श्रीमद्विष्णुप्रभुची नमिली वरदा असी महामाया ॥
ब्रह्मांऽड शतांत जिचा योग्य न महिमा असीम हा माया ॥१॥
देवांचा शक अधिप अमुरांचा महिष करीति हे कलहा ॥
शत वर्षाऽतीं पावुनि परिभव शतमन्युचें ह्मणे बल हा ॥२॥
झाला इंद्र स्वबळेंसमरें पावोनि सौरिभ यशातें ॥
शक्रप्रमुख सुरांची विलया ने उग्र वैरि भय शोतें ॥३॥
सुर कथिति दुःख विधितें तो त्यांसह जाय हरि हरां जवळा ॥
यच्चरणांहीं केला शरणागतजनविपतिचा कवळ ॥४॥
ते कथिति इंद्र झाला महिष हरुनिया सुरऽधिकारा हो ॥
प्रभुची असुरीं न श्रीबहु मोहकरी सुराऽधिका राहो ॥५॥
लोक त्रय पति झाला बहु मोठा महिषा तो कपाळाचा ॥
विधिचाहि करितसे अधि-कार न शक्रादि लोकपाळाचा ॥६॥
आलों शरण तुहां किं भवदितर न यश उपाय चिंतुनि घे ।
तुमच्याचि दयेनें नत हृदयींचा क्षिग्र सर्व किंतु निघे ॥७॥
सुरदीनोक्तश्रवनें हरि हर हृदयात कोप ये राजा ।
प्रभु साहतिल कशा श्रित जन कुदशा सोसती न ये राज्या
प्रभुवर हरि हर वदनें झालीं सुर परिभवेंक श्रुकुंटि कुटिलें
कीं महिष तस्करें यश सर्वस्व हरुनि बळें स्व बळ लुट्लें ॥९॥
प्रकुपित हरि हर शतधृति जे या सुरनायकाननांतुन ॥
मुमहा तेज निघालें दहनाचेंकाय काननातुन ॥१०॥
शक्रादिसुरांच्या ही देहातुनि दिव्य तेज बाहेर ॥
तैसें चि निघे जें शुचि कीर्तीचें भाग्यवंत माहेर ॥११॥
तें एकवटे त्याची होय हराया सुराऽरि मद नारी ॥
तीतें पाहुनि जय जय वदले विधि विष्णु वृत्र मदनाऽरि ॥१२॥
तींचे मुख हर तेजें यम तेजें केश मस्तकीं झाले ॥
हरि तेजें भुज ज्यांच्या सज्जन सेवुनि यशोमृता घाले ॥१३॥
स्तन युग्म सोम तेजें मध्य हि ऐंद्रेंकरुनियां होय ॥
तत्तेजेंजंघोरु ज्यांच्या स्वाधीन सर्व हो तोय ॥१४॥
गुरु तर नितंबे मौमें ब्रहृयाच्या दिव्य चरण तेजानें ॥
ते सौरं शोभति करुनि रक्तांऽगुली दशक चरण ते ज्यांने ॥१५॥
हस्ताऽगुलि वसु तेजें जी सम अवयव न आन नासा जे ॥
झाली कुबेर तेजें ते बहु शोभद्य्नि आननां साजे ॥१६॥
प्राजांपसेंझाले रुचिने लाजविति अमृत रस दंत ॥
पावक तेजें नयन त्रय होय दरदयासि असदंत ॥१७॥
श्रुयुग संध्या तेजें मारु त तेजेंकरुनि कर्ण न हो ॥
जे ह्मणति श्रित दुःख श्रवण सदा तत्सुकीर्तिवर्नन हो ॥१८॥
या परि पावेंत्जें अन्यसुरांच्या हि संभवा राया ॥
जीचें क्षमें यश पंकां गंगेचें जीविं अम्म वाराया ॥१९॥
जें धरित्याच्या अरिला न स्वप्तामाजिही शिवें शिवे ते ॥
निज शुल प्रभव विजय मुल अतुल शुल दे शिव शिवतें ॥२०॥
प्राण व्यसनींजेणें गज वर रक्षुनि निवटिला नक ॥
त्या निज चक्रा पामुनि निर्मुनियां चक्रपाणि दे चक्र ॥२१॥
त्या भगवतीस भावें गो क्षीर घवल जलेश दरवर दे ॥
प्रार्थुनि ह्मणे अरीचा बाघों द्यावा न लेश दर वरदे ॥२२॥
दहन ही दे शक्ति तिला जी तेजें करुनि लाज जे वीजे ॥
देविन ह्मणे तुझे ते वाच्छीत पदार्थ आज देवी जे ॥२३॥
दे दिव्य चाप मारुत शरण पुर्ण तसे च देव तो माते ॥
स्वीकारितां शिवेनें बहु घाले पावले चि शोभा ते ॥२४॥
प्रतिपक्षे करीघटेला ज्याचा दुरुनि भावि वास वदे ॥
त्या स्वगजाची घंटा निजवज्रोप्तन्न वज्र वासव दे ॥२५॥
यमधर्म काळदंडा पासुनि दे दंड वरुन पाशातें ।
जे आपणासि दुर्जय दुर्जन त्या सर्व शत्रुनाशातें ॥२६॥
माळा प्रजापती ही देव त्या जगदंबिकेसि अक्षांची ॥
बह्माऽऽर्पित सुकमडल घे राज्ञी दुष्ट दमन दक्षांची ॥२७॥
निजकिरणांते स्थापि भानु तिच्या सर्व रोम कुंपाव ॥
दे खडग चर्म काळ क्षय व्हाया देव शत्रु भुपांत ॥२८॥
क्षीरोदधि दे अजरें वस्त्रें तैसा चि अमलं हार तिला ।
ह्मणवी रुचिने जिंकुनि बहु जींचे वदन कमल हा रतिला ॥
जो देव विश्वकर्मा त्या चतुरेंदिव्य वस्तुंच्या घटकें ॥
दिधलीं चुडामणिसह सु मणि खचित कुंडलें कटकें ॥३०॥
धवलार्ध चंद्र कंठा भरण चरण बाहु भुषणें दे हा ॥
मणिमुद्रिका हि आनख शिख भावें करुनि भुषवी देहा ॥३१॥
विमल परशु विविधाऽस्त्रें तैसें चि कवच अभेद्य देवीतें ॥
जींचे कृपा निरीक्षण अत्यद्भुत सर्व संपदे वीतें ॥३२॥
अम्लान पद्म माळा दे सिंधु उरीं शिरीं धरायास ।\
तो आपणासि दुस्तर जाड्याभोधींत उद्धरायास ॥३३॥
रत्नें देउनि दिधला मृगराज बसावया हिम्र नगानें ॥
जाया जाड्य यशाच्या चरणीं च वसावया हि मन गानें ॥३४॥
दे पानपात्र धनपंति वीर्योत्साहें वधावया अरितें ॥
न रितें व्हावें तिळ ही प्राशन कलें क्षणक्षणीं तरि तें ।३५॥
अर्पी परमप्रेमें पूजुनि सविशेष नागहार तितें ॥
भुभारऽसुर शमनेंमागे कवि शेषनाग हा रतितें ॥३६॥
अन्य त्रिदशांनीं ही सर्व स्व विभुषणायुधांनी ती ॥
सन्मानिली बहुमता जैसी प्राणाऽधिका बुधां नीती ॥३७॥
मग साऽट्टहार वार शिवा गर्जना करी राजा ॥
म्यां किति वर्णाव्या त्य अबहु कांपविती विराट शरीरा ज्या ॥३८॥
त्या सिंहवाहिनीतें जय ऐसें सर्व देवता ह्मणती ॥
स्तविती मुनि वर करिती बहु भक्ति विनम्र होऊनि प्रणती ॥३९॥
ऐकोन आः किमेतत कुपित खळ ह्मणे स सैन्य तो धावें ॥
आले सर्व न लगती दीप द्युतिला पतंग शोधावे ॥४०॥
महिषाऽसुरें भगवती धांउनि येऊनि देखिली होती ॥
सुर विभव चित्रकारें जी गगन पटांत रेखिली होती. ॥४१॥
जीनें श्री चरणांही करितां आक्रमण भुमिका लवली ॥
गगनीं जिच्या करीटें सग्रह नक्षत्रराजि कालवलीं ॥४२॥
जीच्या बाहु सहस्त्रें व्यापुनि दिक चक्र सर्व शोभाविलें ॥
क्षोभाविलें चाप रवे कांऽर्ड यशें देव वृद लोभविलें ॥४३॥
मग त्या श्री दुर्गेशीं असुरमटांशीं प्रवर्तलें युद्ध ॥
होय दिगंतर शस्त्रा ऽस्त्र विदीपित ज्यांत तें असे ॥४४॥
महिषासुर सेनानी चिक्षुर नामा महासुर तसा च ॥
चांमर चतुरंग बळें युक्त रण मखीं महासु रत साच ॥४५॥
तैसा च ईश्वरीशी षडयुतरथयुत उदग्र युद्ध करी ॥
परि तो आला व्याया दैवी शर निकर सिंह रुद्ध करी ॥४६॥
असुर महाहनु हि करी समर रथाऽयुत सहस्त्र आणुन ॥
असिलोभा रथ पंचा शन्नियुत युत स्व विजय जाणुन ॥४७॥
बाष्कळ हि निज जयाची श्रवण करीत बंदि गण मुखें; गाणीं ॥
रथ एक कोटि षटशत अयुतें गज हय असे चि बहु आणी ॥४८॥
पंचाशत कोटि मित स्पदन परिवृत सुराऽरि मत्त महा ॥
वीर बिडालांख्य करी दुर्गेशीं युद्ध असुर सत्यमहा ॥४९॥
रथ गज हय परिवृत सुर रिपु अन्य हि अयुतसंख्य जे क्रुर ॥
ते चंड मुंड शोणित बीजादिक करिती रणमहाशुर ॥५०॥
तुरग परार्घ परार्घ स्पंदन गज ही परार्घ या परि तें ॥
निजबळ आणी समरीं पाडाया तो लुलाय पाप रितें ॥५१॥
करिते झाले सोडुनि शस्त्राऽस्त्रे स्वैर असुर समरा या ॥
त्यजुनि भजन सुरस कुमति ते प्याले वैर असुर स मराया ॥५२॥
पर शस्त्रें निज शस्त्रें खंडी लीलेंकरुनि पर शक्ति ॥
तोमर मुद्गर मुसल प्राप्त परशु पट्टिशाऽसि शर शक्ति ॥५३॥
तम रवि रुचितेंकिंवा सद्धिद्येते महाऽघन शिवें तें ॥
तैंसे त्या असुरांचे शस्त्र पटल जिताम्हाघन शिवेतें ॥५४॥
तो हि शिवावाहन हरि बहु कोपें कंपवुनि सटा याला ॥
साहे न दवा वनसेंसैन्य कसें संपवु निसटायाला ॥५५॥
जे सोडिले शिवेनें संगर करितां सुगंध निश्वास ॥
ते चि असितगण झाले रक्षाया असुर वधुनि विश्वास ॥५६॥
करितील पर नग शिरःशिखरी ते अशानि कां गण न टांचा
वाढवि हर्ष तयांचा ते प्रभुचें जोविं आंगण नटांचा ॥५७॥
किती एक युद्ध करिती ते गण वाद्यें कीतीक वाजविती ॥
गाजविति ब्रह्मांड ध्वांत हरांच्या करंसि लाजविती ॥५८॥
परमेश्वरी विदारी जो त्यजि ना योध आयुधा त्यातें ।
तें काय ती पुढें जी देणारी बोध आयु धात्यांतें ॥५९॥
खडगें करुनि तोडी अरिस फळसमान बा घसाघस ती ॥
ज्या त्यास ह्मणे चित्ती जा लोक सुखें अबाध साध सती ॥६०॥
शुलें चक्रें वज्रें करि पर मारण महागदा घातें ॥
विश्वाच्या वाराया वरि परमा रण महा गदाघातें ॥६१॥
असुर वधुनि रण रंगी शोणित तटिनी उदंड वाहविल्या ॥
त्यातें खळचमु त्यांत हि न च कांही पाप मति हि राह्विल्या ॥
लावी सतत शराची द्यायास परा शरासना दानें ॥
खळ किति निज घंटेच्या मोहिति च परशरस नादानें ॥
उगवी महा भय तिमिर सागर पर पारदा दिना कर्षीं ॥६३॥
पाशें बांधोनि असुर बहु सुखवी नारदादी नाकर्षीं ॥३४॥
पाडी ढासळुनी विशिख वर्षे ती घनघटा कितेकांतें ॥
सल्लंघन घातक जरि नसतें तरी अनघ टाकितें कां तें ॥३५॥
पाहति रणी कराया त्या देवींशी बराबरि कबंध ॥
नाचति हर्षे जाणों ह्मणती सुटला बरा बरिके बंध ॥६६॥
बाळभय हरुनि ऐशी कोणीही हर्षली प्रसु नाहीं ॥
त्या श्रीजगंदंबे वरि सुरसंहति वर्षली प्रसुनांहीं ॥६७॥
क्षणमात्रें सर्व महिष सैन्य शिवा गणसमुह हरि खरची ॥
घन जाविं मयुर मनीं देव मनीं तो प्रताप हरिख रची ॥६८॥