मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड|

स्वर अंतरंगाचे - निती

काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड


गरीबीला हात । धर्माला साथ
कर्तव्याशी नातं । माणुसकीशी प्रीत
हेची आमुची रीत ॥१॥

कष्ट करण्या तत्पर । त्यासाठी आग्रेसर
सर्व प्रपंचावर भर । थाटात करी संसार
हे घरासम घर ॥२॥

जे एकनिष्ट नेते । विधायक राज्यकर्ते
देशहिता जीवनदाते । पितामह राष्ट्र पिताते
तेथे नतमस्तक होते ॥३॥

जो उगारिल लाथ । लाथेला प्रति लाथ
ठोशासठोसाही पध्दत ज्याची दृष्टी तसा अंत
याची ना आम्हा खंत ॥४॥

दारुबाज जुगारी । नालायक अविचारी
चोरटे लाचखोरी । लबाडी भांडखोरी
हे नको चाले भिकारी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP