|
स्त्री. दाटी ; जमाव ; सैन्याची झुंड . ' त्यांची कार्य सिद्धि होऊन गाडे जोतून जात होते तो आपली भीड पोहोंचली .' - पेद २९ . २०९ . ( भिडणें ) न. सुताराचें एक हत्यार ; सांधे दाबून बसविण्याचें हत्यार . खोवणदाते एकमेकांत भिडेनें दाबून बसवावे . - मॅरट ५९ . [ भिडणें = जोडणें ] भीडका - पु . अस्त्रविशेष . भीड पिल पिल - न . ( सुतारकाम ) दोन फळ्यांत सुरसे बसवतांना दाबून धरण्याचें साधन . [ भिडणें ] स्त्री. स्त्री ( ल . ) विरलता ; टंचाई ( महागाई मुळें होणारी ). आज बाजारांत नाण्याची फार भीड आहे . आदर ; मान ; मुरवत ; चाड ; मान्यतेचा , आदराचा भाव . ( क्रि० धरणें , राखणें , ठेवणें , उडणें , जिंकणें , सुटणें इ० ). दरबारांत तुमची भीड आहे म्हणून साहित्यपत्र द्यावें . दाटी ; गर्दी ; चेपाचेप . देवळांत मनुष्यांची फार भीड झाली आहे . [ भिडणें ? ] वशिला ; वजन . गोपाळराव तुम्ही थोडी भीड खर्च करा म्हणजे नोकरी मिळेल . आग्रह . दादांची भीड पडली म्हणून जेवावयास गेलों . लाज . राक्षस न धरील आमुची भीड । - मोभीष्म ५ . ५९ . भीति . श्रवण तरि करा मज जें सुचलेसे तेंचि भीड तोडूनी । - मोसभा ५ ४७ . [ सं . भीत ? ] ०खरचणें क्रि . आपणाविषयीं दुसर्याच्या मनांत असलेल्या आदरबुद्धीच्या जोरावर त्याला कांहीं विनंति करणें ; त्याच्याजवळ कांहीं तरी मागणें . ऐसें भावूनि मनांत । भीड खरचिली दिवाणांत । ०घालणें भिडेस घालणें - क्रि . एखाद्याचा आपणाविषयीं जो आदर असतो त्याच्या बळावर त्याला विनंति , आग्रह करणें ; आर्जव , स्तुति इ० उपायांनीं अनुकूलता मिळविणें . न घालिन भिडेस मी जरिहि कार्यलोभी तिला । - केका १० . ०घेणें क्रि . ( राजा . शेती ) खाचरा ( खाजणा ) स बाहेरुन मातीची पुस्ती देणें . ही दिली असतां पाणी झिरपत नाहीं . ०चेपणें मरणें - क्रि . अतिपरिचयाच्या योगानें भीति , दरारा नाहींसा होणें ; घरच्याप्रमाणें वाटूं लागणें . ०चेपणें क्रि . एखाद्याच्या मनांतील भीति , पूज्यता , आदर दाबणें , निगृहीत करणें . ०धरणें क्रि . मान देणें ; मोजणें ; आदरानें , मान्यतेनें वागविणें ; लाजणें ; भिऊन , वचकून असणें ; मर्यादेचें अतिक्रमण न व्हावें म्हणून जपणें . ०न - क्रि . मनांत नसतांहि दुसर्याच्या आग्रहाला बळी पडणें . तुटणें - क्रि . मनांत नसतांहि दुसर्याच्या आग्रहाला बळी पडणें . ०वागविणें क्रि . भीड धरणें . श्रुतिनिष्ठांचीहि भीड वागविशी । - भक्तमयूरकेका पृ . १४ . भिडेला गुंतणें क्रि . भिणें ; संकोच बाळगणें ; कचरणें ; आग्रहाला बळी पडणें ; मन न मोडणें . भिडेचा वि . मान्य ; आदरणीय . सामाशब्द - ०कर करी खोर सर सरु सारु शील साळू सूळ - वि . आदरशील ; पूज्यता बाळगणारा . भिडस्त ; लाजाळू ; विनयशील . साधू होय भीडखोर । - विपू ७ . ८९ . ०भाड मर्यादा मुरवत मुर्वत भीक - स्त्री . पूज्यता ; मान ; मान्यता . संकोच ; मुर्वत ; पर्वा . ( क्रि० धरणें , राखणें , करणें , ठेवणें , असणें ). भीडस - वि . भिडस्त . आपण चित्तांत फार भीडस ती । - मोआदि १५ . ५१ . भिडस्त , स्थ , भिडिस्त , भिडा - वि . दुसर्याच्या मतांस , मर्जीस मान देणारा . लाजाळू ; सभाभीरु ; सलज्ज . तेलणीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा । - तुगा ३२८४ . भिडावणें - अक्रि . दरारा , मान यानें दडपला जाणें ; पराकाष्ठेची भीड पडणें .
|