-
स्त्री. १ उत्कृष्टता ; नामीपणा ; लज्जत ; गोडी ; स्वाद ; चवदारपणा ; रुचि ; उत्तेजक किंवा संतोषदायक गुण ( मुख्यत्वें खाद्य व वास यांसंबंधी ); खुमाच अर्थ २ पहा . ' या आमच्या साध्या वनभोजनांत कांहीं विशेष खुमारी यावी ...' - पाव्ह ४६ . २ मौज ; मजा ; आकर्षक दृश्य ; सौंदर्य . ' दाखवी किती थरकाउन गेंद खुमारी । ' - प्रला २०७ . ३ खुबी ; मर्म . ४ ( गो .) ईर्षा . ( अर . खुमार - दारुचा कैफ , निशा . ही मन उल्हसित करते , त्यावरुन मन उल्लसित करणार्यां पदार्थ्याच्या चवीस म्हणतात .)
-
ना. गोडी , चव , नामीपणा , माधुरी , रुची , लज्जत , स्वाद ;
-
ना. खुबी , मर्म , विशेषता ;
-
f Excellence, pleasing quality.
Site Search
Input language: