मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अलब्ध्वा न विषीदेत काले कालेऽऽशनं क्वचित् ।

लब्ध्वा न हृष्येद्धृतिमानुभयं दैवतंत्रितम् ॥३३॥

सहस्त्र घटीं भरल्या जळ । बिंबे एकचि चंद्रमंडळ ।

तेवीं निजात्मा एक केवळ । भूतीं सकळ भूतात्मा ॥२३०॥

देखे भूताकृति ज्या भिन्न । त्याही परमकारणीं अभिन्न ।

जेवीं अळंकारीं सुवर्ण । आकारींहीं जाण भिन्नत्वं नाहीं ॥३१॥

जेवीं मृत्तिकेचीं गोकुळें केलीं । नानाकारीं पूज्य झालीं ।

परी ते मृतिकाचि संचली । तेवीं भूतें भासलीं भगवंतीं ॥३२॥

का विणोनियां सुतें सुत । शेला परकळा पातळ म्हणत ।

तैशी वस्तूचि वस्तुत्वें येथ । साकार भासत भवरूपें ॥३३॥

एवं साकार निराकार । उभयतां ब्रह्मचि साचार ।

ऐसा ज्याचा ज्ञाननिर्धार । त्याचा `आहार' तूं ऐक ॥३४॥

आहार न मिळे जिये काळीं । दुःखी नव्हे तिये वेळीं ।

अन्नालागीं न तळमळी । धारणाबळीं बलिष्ठ ॥३५॥

आहार मिळाल्या उत्तम । हरिखेजेना मनोधर्म ।

दैवाधीन जाणे वर्म । निजकर्मप्राप्तीसी ॥३६॥

एवं प्राप्ताप्राप्ताची कथा । जाणे दैवाधीन तत्त्वता ।

यालागीं हर्षविषादता । त्याचे चित्ता स्पर्शेना ॥३७॥

दैवाधीन प्राप्ती प्राणियांसी । ऐसे सत्य कळलें ज्यासी ।

तैं भिक्षेसी कां हिंडणें म्हणसी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP