भाऊबीज
भावाबहिणींना वर्षभर वाट पाहायला लावणारा दीपावलीचा समारोपाचा दिवस यमद्वितीया-भाऊबीज
हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस. या दिवशी यम आपली बहिण यमी हिला भेटायला गेला. त्यावेळी तिने त्याला ओवाळले, अशी पौराणिक कथा त्यामागे आहे.
या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहिण त्याला जेउ घालते. नंतर त्याला औक्षण करते. तेव्हा त्यावेळी भाऊ तिला भेट देतो.
दिवाळीतील हा शेवटचा आनंदाचा दिवस, भाऊ बहिणीच्या प्रेमाने साजरा होतो.
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2011
TOP