मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र| अध्याय सत्तेचाळीसावा गुरूचरित्र विशेष माहिती प्रस्तावना श्रीगुरुचरित्र पारायण-पद्धती पारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा अध्याय तेहेतिसावा अध्याय चौतिसावा अध्याय पस्तीसावा अध्याय छत्तिसावा अध्याय सदतीसावा अध्याय अडतीसावा अध्याय एकोणचाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय एकेचाळीसावा अध्याय बेचाळीसावा अध्याय त्रेचाळीसावा अध्याय चव्वेचाळीसावा अध्याय पंचेचाळीसावा अध्याय सेहेचाळीसावा अध्याय सत्तेचाळीसावा अध्याय अठ्ठेचाळीसावा अध्याय एकोणपन्नासावा अध्याय पन्नासावा अध्याय एकावन्नावा अध्याय बावन्नावा अध्याय त्रेपन्नावा गुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi. Tags : gurucharitrapothipuranगुरूचरित्रपुराणपोथी अध्याय सत्तेचाळीसावा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नम: । नामधारक म्हणे सिध्दासी । पुढें कथा वर्तली कैसी । ते विस्तारोनी आम्हांसी । कृपा करोनि सांगावी ॥१॥नामधारका श्रीमंता । ऐकेन म्हणसी गुरुचरित्रा । तुज होतील पुत्रपौत्रा । सदा श्रियांतुक तूं होसी ॥२॥सांगेन कथा एक विचित्र । जेणें होती पतित पवित्र । ऐसे श्रीगुरुचरित्र । तत्परेंसी परियेसी ॥३॥ गाणगापुरीं असतां गुरु । सण दिपवाळी आला थोरू । शिष्य आले पाचारू । आपले घरी यावें भिक्षेसी ॥४॥सप्त शिष्य बोलाविती । एकाहून एक अधिक प्रीती । सातहीजणपायां पडती । यावें आपुल्या घरासी ॥५॥एकेक ग्राम एकेक देशीं । श्रीगुरु म्हणती शिष्यासीं । समस्ता घरीं यावें कैसी । तुम्ही मनीं विचार करा ॥६॥तुम्हीं वाटावें आपणातें । कोठें आधी यावें निरूपा तें । तेथें जाऊं निश्चिते । शिष्याधीन आम्ही असो ॥७॥आपणांत आपण पुसती । समस्त आधीं नेऊं म्हणती । एकमेकां झगडती । आपुला स्वामी म्हणोनिया ॥८॥श्रीगुरु वारिती तयांसी । तुम्ही भांडतां कासयासी । आम्ही गुरु सातांसी । एका घरी येऊं आम्ही ॥९॥ऐसे वचन एकोनि । समस्त विनविती कर जोडोनि । स्वामी प्रपंचे न पाहावा मनीं । समर्थ दुर्बळ म्हणूं नये ॥१०॥समस्तांसी पहावें समान । न विचारावें न्यून पूर्ण । उपेक्षिसी दुर्बळ म्हणोन । गंगाप्रवेश करूं आम्ही ॥११॥विदुराचिया घरासी । श्रीकृष्ण जाय भक्तीसीं । कौरवराजमंदिरासी । न वेचे भक्तवत्सल ॥१२॥आम्ही समस्त तुझे दास । कोणासी न करावें उदास । जो निरोप द्याल आम्हांस । तेचिं करूं आपण म्हणती ॥१३॥ऐसें म्हणोनिया समस्त । करिती साष्टांग दंडवत । समस्त आम्हां पहा हो म्हणत । ऐसें विनवती श्रीगुरुसी ॥१४॥श्रीगुरु म्हणती समस्तांसी येऊं तुमचे घरासी । चिंता न धरा हो मानसीं । भाक आमुची घ्या म्हणती ॥१५॥ऐसें ऐकोनि गुरुवचन । विनविताती सातही जण । समस्तांसी म्हणतां येईन । कोणी करावा भरवंसा ॥१६॥श्रीगुरु मुनी विचारती । अज्ञान लोक हे नेणती । आतां सांगू एकांती । एक एकातें बोलावून ॥१७॥जवळी बोलावोनि एकासी । कानीं सांगती तयासी । आम्ही येतों तुझे ग्रामासी । कोणाजवळी न सांगावे ॥१८॥ऐसी भाक त्यासी देती । उठोनि गावां जा म्हणती येऊं तुझ्या ग्रामाप्रती । संशय मनीं न धरावा ॥१९॥ऐसें सांगोनि तयासी । पाठविले ग्रामासी । बोलावून दुसर्यासी । येणेचि रीती सांगितलें ॥२०॥ऐसें सातही जणां देखा । समजवोनि गुरुनायका । पाठविले तुम्ही ऐका । महदाश्चर्य वर्तलें ॥२१॥एकमेकां न सांगत । गेले सातही भक्त । श्रीगुरु आले मठांत । अति विनोद प्रवर्तला ॥२२॥ग्रामांतील भक्तजन । ऐसें कौतुक ऐकोन । विनविताती कर जोडोन । आम्हां सांडोनि जातां स्वामी ॥२३॥तयांसी म्हणती श्रीगुरुनाथ । राहूं आम्ही नाही जातं । न करा चिंता मनांत । आम्ही येथेंचि असों देखा ॥२४॥ऐशा संधीस श्रीगुरुसी । होऊं आली जवळी निशी । दिपावळीची त्रयोदशी । रात्रीं मंगळस्नान करावें ॥२५॥आठरूप झाले आपण । अपार महिमा नारायण । सात ठाईंतही गेले जाण । गाणगापुरीं होतेची ॥२६॥ऐसी दिपवाळी झाली । समस्तां ठायीं पूजा घेतली । पुन: एकचि मूर्ति ठेली । गौप्यरूपें कोणी नेणें ॥२७॥कार्तिकमासीं पौर्णिमेसी । करावया दीपाराधनेसी । समस्त आले परियेसीं । गाणगापुरीं गुरुजवळी ॥२८॥समस्तही नमस्कारिती । भेटी दहावे दिवशीं म्हणती । एकमेकांत झगडती । म्हणती आपुले घरीं गुरु होते ॥२९॥एक सत्य मिथ्या म्हणत । समस्त शिष्य खुणा दाखवित । आपण दिल्हें तें हें वस्त्र । श्रीगुरुजवळी असे ॥३०॥समस्त राहिले तटस्थ । ग्रामस्थ लोक असत्य म्हणत । आम्हांजवळी गुरु असत । दीपवाळी येथेंची केली ॥३१॥विस्मय करिती सकळ जन । म्हणती त्रैमूर्ति हाचि आपण । अपार महिमा नारायण । अवतार असे श्रीहरिचा ॥३२॥ऐसे मिळोनि भक्त समस्ती । नानापरी स्तोत्रें करिती । न कळे महिमा तुमचा म्हणती । वेदमूर्ति गुरुनाथा ॥३३॥तूंचि विश्वव्यापक होसी । महिमा न कळे आम्हांसी । काय वर्णूं चरणासी । त्रैमूर्ति तूंचि एक ॥३४॥नानापरी स्तुति करिती । दीपाराधना अतिप्रीती । ब्राम्हणभोजन अतिभक्ति । करिते झाले भक्तजन ॥३५॥श्रीगुरुमहिमा झालीं जगतीं । सिध्द सांगे नामधारकप्रती । भूमंडळी झाली ख्याति । श्रीनृसिंहसरस्वतीची ॥३६॥म्हणे सरस्वतीगंगाधरु । जवळीं असतां कल्पतरु । न ओळखितां अंध बधिरू । वायां कष्टती दैन्यरीतीं ॥३७॥भजा भजा हो श्रीगुरुसी । जें जें काम्य तुमचें मानसीं । सिध्द होईल त्वरितेंसी । आम्हां प्रचीती आली असे ॥३८॥अमृत मिळतां पानांसी । क्षार कटु आवडे मूर्खासी । ज्ञानवंत भक्तजनांसी । नामामृत गुरुचें ॥३९॥श्रीगुरुसेवा तुम्ही करा । ऐसा पिटी मी डांगोरा । सांगती शास्त्र अपारा । गुरु तोचि त्रैमूर्ति ॥४०॥गुरुवेगळी गति नाहीं । जे नंदिती नर देहीं । वेदशास्त्रें बोलती पाहीं । सूकरयोनींत जन्मती ॥४१॥तुम्ही म्हणाल मज ऐसें । आपुले इच्छेने लिहिलें कैसें । वेदशास्त्री सांगितले ऐसें । असे तरी अंगिकारा ॥४२॥संसारसागर धुरंधर । उतरावया पैल पार । गुरुविणें निर्धार । तारक कोण त्रिजगीं ॥४३॥निर्जळ संसार अरण्यांत । पवई घालणें असे अमृत । सेवा सेवा हो तुम्ही समस्त । अमरत्व तुम्हां होईल ॥४४॥श्रीगुरुनृसिंहसरस्वती । अवतार असे त्रिमूर्ति । गाणगाग्रामी असे ख्याति । आतां असे प्रत्यक्ष ॥४५॥जे जाती तया स्थाना । तात्काळ होती मनकामना । काहीं न करा हो अनुमाना । प्रत्यक्ष देव तेथें असे ॥४६॥आम्ही सांगतों तुम्हा हित । प्रशस्त झालिया तुमचें चित्त । गाणगापुरी जावें त्वरित । म्हणे सरस्वतीगंगाधर ॥४७॥इति श्रीगुरुचरित्रामृत । सिध्दमुनि संवादत । अष्टरूपें श्रीगुरु धरित । सप्तचत्वारिंशोद्याय हा ॥४८॥इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्दनामधारकसंवादे अनेकस्वरूपधारणं नाम सप्तत्वारिंशोध्याय ॥४७॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ओवीसंख्या ॥४८॥॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥ N/A References : N/A Last Updated : September 20, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP