आश्विन कृष्ण त्रयोदशी हा दिवाळीचा धनत्रयोदशीचा दिवस. या दिवशी अपमृत्यू टळावा याकरिता ’यमदीपदान’ म्हणजे यमासाठी प्रदोषकाळी संध्याकाळी घराबाहेरच्या बाजूस दिवा लावून ठेवावा. धनत्रयोदशीचे आणखी महत्त्व आयुर्वेदाच्या उपासकांसाठी आहे. आयुर्वेदाचा प्रवर्तक, चौदा रत्नांपैकी एक रत्न असणार्या धन्वन्तरीचा हा जन्मदिन. या दिवशी सर्व वैद्य धन्वन्तरी पूजन, धन्वन्तरी यागाचे अनुष्ठान करतात.
धनसंग्रहाचे पूजन
धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील साठा राखीव निधी म्हणून पिढीजात ठेवलेले सोनेनाणे, निरनिराळे अलंकार, दागदागिने घासून पुसून स्वच्छ करावेत आणि या धनसंग्रहासह विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग यांचे पूजन करावे. खिरीचा किंवा धणे व गूळ यांचा नैवेद्य दाखवावा. या पूजेसाठी झेंडूच्या फुलांचे महत्त्व आहे