शुक्र पूजन
शुक्र सुख-सुविधा तसे वीर्य आणि राजस यांचा कारक आहे. हा ग्रह केवळ आठ महिन्यात सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो. सूर्य मालिकेत शुक्राचे स्थान सूर्याच्या पूर्वेला आहे. जन्मकुंडलीत शुक्र ग्रह जर शुभ स्थानात असेल तर जातकाला भौतिक सुख मिळते. परंतु जर अशुभ स्थानात असेल तर जातकाला कामुकता येते. या ग्रहाच्या अनुकुलतेसाठी शुक्र पूजना सोबत लक्ष्मीची आराधना फलदायी असते. यासाठी साधकाने प्रातःकाळी शुक्राची पूजा करावी. दुपारनंतर दही-भात किंवा खीरीचे भोजन करावे.
आवाहन मंत्र
हातामध्ये पांढरी फुले आणि पांढरे तांदूळ घेऊन खालील मंत्र म्हणून शुक्राचे आवाहन करावे.
ॐ हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् ।
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं आवाहयाम्यहम् ॥
स्थापना मंत्र
त्यानंतर खालील मंत्र म्हणून शुक्राची स्थापना करावी.
ॐ भुर्भूवः स्वः शुक्रः इहागच्छ इहतिष्ठ ।
ॐ शुक्राय नमः ॥
नंतर पांढरी फुले आणि पांढरे तांदूळ नवग्रह मंडळातील शुक्राच्या स्थानी सोडावे.
ध्यान मंत्र
खालील मंत्र म्हणून शुक्रदेवाचे ध्यान करावे.
श्वेताम्बरः श्वेत वपुः किरीटी चतुर्भुजो दैत्यगुरु प्रशांतः ।
एकाक्षसूत्रं च कमण्डलुं च दण्डं च विभ्रद्वरदोस्तुमह्यम् ॥
शुक्र मंत्र
शुक्राचा बीज मंत्र खाली दिलेला आहे त्याची जपसंख्या १६००० आहे.
ॐ शुं शुक्राय नमः
ॐ द्रां द्रीं द्रौ सः शुक्राय नमः ।
शुक्र यंत्र
यंत्राच्या अकांची बेरीज कुठुनही केली तरी ३० इतकीच येते. शुक्र यंत्र कोणत्याही महिन्यातील शुक्लपक्षात येणार्या पहिल्या शुक्रवारी चंदनाच्या काडीने अष्टगंधाच्या शाईत बुडवून भुर्जपत्रावर लिहावे. नंतर त्याला धूप, दीप, सुगंधित सफेद फुले वाहून
ॐ द्रां द्रीं द्रौ सः शुक्राय नमः ।
हा मंत्र म्हणून सोन्याच्या ताईतामध्ये किंवा पांढर्या वस्त्रात घालून धारण करावे.