|
पु. टोळी ; जमाव ; मंडळी . गजांचिया थाटावरि । सिंह चालती जया परी । - गीता १ . ३३२ . थाट पुढे शत्रुचा देखोन हाट करुनीयां ताठ तुरुंगा । - ऐपो १२१ . [ प्रा . दे . थट्ट = समूह ] पु. छपराची ताटी किंवा शाकारण्याकरितां तयार केलेली साटी . [ ताट - टी ] पु. डौलाचा , दिखाऊ थाटमाट , रचना ( सैन्य , डेरे , थवे , ढग , पिके इ० ची ). ( सामा . ) डामडौल ; शोभा ; भव्यपणा ; ऐट ; वैभव ; दिखाऊपणा . बोलण्याचा - गाण्याचा - वाजविण्याचा - नाचण्याचा - सभेचा - मंडपाचा - थाट . [ सं . स्था ] ( वाप्र . ) थाट करणे - नटणे . पु. ( संगीत ) सात सुरांची रचना ; स्वरानुरोधाने रागाचे वर्गीकरण . वि. दाट व घट्ट विणीचा ( कपडा , दोरा इ० ). २ ( ल . ) घट्ट ; खंबीर ; बळकट ( मनुष्य , प्राणी ). ३ साधा ; निखालस ; खडखडीत . [ फा . तट्ट ] न. ( खा . ) ताट . ०बसणे ( घोड्यावर ) ताठ , सरळ रेषेत जुळणी . २ ( राहण्याच्या हेतुने , सुखवस्तीसूचक ) व्यवस्थेशीर मांडणी ( सामानाची , कामाची ); व्यवस्थित मोठा पसारा . ( क्रि० करणे ; पडणे ; बसणे ). ३ पोशाख , अलंकार घालणे ; नटणे . ) एखाद्या प्रसंगाकरतां ); डौलाने बाहेर पडणे ; डौल ; शोभा ; दिखाव .
|