लग्न

ना.  पाट , पाणिग्रहण , लगीन , विवाह , शरीरसंबंध , शादी , शुभमंगल , शुभविवाह , सोयरीक .
Marriage or matrimony: also nuptials or a wedding. v कर, हो. 2 The marriageunion as effected at the auspicious juncture. v लाव, लाग. 3 The oblique ascension; the divisions of the equator as rising in succession with each sign in an oblique sphere. लग्न नाहणें To undergo the ablutions and other ceremonies prescribed for the subject of the rite of marriage. लग्नाचा That is united in wedlock;--used of the husband or of the wife.
lagna p S Joined to or connected with. 2 fig. Attached to or applying to; set upon or towards; assiduously engaged in.
 न. 
सोयरिक ; शरीरसंबंध ; विवाह . ( क्रि० करणे . होणे ).
मुहूर्तावर केलेला विवाहसमारंभ . ( क्रि० लावणे ; लागणे ).
ऐक्य ; साहचर्य . मग लग्नी जेवि ॐ कारु । बिंबीचि विलसे । - ज्ञा ८ . ११६ .
योग ; मुहूर्त ; समय . - ज्ञा १६ . ३०३ . हनुमान प्रभुला भेटे ज्या लग्नी फार चारुते । - मोरामायणे पृ . ६ .
क्रांतिवृत्तातील प्रत्येक राशीबरोबर एकामागून एक वर येणारा विषुववृत्ताचा विभाग ; विवक्षित काली उदयाचलाशी संलग्न असणारा राशि .
राशीचा उदयकाल ; राशीत सूर्याचा गमनकाल ( अहोरात्रांत एकंदर बारा राशींची बारा लग्ने होतात ). उदा० मेष - वृषभ लग्न , उदय - अस्त लग्न . - वि .
संयुक्त ; संबद्ध ; चिकटलेले .
( ल . ) निरत ; आसक्त ; तल्लीन . [ सं . ] ( वाप्र . )
०नाहणे   विवाहविधींत सांगितलेली नहाणी व दुसरे संस्कार करुन घेणे . सामाशब्द -
०क  पु. हामीदार ; जामीन .
०कळा  स्त्री. लग्नसमारंभामध्ये नवरीच्या चेहर्‍यावर दिसणारे किंवा दिसतेसे वाटणारे तेज , टवटवी .
०कार्य  न. मंगल कार्य ( लग्न , मुंज गर्भाधान इ . ) [ सं . ]
०कुंडली  स्त्री. जन्मकाली पूर्वेकडे उदय पावलेल्या राशीचा दर्शक अंग पहिल्या घरात मांडून तेथून डावीकडे क्रमाने प्रत्येक घरांत तदनुरोधाने राशि व त्या राशींचे ग्रह लिहून तयार केलेले बारा घरांचे कोष्टक . [ सं . ]
०गंडांत  पु. कर्क - सिंह , वृश्चिक - धनु व मीन - मेष या लग्नांच्या संधीची एक घटका ( जसे , कर्काची शेवटची अर्धी व सिंहाची पहिली अर्धी मिळून एक ). [ सं . ]
०गीत  न. विवाहगीत ; मंगलाष्टक . [ सं . ]
०गोष्ट   गोष्टी - न . एव . अव .
एखाद्याचा विवाह किंवा दुसरा एखादा इष्ट हेतु सिद्धीस जाण्याकरितां त्या मनुष्याची केलेली शिफारस , प्रशंसा . जसे - नोकरी नसली म्हणून काय झाले , तो मुलीवर पांचशेर सोने घालील अशी आमची खात्री आहे . हा चांगला पतीचा माणूस आहे , याला हजार रुपये कर्जाऊ दिले तरी चिंता नाही इ०
अनुरागाची पोकळ किंवा निरर्थक बोलणी ; मदतीची आश्वासने .
०घटिका   घटका - स्त्री .
लग्न किंवा मुंज लावण्याकरितां ज्योतिःशास्त्रांत शुभ म्हणून सांगितलेला मुहूर्त , वेळ .
मुहूर्त साधण्याकरितां पाण्यांत टाकलेले वेळ मापण्याचे अर्धगोलाकृति भांडे ; घटिकापात्र .
असा निश्चित केलेला आणि साधलेला काल , मुहूर्त .
( ल . ) अणीबाणीची वेळ , प्रसंग ; कांही करुन अडचण पार पाडलीच पाहिजे अशी वेळ . ब्राह्मण तर जेवावयास बसले , घरांत तूप नाही अशी लग्नघटिका खोळंबली आहे म्हणून तुमच्याकडे धांवत तूप मागावायस आलो . [ सं . लग्नघटिका ]
०घर  न. 
ज्यामध्ये लग्नसमारंभ चालला आहे ते घर ; जानोशाचे घर .
( ल . ) लग्नांतल्याप्रमाणे माणसांनी गजबजलेले , फार गडबड चालली आहे असे घर .
लग्नासारखा भरमसाट खर्च चालला आहे , आनंदी आनंद आहे असे घर .
०चिटी   ठी ठ्ठी स्त्री .
लग्नाचा परवाना ( सरकारकडून शूद्रादिकांस मिळत असलेला ).
लग्नमुहूर्त ज्यांत आहे असा जोशाने केलेला कागद .
लग्न - मुंजीची आमंत्रणपत्रिका ; कुंकोत्री .
०चुडा   चूडा - पु . लग्नांत नवरीस व तिच्या बाजूच्या वर्‍हाडणीस बांगड्या इ० भरण्याचा विधि . हा घाण्याच्या पूर्वी होतो .
०टका   क्का पु . लग्न लागल्याबद्दल घेण्यांत येणारा सरकारी कर ( हा शूद्रांकडून घेण्यात येई ).
०टीप  स्त्री. लग्नाच्या मुहूर्ताची यादी .
०तीथ  स्त्री. ज्या तिथीस लग्नाचा मुहूर्त येतो ती तिथि . [ सं . लग्नतिथि ]
०थर   पुन . लग्नासाठी घेतलेले कापडचोपड . थर पहा . [ दे . ]
०नक्षत्र  न. लग्नास शुभ असलेले नक्षत्र . [ सं . ]
०पत्रिका  स्त्री. वधूवरांच्या पत्रिकांवरुन लग्नाचा शुभ मुहूर्त नक्की करुन उभय कुलांच्या उल्लेखासह तो ज्यावर लिहून ठेवतात तो कागद . लग्नापूर्वी याची पूजा करतात . [ सं . ]
०प्याला  पु. ( तेली ) नवर्‍यामुलाने लग्नासाठी मुलीकडे जाण्याचा समारंभ ; वरघोडा . - बदलापूर २६९ .
०भुज  पु. ( ज्यो . ) मेषादिक लग्नाचा भुज ; चारकांड .
०मंडप  पु. लग्नसमारंभाकरितां उभारलेला मांडव . [ सं . ]
०मास  पु. लग्न करण्यास शुभ म्हणून सांगितलेला महिना ; लग्नाचा मोसम . [ सं . ]
०मुहूर्त  न. 
लग्नास शुभ अशी वेळ , मुहूर्त . याचे दिवा , गोधूल किंवा गोरज आणि रात्रौ असे तीन प्रकार आहेत .
( लग्न आणि मुहूर्त = मोहतर , कमी दर्जाचे लग्न ). लग्नकार्य पहा . [ सं . ]
०वेळा  स्त्री. लग्नघटिका ; लग्न लावण्याची वेळ . त्रिवेणीसंगमी तिसी साधियेली लग्न वेळा । - मध्व ३९१ .
०शिष्टाई  स्त्री. लग्नाची मध्यस्थी ; लग्नासंबंधीचे बोलणे ; लग्न जुळविणे .
०शुद्धि  स्त्री. चिंतिल्या कार्याच्या आरंभाकरितां राशींची निर्दोषता , शुभता . [ सं . ]
०सराई  स्त्री. लग्नाचा हंगाम , मोसम ( मार्गशीर्षापासून ज्येष्ठ महिन्यापर्यंत ).
०साडा  न. 
लग्नांत वधू पक्षाकडून वराच्या आईस देण्यांत येणारे लुगडे .
( कांही प्रांतात ) वराकडून वधूस देण्यांत येणारे उंची वस्त्र ( पैठणी ). सोहळा , सोहाळा - पु . लग्नसमारंभातील मेजवान्या , उत्सव इ० ; विवाहोत्सव . लग्नसोहळा ते वेळी । चार दिवस जाहाला । लग्नाऊ - वि . लग्नाच्या प्रसंगास उपयोगी , योग्य ( अहेरी वस्त्र इ० ). लग्नाचा - वि . लग्नाच्या संबंधाचा ( नवरा , बायको ). लग्नाक्षता - स्त्रीअव . लग्नांत वराने व वधूने परस्परांवर टाकलेले तांदूळ . ( सामा . ) लग्नविधि . लग्नीक - वि . ( गो . ) बांधलेला . लग्नक पहा . कुटुंबाचा मालक आपल्या वहिवाटाचा हिशेब देण्यास लग्नीक आहे . - गोमांतक रीतीभाति ११ . [ सं . लग्नक ]
  Marriage; a wedding.
  Joined to.

Related Words

लग्न   लग्न केल्याशिवाय पिशे वचना, पिशे गेल्याशिवाय लग्न जाईना   पिड्‌डुक नाथिल्लें लग्न   लग्न म्हणतें करुन पाहा आणि घर म्हणतें बांधून पाहा   हाडांशी लग्न लावणें   लग्न-लग्न काढणें   चलियेक चोवंच्याक गेलेलो चलो, लग्‍न करनु घेवनु आयलो   लग्‍न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें   असें लग्न लागुंक, व्होंक्ले जालें हागुंक   लग्न केलें दवडीनें (घाईनें), रडत बसले सवडीनें (सोयीनें)   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन   लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें   घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा   ऋण काढून सण-लग्न करणें   घाईने लग्‍न करणें, पश्र्चात्ताप पावणें   यवनी-यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न   हुंडा-हुंडा घेऊन लग्न करणें, कंटकशय्येवर निजणें   कशास नाहीं ठिकाण बुधवारचें लग्‍न   वर वर मिळताः लग्न कोण करता   कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्‍न   कशास ठिकाणा नाहीं आणि बुधवारी लग्‍न   नवर्‍यास नाहीं थांग, बुधवारचें लग्न   रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी   मामुंजी मामुंजी ! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा   सालझाडा-सालझाडे झाले आणि लग्न आटोपलें   घोड्याचे लग्‍न आणि तट्टाचे बारसें   शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा   हळकुंडासाठीं लग्न मोडणें   लग्न घटिका खोळंबणें   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   लग्न नाहणें   बदलाचें लग्न   घर म्‍हणते बांधून पहा, लग्‍न म्‍हणतें करून पहा, व गुर्‍हाळ म्‍हणते लावून पहा   गोंधळ-गोधूल लग्‍न   अर्ध्या हळकुंडानें लग्न मोडणें   हातांत नाहीं चवली लग्न करावयास धांवली   धरणीचें लग्न   कशास नाहीं ठिकाण आणि बुधवारचें लग्न   नवरानवरींचे बाशिंग हरवलें, लग्न तसेंच राहिलें   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   द्रव्याशा धरिती, मूर्खाशीं लग्न लाविती   आईचे लग्न, बापाची मुंज, एकांत एक उरकून घेणें   घरची पोरें बोंबा मारतात आणि भाचा म्‍हणतो माझे लग्‍न करा   दणक्याचें लग्न   आदित्यवारी लग्न, सोमवारी या   अर्ध्या हळकुंडानें लग्न मोडणें   असें लग्न लागुंक, व्होंक्ले जालें हागुंक   आईचे लग्न, बापाची मुंज, एकांत एक उरकून घेणें   आदित्यवारी लग्न, सोमवारी या   ऋण काढून सण-लग्न करणें   कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्‍न   कशास ठिकाणा नाहीं आणि बुधवारी लग्‍न   कशास नाहीं ठिकाण आणि बुधवारचें लग्न   कशास नाहीं ठिकाण बुधवारचें लग्‍न   गोंधळ-गोधूल लग्‍न   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   घरचा मारतो मुठा नि भाचा म्‍हणतो लग्‍न करा   घरची पोरें बोंबा मारतात आणि भाचा म्‍हणतो माझे लग्‍न करा   घर म्‍हणते बांधून पहा, लग्‍न म्‍हणतें करून पहा, व गुर्‍हाळ म्‍हणते लावून पहा   घाईने लग्‍न करणें, पश्र्चात्ताप पावणें   घोड्याचे लग्‍न आणि तट्टाचे बारसें   चलियेक चोवंच्याक गेलेलो चलो, लग्‍न करनु घेवनु आयलो   दणक्याचें लग्न   द्रव्याशा धरिती, मूर्खाशीं लग्न लाविती   नवर्‍यास नाहीं थांग, बुधवारचें लग्न   नवरानवरींचे बाशिंग हरवलें, लग्न तसेंच राहिलें   पिड्‌डुक नाथिल्लें लग्न   बदलाचें लग्न   मामुंजी मामुंजी ! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा   यवनी-यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न   रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   लग्‍न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें   लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें   लग्न केलें दवडीनें (घाईनें), रडत बसले सवडीनें (सोयीनें)   लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन   लग्न केल्याशिवाय पिशे वचना, पिशे गेल्याशिवाय लग्न जाईना   लग्न घटिका खोळंबणें   लग्न नाहणें   लग्न म्हणतें करुन पाहा आणि घर म्हणतें बांधून पाहा   लग्न-लग्न काढणें   वर वर मिळताः लग्न कोण करता   शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा   सालझाडा-सालझाडे झाले आणि लग्न आटोपलें   हुंडा-हुंडा घेऊन लग्न करणें, कंटकशय्येवर निजणें   हळकुंडासाठीं लग्न मोडणें   हाडांशी लग्न लावणें   हातांत नाहीं चवली लग्न करावयास धांवली   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
 • लग्नातील गाणी
  लग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.
 • संग्राहिका - सौ. मीनाक्षी दाढे
  लग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.
 • संग्राहिका - सौ. यशोदा पाटील
  लग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.
 • संग्राहिका - सौ . कुमुदिनी पवार
  लग्नात मुली, स्त्रीया, आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.
 • लग्नातील गाणी - संग्रह १
  लग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.
 • लग्नातील गाणी - संग्रह २
  लग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.
 • लग्नातील गाणी - संग्रह ३
  लग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.
 • लग्नातील गाणी - संग्रह ४
  लग्नात मुली, स्त्रीया,आजीबाई मोठ्या उत्साहाने गाणी म्हणत.
 • लग्नातील उखाणे
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
 • संग्रह १ ते २०
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
 • संग्रह २१ ते ४०
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
 • संग्रह ४१ ते ६०
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
 • संग्रह ६१ ते ८०
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
 • संग्रह ८१ ते १००
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
 • संग्रह १०१ ते १२०
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
 • संग्रह १२१ ते १४०
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
 • संग्रह १४१ ते १६०
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
 • संग्रह १६१ ते १८०
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
 • संग्रह १८१ ते २००
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
 • संग्रह २०१ ते २२०
  लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person