क्ष

क्षण

ना.  अगदी थोडा वेळ , निमिष , पळ .
Bráhman, in order to summon him to the Shráddh formally. This is one of the कर्में or ceremonies composing this obsequial rite. 4 The fibre of दर्भ presented to a Bráhman on inviting his attendance at a Shráddh. In modern day it is given to him after his arrival at the house. v दे, घे. Hence the word comes to signify श्राद्धभोजन; as ब्राह्मण क्षणास बसला -आला -गेला &c. न लागतां क्षण In less than a moment.
 पु. १ एका मुहूर्ताचा बारावा भाग . ४ मिनिटें ; ३० कला . २ सूक्ष्म काळ ; किंचित , थोडा वेळ ; पळ ; निमिष . ३ श्राध्दाच्या आमंत्रणाकरितां ब्राह्मणाच्या हातावर द्यावयाचे दर्भ . ( यावरून ) ४ ब्राह्मणास श्राध्दाचें आमंत्रण . ( क्रि० देणें ; घेणें ). ५ श्राध्दभोजन . ब्राह्मण क्षणास बसला - आला - गेला . [ सं . ] क्षणनें , क्षण देणें - सक्रि . श्राध्दाकरितां हातांत दर्भ देऊन ब्राह्मणास आमंत्रण करणें .
०प्रभा  स्त्री. वीज ; विद्युल्लता . मेघी स्थिरावली क्षणप्रभा ।
०बुध्दि वि.  चंचल , अस्थिर , अनिश्चित , मनाचा , बुध्दीचा .
०भंगुर वि.  एका क्षणांत नाश पावणारा , मोडणारा ; नाशवंत ; अशाश्वत ; क्षणिक . अनुभविलेलें क्षणभंगुर सर्वहि जें सुज्ञजन पहातात । - मोभीष्म १ . १४ .
०भर   भरि भरी - क्रिवि . ( काव्य ) थोडा वेळ ; एक क्षण कालापुरतें ; पळभर ; तिळभर . दोघांस न विसंबे क्षणभरी ।
०विध्वंसी वि.  ( एका क्षणांत विध्वंस होईल असा ) क्षणभंगुर ; नश्वर . क्षणाक्षणां , क्षणीं , क्षणोक्षणीं - क्रिवि . प्रत्येक क्षणास - क्षणीं ; पावलोपावलीं . परापेक्षा होऊं नये क्षणाक्ष्णा । - दा १४ . १ . २३ . क्षणावधि - पु . थोडा वेळ ; एक क्षण टिकणारें ; अल्प काळ राहणारें ; नाशवंत ; नश्वर ; चंचल . अपेक्षिजे राज्यसुख । जया लागीं तें तंव क्षणिक । - ज्ञा १ . २६३ . क्षणिक बुध्दि - वि . क्षणबुध्दि ; चंचल वृत्तीचा - मनाचा . क्षणिक बुध्दि , क्षणिक मति , क्षणिक कल्पना , क्षणिक विचार , क्षणिक निश्चय - स्त्री . पु . थोडा वेळ टिकणारी बुध्दि , मति , इ० ; चंचलपणा ; अस्थिरपणा . क्षणेक , क्षणैक - क्रिवि . ( काव्य ) एक क्षण ; थोडा वेळ . क्षणेक तेणें मग ती रुसावी । - सारुह २ . ३० .
 m  A measure of time equal to 4 minutes. A moment.
न लागतां क्षण   In less than a moment.