मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक १ ला

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रीभगवानुवाच-

वनं विविक्षुः पुत्रेषु भार्यां न्यस्य सहैव वा ।

वन एव वसेच्छान्तस्तृतीयं भागमायुषः ॥१॥

आतां क्रमेंचि निरूपण । वानप्रस्थाचें आलें जाण ।

त्यासी वनास निघावया कारण । आयुष्यलक्षण विभाग ॥१०॥

`शतायुःपुरुष'-मर्यादा श्रुती । त्याच्या तृतीयभागाची स्थिती ।

सासष्टी क्रमिल्याअंतीं । वनाप्रती निघावें ॥११॥

निघावया वनाप्रती । भार्या देऊनि पुत्राचे हातीं ।

आपण निघावें शीघ्रगतीं । वानप्रस्थीं वनवासा ॥१२॥

भार्या साध्वी पतिव्रता सती । ईश्वरस्वरूप मानी पती ।

भ्रतार निघतां वानप्रस्थीं । जे पुत्राप्रती राहेना ॥१३॥

सांडितां भ्रतारसेवेसी । कल्पांत हों पाहे जिसी ।

जे भ्रतारचरणांची दासी । ते सवें वनासी आणावी ॥१४॥

जो पुरुष स्त्रीसमवेत । वनीं झाला वानप्रस्थ ।

तेणें स्त्रीकामासी अलिप्त । व्हावें दृढव्रत ते आश्रमीं ॥१५॥

जो वानप्रस्थवनवासी । तेणें दृढ धरावी शांति मानसीं ।

नातळावें कामक्रोधासी । हेही व्रत त्यासी आवश्यक ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP