मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


बहिर्जलाशयं गत्वा तत्रोपस्पृश्य वाग्यतः ।

विभज्य पावितं शेषं भुञ्जीताऽशेषमाहृतम् ॥१९॥

ग्रामाबाहेर गंगातीरीं । अथवा तडागाचे परिसरीं ।

भिक्षा धरोनियां करीं । आचमन तीरीं करावें ॥१६॥

याचित जें भिक्षेचें अन्न । तें द्वादशप्रणवें अभिमंत्रून ।

तेणें मंत्रोदकें प्रोक्षीतां जाण । होय पावन पवित्र ॥१७॥

चतुर्धा करावें त्या अन्नातें । चार अधिकारी त्या भागतें ।

ब्रह्मा विष्णु अर्क आणि भूतें । अर्पण तेथें अवधारीं ॥१८॥

विष्णुकल्पित जो भाग । तो जळीं घालावा साङ्ग ।

भूतकल्पित जो विभाग । तो पृथ्वीवरी चांग ठेवावा ॥१९॥

उरले जे विभाग दोनी । यतीसी अधिकार सेवनीं ।

दीन मागों आलिया ते क्षणीं । भूतदयागुणीं अन्न द्यावें ॥१२०॥

परी मी एक अन्नदाता । हें आठवोंही नये चित्ता ।

आल्या दातेपणाची अहंता । अधर्मता संन्यासीं ॥२१॥

मधुकरीचें अवघेंचि अन्न । समयीं मागों येती दीन ।

येणें उद्देशें अधिक अन्न । सर्वथा जाण मागों नये ॥२२॥

करितां मधुकरीभोजन । ठायीं अधिक उरलिया अन्न ।

तें सांडितां अतिपतन । अवघेंच जाण भक्षावें ॥२३॥

संन्यासधर्मीं लघु आहार । नित्य करावा निरंतर ।

अधिक आहारीं विकार । निद्रा आळस फार बाधिती ॥२४॥

ज्यालागीं कीजे चतुर्थाश्रम । तो संन्याशाचा मुख्य धर्म ।

स्वयें सांगे पुरुषोत्तम । जेणें आत्माराम पाविजे ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP