एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


देवादयो ब्रह्ममुख्या, न विशन्तं स्वधामनि ।

अविज्ञातगतिं कृष्णं, ददृशुश्चातिविस्मिताः ॥८॥

इंद्र बृहस्पती मुख्यत्वें ब्रह्मा । देव पाडूनि परम भ्रमा ।

श्रीकृष्ण प्रवेशला निजधामा । अतर्क्य महिमा हरीचा ॥८१॥

अतर्क्य श्रीकृष्णाची गती । देवांसी लक्षेना निजशक्तीं ।

अतिविस्मय पावोनि चित्तीं । स्वधामाप्रती निघाले ॥८२॥

देव जातां स्वधामाप्रती । क्षणक्षणा आश्चर्य करिती ।

अलक्ष्य लक्षेना कृष्णगती । अतर्क्य स्थिती शिवादिकां ॥८३॥

तेचि श्रीकृष्णाची अतर्क्य गती । देवांसी लक्षेना दैवी शक्तीं ।

तेचि विशद दृष्टांतीं । परीक्षितीप्रती शुक सांगे ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP