Dictionaries | References

भाऊ

   
Script: Devanagari
See also:  भाऊजी , भाओ , भाओजी , भावू , भावूजी , भावूबंद

भाऊ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhāū or bhāūjī m A term of respectful compellation or mention for a husband's brother.
A brother. Pr. आले भाऊ कोल्हे भाऊ Used of a multitude of relatives and acquaintances flocking in when not wanted. 2 A cousin or near relative, a kinsman. 3 An associate, a fellow, one following the same business; a comrade, condisciple, coreligionist &c., a brother 4 भाऊ is a respectful affix to proper names; as हरी- भाऊ, बाळाभाऊ.

भाऊ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A brother. A respectful affix to proper names. A kinsman: an associate.
आतेभाऊ कोल्हेभाऊ   Used of a multitude of relatives flocking when not wanted.

भाऊ     

ना.  दादा , बंधू , बांधव , भाई , भ्राता , सहोदर .

भाऊ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आईवडिलांचा किंवा काका, मामा आत्या, मावशी यांचा मुलगा   Ex. माझा भाऊ प्राध्यापक आहे.
HYPONYMY:
आतेभाऊ मावसभाऊ सख्खा भाऊ सावत्र भाऊ धाकटा भाऊ चुलत भाऊ मामेभाऊ मोठा भाऊ
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बंधू भ्राता बांधव
Wordnet:
asmভাই
bdआदा
benভাই
gujભાઈ
hinभाई
kanತಮ್ಮ
kasبوے
kokभाव
malസഹോദരന്‍
mniꯃꯌꯥꯝꯕ
nepभाइ
oriଭାଇ
panਭਰਾ
tamசகோதரன்
telసోదరుడు
urdبرادر , بھائی , اخ

भाऊ     

संबोधन . ( खा . ) अहो . [ सं . भो - भात्रै ७ . १ ते ४ . ]
 पु. 
बंधु ; भ्राता . मग जगदीश्वर तेथुनि त्याचा विनवावयासि भाउ निघे । - मोउद्योग ७ . ३४ .
( सांकेतिक ) चुलतबंधु , मामेबंधु , आतेबंधु , मावसबंधु इ० जवळचा नातेवाईक .
एकच धंदा , संस्था , व्यवसाय इ० तील माणसें ; दोस्त ; सहकारी .
एक बहुमानार्थी उपपद . जसें - हरीभाऊ , बाळाभाऊ इ०
सदाशिवराव पेशवे . - पया १४८ . परशुराम त्रिंबक पटवर्धन . - पया ४९५ . [ सं . भ्रातृ ; प्रा . भाउ ]
०गर्दी  स्त्री. 
( पानिपत येथें भाऊसाहेब पेशवे यांनीं घनघोर युद्ध केलें त्यावरुन ल . ) निकराचें युद्ध ; सव्वा लक्ष फौजेनिशी भाऊगर्दी होऊन प्यादेमात कशी झाली . - भाब १ .
( ल . ) अंदाधुंदी ; धामधूम . सवेचि झाली भाऊगर्दी । - अफला ६५ . [ भाऊ + फा . गर्दी = नाश ]
०पण   पणा बंद बंदकी बंदी - नपुस्त्री .
बंधुत्वाची वागणूक .
बंधुत्वाची स्थिति , संबंध .
( यावरुन ल . ) मित्रत्वाचें , सलगीचें नातें ; सख्य .
भावाभावांतील वितुष्ट , तंटा .
०बंद  पु. नातेवाईक ; दायाद ; आप्त .
०बहिणी  स्त्री. एक मुलींचा खेळ . - मखेपु २९६ .
०बीज  स्त्री. कार्तिक शुद्ध द्वितीया . या दिवशीं बहीण भावास बोलावून त्याचा सन्मान करते व भाऊ तीस द्रव्यवस्त्रालंकारादि ओवाळणी घालतो . [ भाऊ + बीज = द्वितीया ]
०वळ  स्त्री. भाऊबंदांच्या क्रमानें वतनाचा प्राप्त होणारा भोगवटा . [ भाऊ + आवलि ] भाऊवळीनें असाहि प्रयोग रुढ आहे . भाऊजी , भाओजी , भाऊ , पु .
नवर्‍याचा भाऊ ; दीर .
बहिणीचा नवरा .
नवर्‍याचा मित्र ; दीराप्रमाणें असणारा इसम .
( कों . ) बायकोचा भाऊ ; मेहुणा . [ भाऊ + जी = आदरार्थी प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP