मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा|
५८८१ ते ५८९०

जनांस शिक्षा अभंग - ५८८१ ते ५८९०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥५८८१॥
चाटी आपुल्या भोवतें । मारी लातें पारिखा ॥१॥
जन भुललेंसे देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥२॥
गळ गिळितसे मासा । प्राण आशा घेतला ॥३॥
तुका ह्मणे बोकड मोहो । घरी पाहो फाटीका ॥४॥

॥५८८२॥
हात विषयाचे संगीं । नेणे सुटका अभागी ॥१॥
शास्त्रें केला लुंडा । तरी पढीयेला धोंडा ॥२॥
सर्व मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥३॥
तुका म्हणे ज्ञानगड । सुखें पावो देवा नाड ॥४॥

॥५८८३॥
तिळ तिळ पुण्य कष्टें साधियेलें । भरीं तें पडलें संसाराच्या ॥१॥
नाहीं शुद्धि देह मी कोण कोठील । करितों सांचलें काय त्याचें ॥२॥
कुटुंबाच्या भिडे पुण्याचा विकरा । आयुष्य मातेरा होय त्याचा ॥३॥
तुका म्हणे ज्यांनीं विकियेलें पुण्य । मातेचें गमन पाप लागे ॥४॥

॥५८८४॥
ऐसा कांहो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥१॥
देव ना संसार । दोहीं ठायीं नाहीं थार ॥२॥
हातीं धरुनियां जिवें । तेणें परतेंचि व्हावें ॥३॥
तुका म्हणे पीक । भूमी न देईच भीक ॥४॥

॥५८८५॥
बहु होता भला । परी रांडेनें नाशिला ॥१॥
बहु प्रवीण ते झालं । खरें खोटें वेंचे वेळे ॥२॥
नव्हे आळविता कोणी । इणें केला जगा ऋणी ॥३॥
ज्याचें त्यास नेदी देवूं । तुका ह्मणे घाली धाऊ ॥४॥

॥५८८६॥
तुम्हां झांकू वसा । परी नकळे या धसा ॥१॥
कूट खाती मागें पुढें । जाती निरयगांवाकडे ॥२॥
माझी म्हणताती कवी । पापी निशेतुनी जेवी ॥३॥
तुका म्हणे पांडुरंगा । आतां कोण लेखी जगा ॥४॥

॥५८८७॥
हरदिसां भेटी देती । दोघे जाती नर्कासी ॥१॥
माते परीस थोडी कथा । भाड घेतां न लाजे ॥२॥
घेतां देताम नर्क वास । उभयतांसी रवरव ॥३॥
तुका म्हणे निरयगांवा । जाती हांवा धरोनी ॥४॥

॥५८८८॥
काय आइकतो द्वाड । आल्या याचका बोभाट ॥१॥
नको विश्वासों यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥२॥
तैसी हेचि ह्याची जोडी । सदा बोडुक उघडी ॥३॥
तुका म्हणे न्यावें । ज्याचें त्यासी आहे ठावें ॥४॥

॥५८८९॥
सर्व सोपें आलीं त्या घरीं वस्तीला । त्याचीच घडला दोष ऐसा ॥१॥
कन्या विकुनियां घे द्रव्य मोजून । तितुका त्या जाण नर्क जाच ॥२॥
कथा आणी गाई जे कोणी विकती । तितुके त्या होती जाच बाधा ॥३॥
तुका म्हणे जया घडलिया दोन्ही । नर्काची हे खाणी भोगतील ॥४॥

॥५८९०॥
मासाचा विक्रय जाणावें तें पाप । असे वज्रलेप भविष्य हें ॥१॥
सांभाळारे पुढें ऐका तरी कोणी । बहुत जाचणी आहे पुढें ॥२॥
कन्या गौ कथा घडला विक्रय । नर्कामाजी जाय समूळेसी ॥३॥
नर्की जाच होती भोगिली विपत्ती । पुढें जन्म होती मार्जाराचे ॥४॥
पिलें चोरुनियां खात असे बोका । तुका ह्मणे लेखा पाप नसे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP