श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २४

श्री तुळजाभवानी आदिशक्ती असून तिची आराधना केल्यास सर्व पापे नष्ट होऊन, जीवन आनंदमय होते.


श्रीगणेशायनमः ॥ कार्यारंभीविचक्षण ॥ जगदंबेचेंकरीलचिंतन ॥ त्याचेंनिर्विघ्नसुखेंकरुन ॥ कर्यसिद्धहोतसे ॥१॥

पूर्वाध्यायींनगतीर्थ ॥ त्याचामहिमावर्णिलाअदभुत ॥ आतांशंकरवरिष्ठाप्रत ॥ उत्तमकथावर्णितसे ॥२॥

देवीमंदिरापासुनीदुर ॥ रेणुकाभुवनपरमसुंदर ॥ तेथेंसाक्षातवसेसाचार ॥ तुरजादेवीमंगल ॥३॥

रामाभार्याजनकनांदिनी ॥ तिनेंप्राथिलीआदिभवानी ॥ यास्तवयोगिनीसमुदायघेऊनी ॥ तेस्थळींराहिलीजगदंबा ॥४॥

वरिष्ठम्हणेपिनाकपाणी ॥ कोणतेकाळीजनकनंदिनी ॥ किमर्थप्रार्थनाकरोनी ॥ जगदंबेसीपाचारिले ॥५॥

हेसुरेश्वरशुलपाणी ॥ माझासंशयटाकाछेदुनी ॥ ऐकोनवरिष्ठाचीवाणी ॥ बोलतेझालेशंकर ॥६॥

शंकरम्हणेवरिष्ठमुनी ॥ श्रीरामेंलेकेसीजाऊनी ॥ रावणसीमारुनीरणीं ॥ सोडविलेंसीतेसी ॥७॥

विभीषणालंकाराज्यदेऊनी ॥ पुष्पकविमानीबैसोनी ॥ सीतेसहितकोंदडपाणी ॥ अयोध्येसीचालले ॥८॥

जगदंबेच्याप्रसादेंकरुनी ॥ सर्वसंकटेंगेलीटळोनी ॥ पुन्हांजगदंबेसीभेटोनी ॥ मगजावंअयोध्येसी ॥९॥

ऐसेंरामचेंमनोगत ॥ सीतेसीउत्कंठालागलीबहुत ॥ जगदंबेसीअंतरीध्यातं ॥ दर्शनदेईम्हणतसे ॥१०॥

पुष्पकविमानीरघुनाथ ॥ वामांकरुढसीताशोभत ॥ पुष्टभागींसुमित्रासुत ॥ छत्रधरोनीउभाअसे ॥११॥

सन्मुखमारुतीवायुसुत ॥ वनरसेनापरिवारयुक्त ॥ श्रीरामाअज्ञेनेंविमानचालत ॥ आकाशमागेंतेधेवां ॥१२॥

विमानांतरिक्षगत ॥ आलेंतुळजपुरप्रदेशांत ॥ साक्षातजगदंबात्वरित ॥ सन्मुखधांवोनीजाततेव्हां ॥१३॥

जगदंबेसीअवलोकूनी ॥ विमानाअलेंमेदिनी ॥ श्रीरामासहितखालींउतरोनी ॥ जनकनंदिनीपुढेंझाली ॥१४॥

अंबिकादेवीच्याश्रीचरणीं ॥ मस्तकेंनमितसेरामपत्‍नी ॥ श्रीतुळजेनेंतयेक्षणी ॥ सीतेसीउठवोनीआलिंगिलें ॥१५॥

मस्तक अवघ्राणकरुन ॥ सीतेसीबोलेंमजूळवचन ॥ म्हणेमहाभाग्यवतीधन्य ॥ रामहर्षप्रवर्द्धिनी ॥१६॥

तुझ्यासौभाग्ययोगेंकरुन ॥ रामभुक्तझालसंकटांतुन ॥ आतांश्रीरामासहवर्तमान ॥ सुखेंजईआयोध्येसी ॥१७॥

येथेष्टघेईसुखाचाभोग ॥ पुत्रहोईलतुजलासुभग ॥ उत्तरोत्तर सुखसंयोग ॥ अधिकाआनंदपावसी ॥१८॥

इतुकंबोलोनिवेगेंसी ॥ वस्त्रालंकारदिधलेसीतेसी ॥ पुष्पमाळाघालूनगळ्यासी ॥ देवीनेंसीतेसीगौरविलें ॥१९॥

सत्कारेंपुजोनिसीतेसी ॥ प्रस्थापितकेलेंअयोध्येसी ॥ यास्तवतेस्थळीजगदंबेसी ॥ वास्तव्यझालेंअखंड ॥२०॥

कार्तिकमासींअष्टमीसी ॥ तेथेंजोपुजीलदेवीसी ॥ भक्तवत्सलादेवात्यासी ॥ सन्मुखतेयसेसर्वदा ॥२१॥

जेव्हांकेव्हाहीअवसरे करुन ॥ देवीच्याअग्रभागींयेऊन ॥ पुजाकरीलत्याचेपुर्ण ॥ मनोरथकरीतसेजगदंबा ॥२२॥

आणिकयेकतीर्थश्रेष्ठ ॥ संक्षेपेंतुजसांगतोंवरिष्ठ ॥ देवीमंदिरापासोनीस्पष्ट ॥ एकक्रोशपश्चिमेसी ॥२३॥

जेथेंसिद्धाचाईश्वर ॥ पार्वतीसहितपरमेश्वर ॥ लोकानुग्रहकरावयासाचार ॥ सोमशम्यानेंप्रार्थिला ॥२४॥

ऋषीपुसतीस्कंदासी ॥ सोमशर्माकोणतोआम्हासी ॥ सांगोवेंआधींतयासी ॥ कयतपासीआचरला ॥२५॥

कायहेतुधरुनिचित्तीं ॥ तेणेंप्रर्थिलाउमापती ॥ हेंसर्वसांगावयाप्रती ॥ योग्याअहेसषमुखा ॥२६॥

स्कंदम्हणेभीमातीरीं ॥ द्विजएकहोतासदाचारी ॥ श्रुतिस्मृतिपुराणज्ञनिर्धारीं ॥ श्रौतकर्मातनिष्णात ॥२७॥

सोमशर्माज्याचेंनाम ॥ तोएकदांद्विजोत्तम ॥ यमुनापर्वतीयेऊनउत्तम ॥ स्थानदेवीचेंपाहताझाला ॥२८॥

कल्लोळतीर्थीस्नानकरून ॥ जगदंबेचेंकेलेंपुजन ॥\ तपकरावेंम्हणोन ॥ स्थलएकनिरामयपाहिलें ॥२९॥

तेथेंवापीनिर्माणकरुन ॥ स्वनामेंलिंगस्थापून ॥ त्याचेंकरीतसेपुजन ॥ पुजासाहित्यमेळवोनी ॥३०॥

बिल्वपत्रधत्तूरपुष्प ॥ गंधअक्षताधूपदीप ॥ विविधनैवेद्यमंगलदीप ॥ नमस्कारप्रदक्षण ॥३१॥

सायंप्रातःस्नानकरुन ॥ यथाशास्त्राग्निसेवन ॥ मगलिंगातेंपुजन ॥ ध्यानधरुनीबैसतसे ॥३२॥

निराहाराजितक्रोध ॥ जितप्राणीजितेंद्रियवद्ध ॥ भस्मोत्धुलितदेहशुद्ध ॥ पंचाक्षरजिपकरितसे ॥३३॥

नासाग्रिठेवूनलोचन ॥ अखंडशंकराचेंध्यान ॥ ऐसेंकरोनीआराधन ॥ स्तुतकरीतशंकराची ॥३४॥

जयजयशंभोकरशाश्वत ॥ भर्गमहादेव उमाकांत ॥ जयचंद्रकलाधरशांत ॥ नीलकंठतुजनमोनमः ॥३५॥

जयवृषमध्वजईशान ॥ जयगणेशखटवांगधरभगवान ॥ दिगंबरभस्मांगलेन ॥ त्रिशुलधारीनमोतुज ॥३६॥

जयरुडमाळीगंगाधरा ॥ धूर्जटीसुर प्रियत्रिनेत्रा ॥ पार्वतीनाथपंचवक्त्रा ॥ वामदेवातुजनमो ॥३७॥

भवदेवपशुनाथ ॥ देवदेवजगन्नाथ ॥ गजचर्मधारीभीमनाथ ॥ नमोनमोतुजसर्वदा ॥३८॥

स्कंदसांगेऋषीप्रत ॥ सोमशर्माशिवसीस्तावित ॥ हातजोडोनीनमस्कारीत ॥ शंकरप्रगटलेतत्काळ ॥३९॥

विप्रासीमधुरवाणीबोलत ॥ तुष्टलोंभक्तीनेंअत्यंत ॥ वरमागेअपेक्षित ॥ जेंदुर्लभतेंहिदेईनमी ॥४०॥

शंकराचेंवचनाऐकोन ॥ ब्राह्मणबोलेकर जोडोन ॥ देवासंनिधान ॥ जन्मोजन्मीमजदेई ॥४१॥

यापरतेंमजकांहीं ॥ मागावयाचीइच्छानाहीं ॥ शंकरम्हणेतुनिष्कामापाहीं ॥ चिरकालराहीममलोकी ॥४२॥

त्वाजेंस्थापिलेंलिंगयेथ ॥ तुझ्यानामेंहोईलविख्यात ॥ भुलोकिंजडजीवाप्रत ॥ मुक्तिदायकातिश्रेष्ठ ॥४३॥

तुझेआपीचेंस्नानजेकरिता ॥ सोमवारिउषःकालीनिश्चितीं ॥ सोमेश्वराचेंपुजनकरिती ॥ तेराहतीकैलासी ॥४४॥

त्यासीनाहींपुनरावृत्ती ॥ शतकोटीकल्पजरीजाती ॥ स्कंदम्हणेऋषीप्रती ॥ वरदिधलाशंकरानें ॥४५॥

विमानीबैसवोन ब्राह्मणं ॥ कैलासपर्वतीनेतीशिवगण ॥ ऐसेंसोमेश्वराचेंमहिमान ॥ तुखांसीकथनकेलेंम्यां ॥४६॥

आतांआर्यादेवीवेंमहात्म्य ॥ तुम्हांसीकथितोंउत्तम ॥ सोमश्वराच्यानैरुत्यसीम ॥ क्रोशद्वयदुरअसे ॥४७॥

तेथेंसाक्षाततुळजाभवानी ॥ इंद्रेप्राथिलेंतयेस्थानीं ॥ इंद्रासीदर्शनदेऊनी ॥ राहिलीतेथेंजगदंबा ॥४८॥

कोणीएकेकाळींइंद्र ॥ अप्सराघेऊनीबरोबर ॥ आलायमुनागिरीसमोर ॥ सरितातीरींवनांत ॥४९॥

तेथेंअतिशयउत्साह पाहुन ॥ वनक्रीडकरुनीपाकशासन ॥ मगरात्रीतेथेंचबैसोन ॥ चिंतनकरीतअंबेचें ॥५०॥

चिंतिताचीप्रगटहोऊन ॥ इंद्रासीदर्शनदिधलेंजाण ॥ इंद्रेनमस्कारकरून ॥ स्तवनकेलेंअबेचें ॥५१॥

हातजोडोनीउभाराहात ॥ परमनम्रविनययुक्त ॥ इंद्रम्हणेमजकृतार्थ ॥ जगन्मातेमजत्वाकेलें ॥५२॥

कृपेनेंदेऊनदर्शन ॥ जैसेंमजकेलेंपावन ॥ तैसेंचयेथेंअखंडराहुन ॥ पावनकरीजगातें ॥५३॥

जैसीयमुनापर्वतावरी ॥ तैसीचयेथेंराहीबरी ॥ फलदामंगलमाहेश्वरी ॥ सदातुंचजगातें ॥५४॥

अंबाम्हणेपाकशासना ॥ म्यांमान्यकेलेंतुझ्यावाचना ॥ आतांजाईस्वर्गभुवना ॥ अप्सरागणासमवेत ॥५५॥

पूर्ववत करीत्रिलोकपावन ॥ चिंताविवर्जितहोऊन ॥ सकंटीतुजसीभाळीन ॥ स्मरतांचसन्निधराहीनमी ॥५६॥

सर्वदेवांचातुंदेव ॥ तूपूज्यसर्वासीसदैव ॥ मजजेभजतीयेथेंमानव ॥ त्यासदर्शनदेईनमी ॥५७॥

देवराजासीऐसेंबोलुन ॥ जगदंबातेथेंराहिलीजाण ॥ यास्तवाअर्यानामाभिदान ॥ तेस्थळीझालेंदेवीसी ॥५८॥

भौमवारअष्ठमीतीथी ॥ जेनरोत्तमदेवीसीपुजिती ॥ त्यासीतात्काळसिद्धिचीप्रात्पि ॥ होतसेनिश्चयें ॥५९॥

ऐसेंआयीमहात्म्यउत्तम ॥ वरिष्ठासीशिवेंकथिलेपरम ॥ ऋषीप्रतीस्कंददेवोत्तम ॥ कथिताझाला आवडीनें ॥६०॥

म्हणेपांडुरंगजार्दन ॥ पुढेंमार्कडीयकथापावन ॥ ऐकावयासावधान ॥ श्रोतेसज्जनीअसावें ॥६१॥

इतिश्रीस्कंदपुराणेसहयाद्रीखंडे ॥ तुलजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्टसंवादि ॥ चतुर्विशोध्यायः ॥२४॥

श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP