चंद्र पूजन
चंद्राची पूजा सोमवारी सायंकाळी केली जाते.
आव्हान मंत्र
हातात पांढरी फुले आणि तांदूळ घेऊन खालील मंत्र म्हणून चंद्राला आवाहन करावे
क्षीरदार्णव सम्भूत अत्रिगोत्र समुद्भवां ।
ग्रहाणार्घ्य शशाडेदं रोहिणी सहितं मम् ॥
स्थापना मंत्र
ॐ भूर्भुवः स्वः चंद्रमा देवता इहागच्छ इहतिष्ठ ।
ॐ सोमाय नमः ।
पांढरी फुले आणि तांदूळ नवग्रह मंडळात चंद्राच्या जागी सोडावेत.
ध्यान मंत्र
खालील मंत्र म्हणून चंद्राचे ध्यान करावे.
श्वेतांबरः श्वेतविभूषणश्च श्वेतद्युतिर्दण्डधरो द्विबाहुः ।
चन्द्रोऽऋतत्वारदः किरीटी मयि प्रासादं विदधातु तेजः ॥
चंद्र मंत्र
चंद्राच्या मंत्राची जपसंख्या ११००० आहे.
ॐ सो सोमाय नमः
ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः ।
चंद्र यंत्र
यंत्राच्या अकांची बेरीज कुठुनही केली तरी १८ इतकीच येते. कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षात येणार्या पहिल्या सोमवारी चंद्राचे दर्शन घेऊन नंतर भुर्जपत्रावर डाळिंब किंवा चांदीच्या लेखणीने अष्टगंधाच्या शाहीत बुडवून लिहावे. नंतर धूप, दीप, आणि पांढरी सुगंधित फुले त्या यंत्रावर वाहून खालील मंत्र म्हणून चांदीच्या ताईतामध्ये धारण करावा.
ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः ।