शाहिर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहिर कवी म्हणून ओळखले जातात. माधवराव पेशव्यांच्या काळात त्यांनी पोवाडे, लावण्या, देवादिकांची स्तुती व कथा लिहील्या. प्रभाकरांच्या वडिलांचे नाव जनार्दन होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात मुरूड जवळ हर्णै गावात, इ.स. १७६९ साली झाला. वयाच्या २० व्या वर्षी ते नाशिकला गंगापूर गावी आले, नंतर तेथून पुढे पेशव्यांच्या आमंत्रणावरून पुण्याला आले. त्यांचा मृत्यु इ.स. १८४३ मध्ये झाला.
त्यांच्या लावण्या फडातून, बारीतून गायल्या जात. त्यांच्या शृंगारीक लावण्या ऐकण्यासाठी राजे, पेशवे, सैन्यातील मोठमोठी मंडळी हजेरी लावत.