शरण तुज, देवयानि, रिधत कच तो जाण;
तपा जिंकी, विभवा जिंकी, तृणवत सदा सुर मान ॥ध्रु०॥
बला कच वरी, अरी निवारी, असा सुरहि धरी भाव;
तेजेंहि तेजा न देहीं मिळवितां, पावे मरण कविनांव;
दिसे कविसुता मला सुररता; प्रेमेंहि प्रेमा हरिल तव प्राण;
मज अजि धांव तूं पाव सखे अससि तूं त्राण ॥१॥
राग पहाडी-मांड, ताल नकटा.
("बालम कुच रोटि लेवो" या चालीवर.)