-
पु. त्रास ; दुःख श्रम , कांच ; यातना ; व्यथा . ( सामान्यत ; अनेकवचनी प्रयोग ). ( सं .)
-
०काल पु. त्रासदायक , संकटमय काळ , प्रसंग . ' जरि क्लेशकाल पातला बहुत । तरी धैर्य न सोडावें यथार्थ । '
-
०दान न. आजारी माणसाचें पुष्कळ दिवसाचें दुखणें ( पाप ) जावें म्हनुन उडीद तेल इ० चे दिलेलें दान .
-
ना. कष्ट , काच , ताप , त्रास , दगदग , दुःख , परिश्रम , पीडा , मनस्ताप , यातना , व्यथा , वेदना , हालअपेष्टा .
Site Search
Input language: