|
मराठी व्यंजनमालेंतील पस्तीसावें अक्षर . हें क् आणि ष् या दोन व्यंजनांच्या संयोगानें झालेलें आहे . अक्षरविकास -- याच्या पांच अवस्था आढळून येतात . पहिली इ . स . २ र्या शतकांतील रुद्रदामन् च्या गिरनार लेखांअ , तिसरी इ . स . ४ थ्या शतकांतील अलाहाबादच्या समुद्रगुप्ताच्या शिलालेखांत , चौथी इ . स . ६ व्या शतकांतील एका ताडपत्रांत व पांचवी इ . स . १३ व्या शतकांतील चिरवा लेखांत आढळते .
|