितप्रज्ञा.
दोन प्रवृत्ति   
१ सत्प्रवृत्ति आणि २ असत्प्रवृत्ति. जगांत या दोन्ही सनातन आहेत.
दोन प्राणी भयंकर सदाची   
१ हंसणारा पुरुष आणि २ रडणारी स्त्री.
दोन प्रकारचे योग   
(अ) १ साध्ययोग आणि २ साधनयोग
(आ) संप्रज्ञातयोग आणि २ असंप्रज्ञातयोग. ([योगशास्त्र])
दोन प्रकारचीं रूपें परमात्म्याचीं   
१ विश्वात्मक आणि २ विश्वो - त्तीर्ण - निर्विकार स्थिति (श्रिशैवागम आणि ज्ञानेश्वर)
दोन प्रकार वेताळाचे   
१ रुद्रवेताळ आणि २ अग्निवेताळ -(आग्या - वेताळ) - एक ग्राम दैवत. (गाजलेलीं दैवतें)
दोन प्रकार वैराग्याचे   
१ ज्ञानवैराग्य आणि २ निर्वेदवैराग्य. अनुभवामृत - अमृतवाहिनिटीका
दोन प्रकारच्या व्याधी   
१ दोषजन्यव्याधि आणि २ कर्मजन्य व्याधि - पूर्वकर्मानें प्राप्त झालेल्या.
दोन प्रकारची शरीरें   
१ पार्थिव शरीर आणि २ मानस शरीर ([रघु २-५७])
दोन प्रकारचे संत   
१ कुटुंबसंत आणि २ समाजसंत (संतसाहित्य)
दोन प्रकारची संतति प्रजापतीची   
१ देव आणि २ असुर. देव हे लहान आणि असुर हे ज्येष्ठ
'दूया ह प्राजापत्या देवाश्चासुराश्च।' बृहदारण्यक १-३-१)
दोन प्रकारचा संन्यास   
१ विविदिषा संन्यास व २ विद्धत् संन्यास.
दोन प्रकार समाधीचे   
१ संप्रज्ञात अथवा सविकल्प समाधि आणि २ असंप्रज्ञात अथवा निर्विकल्प समाधि.
दोन प्रकार सिद्धींचे....   
१ कल्पिता ब २ अकल्पिता. ([योग शिखोप - निषत])
दोन प्रकार शास्त्रचें   
१ भौतिक आणि २ अभौतिक - मानसशास्त्र, अर्थशास्त्र इ.
दोन प्रकार संकेतांचे   
१ श्रद्धाप्रधान (शास्त्राधारावरून ठरविलेले) आणि २ कल्पनाप्रधान. (कविप्रतिभाजनित).
दोन प्रकार संस्काराचे   
(अ) १ श्रौत आणि २ स्मार्त
(आ) ब्राह्म गर्भादान इ. व २ दैवी - पाकयज्ञ इ.
"द्विविधो हि संस्कारो ब्राह्मो दैवश्च"([हारीत])
दोन प्रकारची सृष्टि   
१ दैवी आणि २ आसुरी.
"द्वौ भूतसगौं लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च"([भ, गी. १६-६])
दोन प्रकार दास्याचे   
(अ) १ कृपादास्य आणि २ मायादास्य. ([गूढार्थ - चंद्रिका])
(आ) १ दैवीदास्य व २ विदूषकीदास्य ([नारदीय सूक्त भाष्य])
दोन प्रकारचे ज्ञान   
(अ) १ जन्मसिद्ध आणि २ अनुभवसिद्ध ;
(आ) १ शाव्दिक ज्ञान आणि २ अनुभवजन्य ज्ञान.
ज्ञांनं तु द्विविधं प्रोक्तं शाब्दिकं प्रथमं स्मृतम् ।
अनुभवाख्यं द्वितीयं तु ज्ञानं तद्‌‍दुर्लमं नृप ॥ ([देवी भाग, षष्ठ स्कंध १५-५२])
दोन प्रकारच्या माणसांना सुखाचा लाभ होतो   
१ आगामी संकटाची आगाऊ तरतूद करणारा आणि
२ प्रसंगीं ज्याला युक्ति सुचते तो.
अनागतविधाता च प्रत्युपन्नमतिश्च य :।
द्वावेव सुखमेघेते दीर्घसूत्री विनश्यति ॥ ([म. भा. शांति १३७-१])
दोन प्रकारचे पुरुष जगांत विरळा   
१ ज्यानें जें मागितलें त्यास तेंच देऊन टाकणारा आणि
२ आपण स्वत : कोणापासून कांहींहि न मागणारा ([कल्याण - उपनिषत् अंक]).
दोन प्रकारचें वैर   
१ स्वाभाविक आणि २ कृत्रिम. साप आणि मुंगूस, पाणी व अग्नि, देव आणि दानव, कुत्रा व मांजर, सिंह आणि हत्ती, सज्जन व दुर्जन हीं स्वाभाविक वैराचीं उदाहरणें ([पंचतंत्र])
दोन प्रतिज्ञा (अर्जुनाच्या)   
१ दैन्य न भाकणें ब २ युद्धांत पाठ न दाखविणें. 'अर्जुनस्य प्रतिज्ञे द्वै न दिन्यं न पलायनम्' ([सु.])
दोन प्रयत्न (व्याकरणशास्त्र)   
१ आभ्यंतर प्रयत्न आणि २ बाह्म प्रयत्न.
आभ्यंतर प्रयत्न - वर्णोच्चाराचे वेळी उच्चारस्थानाचे आंतील प्रयत्न (हा पांच प्रकारचा आहे) आणि
बाह्म प्रयत्न - वर्णोच्चाराचे वेळीं जिव्हा तालु इत्यादि इंद्रियांच्या साह्यानें होणार (हा अकरा प्रकारचा आहे)
'तुल्यास्यप्रयत्नं सवर्णम्' ([सि. कौ. १-१-९])
दोन प्रलय   
१ नित्यप्रलय आणि २ महाप्रलय
दोन ब्रह्में   
(अ) शब्दव्रह्म आणि २ परब्रह.
(आ) १ शब्दब्रह्म आणि २ अशब्दब्रह. घ्यान करण्याला योग्य अशीं दोन ब्रह्में
"द्वे ब्रह्माणी वेदितव्ये"([मैत्रायणीयापनिषद्])
दोन भक्तिसाधनें   
१ नामस्मरण आणि २ कीर्तन.
दोन भाग्यवान माता   
(अर्वाचीन कालीन) १ आंध्रराजा शातकर्णी याची मातोश्री गौतमीदेवी (१५ वे शतक) व २ छत्रपती शिवाजी महाराजांची मातोश्री जिजाबाई (१७ वे शतक) (पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज)
दोन भाव मनाचे   
१ संकल्प आणि २ विकल्प. (मणिकांचन)
दोन महामूर्ख   
१ जुनें तेवढें चांगलें व नवीन सर्व त्याज्य म्हणून जुनें कवटाळणारा आणि २ जुनें सर्व वाईट व नवीन तेवढें चांगलें म्हणणारा (वर्नार्ड शाँ)
दोन मति   
१ सुमति व २ कुमति.
दोन मनें   
(अ) १ अंतर्मन व २ बहिर्मन. 'चित्तंहि द्विविधम्' ([योगशास्त्र])
(आ) १ जागृतींतील मन आणि २ मुषुप्तींतील मन
"द्विविघं हि मन :"
दोन मार्गदर्शक ऋषि   
(मानष शरिरांतले) १ बोध - ज्ञान आणि २ प्रतिबोध - विज्ञान
"बोधप्रतिबोधौ ऋषी"([अथर्ववेद कांड ५])
दोन मंत्री व गुप्तचर रावणाचे   
१ शुक्त आणि २ सारण. ([वा. रा. युद्ध - सर्ग २५-१४])
दोन मार्ग   
१ अर्चिरादि मार्ग - प्रकाशाचा व २ धूमादिमार्ग - अंधाराचा मार्ग (वेदांत)
दोन मार्ग (जगांत आयु : क्रमणाचे)   
१ सांख्य (संन्यास मार्ग) आणि २ योग (कर्ममार्ग) ([गी. र. ६२५])
दोन मार्ग धर्मसाधनेचे   
१ प्रवृत्तिमार्ग आणि २ निवृत्तिमार्ग.
'प्रवृत्तिश्च निवृत्तिश्च द्विविधं धर्मसाधनम्' ([मोक्ष गीता ३-४])
दोन मार्ग साधकाला मुक्ति देणारे   
१ विहंगममार्ग आणि २ पिपीलिका मार्ग.
यांचे प्रवर्तक अनुक्तमें शुक व वामदेव होत.
शुकश्चा वामदेवश्च द्वे सृती देवनिर्मिते।
शुको विहड्‌‍गम : प्रोक्तो वामदेव : पिपीलिका ॥ ([बराहोपनिषद् अ ४])
दोन मीमांसा   
१ पूर्व मीमांसा (कर्मकांड) आणि २ उत्तर - मीमांसा - वेदांतशास्त्र ([ज्ञानकांड]).
दोन मूलभूत तत्त्वें भारतीय तत्त्वज्ञानाचीं   
१ मी - विचार करणारा व २ तूं - विचार्य वस्तु. ([ब्रह्मसूत्र भाष्य प्रस्तावना])
दोन मंगलदायक शब्द   
१ ॐ आणि २ अथ.
हे दोन्ही शब्द ब्रह्मदेवाच्या कंठांतून प्रथम बाहेर आले म्हणून मंगलदायक गणले आहेत.
ॐ कारश्चाथशब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण : पुरा।
कंठं भित्त्वा विनिर्यातौ तस्मान्मांगलिकाबुभौ ॥ (स्मृति)
दोन राष्ट्रीय गीतें   
(भारतीय) - १ वंदेमातरम् - - बंकिमचंद्र आणि २ जन गण मन (टागोर)
दोन लक्षणें दोघांची (मित्र - शत्रू)   
१ उपकार - मित्रलक्षण व २ अपकार हें शत्रूचे लक्षण.
"उपकारफलं मित्रमपकारोऽरिलक्षणम् "([वा. रा. किष्किंधा ८-२१])
दोन राष्ट्रीय महाकवि   
१ व्यास आणि २ वाल्मीकि.
दोन रूपें ब्रह्माचीं   
१ साकार आणि २ निराकार
"द्वे बाब ब्रह्मणो रूपे मूर्ते चैवामूर्ते च"(वेदांतशास्त्र)
दोन लक्षणें (पदार्थाचीं)   
१ तटस्थ लक्षण - पोषाख वगैरे म्हणजे बदलणारें आणि २ स्वरूप लक्षण - विद्या शील वगैरे - टिकणारें (वेदान्त)
दोनवाद (अनादि)   
(अ) १ भोगवाद आणि २ त्यागवाद (पुरुषार्थ - बोधिनी भ. गी.)
(आ) १ प्रतिबिंबवाद व २ अवच्छेद वाद (विचार चंद्रोदय)
(इ) १ सृष्टि - द्दष्टिवाद - सृष्टीवर ज्ञान अवलंबून आहे आणि २ द्दष्टि - सृष्टिबाद - द्दष्टीवरच सुष्टि अवलंबून आहे.
दोन विचारधारांचे प्रतीक असे दोन भारतीय खेळ   
१ सोंगटया - दैववाद आणि २ बुद्धिवळें - प्रयत्नवाद (याकूबी संस्कृति कोश)
वादाचीं दोन प्रबल कारणें   
१ कनक आणि ६ कांता. हीं कोणताहि विग्रह उत्पन्न होण्याचीं दोन मूल कारणें. 'कामिनी कनकं कार्ये कारणं विग्रहस्य वै' ([देवी भाग. चतुर्थ स्कंध १०-६])
दोन विद्या   
(अ) १ पराविद्या - आत्मविद्या - ब्रह्मविद्या आणि २ अपराविद्या - ऋग्वेद. यजुर्वेद. सामवेद, अथर्ववेद आणि १ शिक्षा २ कल्प, ३ व्याकरण ४ निरुक्त, ५ छंद, व ६ ज्योतिष ही सहा वेदांगें.
"द्वे विद्ये वेदितव्ये"(मुण्डक १-१. ४)
(आ) १ शस्त्रविद्या व २ शास्त्रविद्या,"विद्या शस्त्रस्य - शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये"([हितो.])
(इ) १ बला आणि २ अतिबला. सर्व प्रकारच्या ज्ञानांचें उगमस्थान. अशा या देवनिर्मित दोन विद्या - बला आणि अतिबला विश्वामित्रानें श्रीरामास दिल्या. ([वा. रा, बाल. सर्ग २२-१७])
दोन वैरी यथार्थ ज्ञानाचे   
१ निंदा व २ स्तुति.
दोन वंश   
१ जन्मवंश आणि २ विद्यावंश.
दोन शब्दांत दोन संस्कृति   
१ श्रुतिस्मृतिपुराणोक्त - पौरस्त्य आणि २ अद्ययावत् - - पाश्चात्य ([सावरकर])
दोन विशेष (लाभ) संस्कारांचे   
१ गुणांची निर्मिति व २ दोषोंचें निराकरण (तंत्रवार्तिक)
दोन शक्ति मायेच्या   
१ आवरण - अधिष्ठानास झांकणारी आणि २ विक्षेप - विपरीत भासविणारी ([हरिवरदा १८-४])
दोन शरीरें (रूपें) रुद्रदेवतेचीं   
१ घोर शरीर आणि २ शिवशरीर (रुद्रार्थदीपिका)
दोन शाश्वत नेत्र (मानवाचे)   
१ श्रुति - मंत्रात्मकवेद आणि २ स्मृति - वेदानुकूल - साहित्य.
"श्रुतिस्मृती उमे नेत्रे ' ([सु])
दोन संपत्ति   
१ दैवी संपत्ति आणि २ आसुरी संपत्ति.
दोन साधनें दैवाला अनुकूल करून घेण्याचीं   
१ प्रयत्न आणि २ प्रार्थना (विचार पोथी)
दोन साधनें ज्ञानाचीं   
१ शास्त्राभ्यास व २ गुरुपदेश.
दोन खरे परदेशी   
१ जीवन आणि २ झाडाचें पान (राजस्थानीं लोककथा)
दोनच खरे यात्रेकरू   
१ सूर्य आणि २ चंद्र (भोज - लोककथा)
दोन्च खरे राजे   
१ इंद्र आणि २ यम (भोज - लोककथा)
दोघेजण अंगीकारलेलें काम पूर्णतेस नेण्यास बद्धपरिकर होत   
१ राजा (राज्यशासनकर्ते) आणि २ बहुश्रुत ब्राह्मण.
'द्वौ लोके घृतब्रतौ राजा च ब्राह्मणश्च बहुश्रुत :' ([गौतम धर्मसूत्रें ८-१])
दोघेजण दुर्मिळ   
१ अप्रिय पण हितकर असें सांगणारा व २ तें ऐकून घेणारा.
'अप्रियस्य च पथ्यस्य श्रोता वक्ता दुर्लभ :' ([वा. रा. अरण्य ३७-२])
दोघेजण जलसमाधि देण्यास योग्य   
(अ) १ धनिक असून दान न देणारा आणि २ दरिद्रि असून तपस्या (कष्ट) न करणारा.
द्वावम्भसि निवेष्टव्यौ गले बध्वा द्दढां शिलाम् ।
धनवन्तमदातारं दरिद्रं चातपस्विनम् ॥
([म. भा. उद्योग ३३-६०])
दोघेजण जगमित्र   
१ निंदक - पाप हरण करणारा व २ अतिथि - सद्रति मिळवून देणारा.
अतिथिश्चापवादी च द्वावेतौ विश्वबन्वव :।
अपवादी हरेत्पापमतिथि : स्वर्गसंक्रम : ॥ ([मार्कडेय पु.])
दोघेजण पराजित होत   
(अ) १ कर्ज घेणारा आणि २ मुलीचा बापा. (भोज - लोककथा)
(आ) १ लोभी गुरु आणि २ लालची चेला ([कबीर])
दोघेजण विपरीत कर्मामुळें फजित होतात   
१ गृहस्थाश्रमी असून कर्तव्यपराड्‌‍मुख आणि २ भिक्षुक असून खटपटी.
अनारम्मो गृहस्थश्च कायवांश्रैव मिक्षुक :।
उमौ तौ न विराजेते विपरीतेन वर्त्मना ॥
([रामगीता ९-७])
दोघेजण सूर्यमंडलाचा भेद करून जाणारे   
१ समाधींत देह - त्याग करणारा योगी आणि २ घारातीर्थी मरण आलेला. ([म. भा. उद्योग ३३-६१])
द्विजिव्ह   
१ सर्प आणि २ चहाडखोर.
द्वितत्त्ववाद   
दोन परस्पर विरोघी तत्वांपासून जगांतील सर्व गोष्टींचा खुलासा करतां येतो असें प्रतिपादणारें मत.
द्विविधनिष्ठा   
१ सांख्ययोग आणि २ कर्मयोग. या दोन निष्ठा म्हणजे अनुष्ठानतत्परतेचे मार्ग. (म. गी. ३-३)
द्विविध विश्व   
१ जड - २ चेतन. १ पुरुष - २ प्रकृति, १ साकार - २ निराकार, १ स्थूल - २ सूक्ष्म, १ अचेतन - २ सचेतन. असें हें एकंदर विश्व द्विविध आहे.
द्वैत   
(पंचमेदवाद) १ ब्रह्म व जीव २ जीव व जगत् ३ ब्रह्म व जगत् ४ जगांतील पदार्थ व ५ जीवाजीवांत मेद मानणारें मत.
द्वंद्व   
जोडी - युग्म. दोन परस्पर विरुद्ध गोष्टी साहचर्यानें राहतात. अशीं अनेक द्वंदें या जगांत आहेत.
उदा. - जड - चेतन, पुरुष - प्रकृति, देव - दैत्य, प्रपंच - पर्मार्थ, प्रकाश - अंधकार, राग - लोम. सुख - दु:ख शीत - उष्ण. धर्म - अधर्म. पुण्य - पाप. ज्ञान - अज्ञान, उत्पत्ति - लय, लाभ्म - हानि, जय - पराजय, निंदा - स्तुति, मान - अपमान, शत्रु - मित्र, सज्जन - दुर्जन, सत् - असत्, आशा - निराशा, शाप - आशीवीद, प्रवृत्ति - निवृत्ति, त्याग - भोग. हिंसा - अहिंसा, दिवस - रात्र, प्रेम - द्वेष, हर्ष - शोक, नीति - अनीति, शुभ - अशुभ, सम - विषम, सगुण - निर्गुण, विधि - निषेध, नित्य - अनित्य, व्यष्टि - समष्टि, द्वैत - अद्वैत, विवेक - वैराग्य, जन्म - मरण, बंध - मोक्ष, आवड - नावड, उत्कांति - अपकांति, शिव - अशिब, मंगल - अमंगल, शरीर - आत्मा, जुनें - नवें, सनातनी - क्रांतिकारी, मृत्यु - जीवन, सापेक्ष - निरपेक्ष, स्त्री - पुरुष इ.
दोन गोष्टी अखंड चालणार्‍या   
(अ) १ जनन आणि २ मरण"पुनरपि जननं पुनरपि मरणं"(शंकराचार्य स्तोत्र).
(आ) १ काळ आणि २ सावकाराचे व्याज. (बिरबल)
दोन प्रकार वृक्षांचे   
१ ज्ञानानें - ज्ञानवृद्ध आणि २ नुसतें वयानें - वयोवृद्ध.
दोन प्रकार वृक्षांचे   
१ फूल न येतां फळ देणारे व २ फुलें व फळें देणारे.
अपुष्पा फलवन्तो ये ते वनस्पतयः स्मृताः।
पुष्पिणः फलिनश्वैव वृक्षास्तूभयतः स्मृताः ॥ ([मनु. १-४७])
दोन प्रकारचें शौच   
१ शुद्ध शौच व २ लौकिक शौच.
"शुद्धशौचं इतिज्ञेयं मृज्जलाम्यां तु लौकिकम्"(मैत्रेयि. उ. २।८)
दोन प्रकार शिक्षकांचे   
१ विद्वान् पण शिकविण्याची कला नसलेला व २ शिकविण्याची कला चांगली जाणणारा. या दोन्ही गुणांनी युक्त असा शिक्षक श्रेष्ठ होय.
श्लिष्टा क्रिया कस्यचिदात्मसंस्था संक्रातिरन्यस्य विशेषयुक्ता।
यस्योमयं साधु स शिक्षकाणां धुरि प्रतिष्ठापयितव्य एव ॥ (मालविकाग्निमित्र १।१६)
दोन प्रकार संकेतांचे   
१ पारिभाषिक व २ ईशनिर्मित. ([न्यायकोश])
दोन प्रमुख हेतु विज्ञानाम्यासाचे   
१ जिज्ञासा व २ व्यावहारिक लाभाची अपेक्षा. (विज्ञान इतिहास)
द्विविध कर्म   
(अ) १ संचित व प्रारब्ध.
(आ) १ दैव व पित्र्य ;
(इ) प्रवृत्त व निवृत्त ;
(ई) १ शुभ व २ अशुभ. (सं. को.)
दोघां चे पावित्र्य स्वयंसिद्ध   
१ गंगाजल व २ अग्नि.
"तीर्थीदकं च वन्हिश्च नान्यतः शुद्धिमर्हतः"(भवभूति)
दोन मोठीं पातकें   
१ दुष्ट मंत्री असलेला राजा (शासनाधिकारी) २ अशा अधिकार्‍याच्या आश्रयाला राहणे.
पातकानां समस्तानां द्वे परे तात पातके।
एकं दुःसचिवो राजा द्वितीयं च तदाश्रयः ॥ (भोजप्रबन्ध)

२     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : दो

Related Words

   ब-२   hepatoflavin   lactoflavin   vitamin b2   vitamin g   riboflavin   ovoflavin   ब-२-जीवनसत्त्व   २ तारीख   क-२ जीवनसत्त्व   deuce   وِیٹامِن بی ۱12   ভিটামিন বি2   विटामिन बी2   ଭିଟାମିନ ବି୨   વિટામિન બી-ર   ਵਿਟਾਮਿਨ ਬੀ2   बी2 जिवनसत्व   2   ii   two   जीवनसत्त्व क-२   जीवनसत्त्व के-२   वज्जीवाज्ज   वाखे   actute   golden ratio   viecosity   गिम्हवा   उदयाश्व , उदयिन्   अमूर्तरय   अर्धगज   खडंगुळ   हिम्दाद   सुवाड   लोदु   रायबोफ्लेवीन   माळचा गुठ्ठा   थाळल   नांवाजीक   तहाद्दर   मस्तक पटी   शहाण्याला मार शब्दाचा आणि मूर्खाला मार काठीचा   शहाण्याला मार शब्दाचा आणि मूर्खाला मार चाबकाचा   शहाण्याला मार शब्दाचा आणि मूर्खाला मार टोणप्याचा   शहाण्याला शब्दाचा मार   turnout   polya's theorem (2)   precription   pre-formation   assocition   authoriatative   आल्याड   सिकारा   वोढदाम   दळी   दुसेनरे   चुकोट   टिंपरें   टिपरुं टिंपरुं   संवसारस   active principles   converyance   compound rate   xanthine   आबखुरा   खो॥   कवाळा   कांटालें   उबगवटु   इक्लीम   इराडें   कुंभ्या   कुर्टें   कुर्ठे   घागर्‍या गोचिड   घोषी   सालफण   बवाशिर   झंबाद   दुवारणी   भंडवाण   रिंच्छोली   भोंगळें   पाताळ लव्हाळा   चोथों   चौंचें   चिड   चिडा   चिनचिनी   चिलीबिली   धनुर्ध्वज   ताळचे   झुरडी   टेपशी   सादट   शिडशिडा   referral   strategies   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP