मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|नक्षत्र जनन शांती|
गृह बलिदानम्

गृह बलिदानम्

मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.
Performing yagna to the birth star will help the people to safeguard the life from worries and bad days.


गृह बलिदानम्

इंद्रादि अष्ट लोकपाल, आकाश व भूमी असे दश दिकपाल यांना संदीप माषपिष्ठ देण्यासाठी गव्हाच्या कणकीमध्ये व उडीद मिसळून त्याचे दहा लंबाकृती गोळे बनवावेत. कणकीचे दिवे बनवावेत. स्थंडिलाच्या पूर्वेपासून आठ दिशांना आठ ईशान्य व पूर्व यांच्यामध्ये एक नैऋत्य व पश्चिम यांच्यामध्ये एक असे दहा बली द्यावेत. प्रत्येक देवतेला बली अर्पण करताना त्या दिशेस यजमानाने मुख करुन हातावरुन गंधाक्षत पुष्प ( समोरील ताम्हणात ) सोडावे. ( प्रत्येक बलीवर १ पळी पाणी सोडावे.)

सूर्यापासून केतुपर्यंत नवग्रहांना स्वतंत्रपणे वरील प्रमाणेच तयार केलेले सदीप माषपिष्ट बली त्यांचे मंत्र म्हणून अर्पण करावेत. ते नवग्रह पीठाचे समोर द्यावेत. तसेच गणपती, दुर्गा, वायु, आकाश, अश्विनीकुमार व वास्तोष्पती या सहा देवतांना असेच सहा वेगवेगळे सदीप माषपिष्ठ बली द्यावेत. ( किंवा आदित्यादि नवग्रहांना सर्वांना मिळून एक सदीप माषपिष्ठ बली द्यावा. पुढे मंत्रामध्ये असा एकच बली देण्याबाबत मंत्र दिला आहे.

क्षेत्रपाल व परिवार देवतांसाठी एका शिपतरात उडीद घातलेला कणकीच्या पिठाचा बली ठेवावा. त्याला गुलाल वगैरे लावून सुशोभित करतात. कणकीची

एक पणती (दिवा) ठेवावी. क्षेत्रपालासाठी एक सुपारी व विडा ठेवावा क्षेत्रपालादि बलिदान मंडपाच्या बाहेर ईशान्य उत्तरेच्या मध्यभागी करावयास सांगितले आहे परंतु यजमानाच्या घरात जशी जागा असेल त्याप्रमाणे बलिपूजा झाल्यावर बाहेर नेण्यास योग्य पडेल अशा ठिकाणी पूजन करुन बलिदान करावे.

(अखेरीस क्षेत्रपाल बली यजमान कुटुंबियांवरुन ओवाळल्यानंतर सर्वच बली एका पिशवीत भरुन बाहेर चव्हाट्यावर - चौकात- किंवा इतरांना त्रास होणार नाही अशा मोकळ्या जागी नेऊन ठेवावा.

संकल्प - देशकालौ स्मृत्या कृतस्य सग्रहमख मूल ( आश्लेषा ज्येष्ठा) जननशांत्याख्यस्य कर्मण: सांगता सिध्यर्थ इंद्रादि लोकपाल आदित्यादि नवग्रह देवता नक्षत्र देवता प्रीत्यर्थ क्षेत्रपाल प्रीत्यर्थ व बलिदानं करिष्ये ।

उदक सोडावे.

१. इंद्र: सुरपति: श्रेष्ठो वज्रहस्तो महाबल: । शतयज्ञाधिपो देवस्तस्मै नित्यं नमो नम: । ईद्राय नम: ।सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्प्यामि । इईद्राय सांगाय सपरिवाराय सायुधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो इंद्र इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष

येथे यजमानाने म्हणावे

मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्त शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव ।

अनेन बलिप्रदानेन इंद्र: प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

२. आग्नेय पुरुषोक्त: सर्व देव मयोव्यय: । धूम्रकेतू रजोधक्षस्तस्मै नित्यं नमो नम: । अग्नये नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। अग्नय सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो इंद्र इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता, शांतिकर्ता तुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन अग्नि: प्रीयताम् ।

पाणी सोडावे

३. दंडहस्तं यमं देवं महामहिष वाहनम् । वैवस्वतं पितृपतिं नौमि नित्यं महाबल्म् । यमाय नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। यमाय सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो यमं इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन यम: प्रीयताम् ।

पाणी सोडावे

४. निऋतिं खड्गहस्तं च सर्व लोकैक पावनम्‍ । नरवाहनमत्युग्रं वंदेहं कालिकाप्रियं । निऋतये नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। निऋतय सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो निऋति इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन निऋति: प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

५. वरुणं पाशहस्तंच यादसांपतिमीश्चरं । अपांपति महं वंदे देवं मकर वाहनम् । वरुणाय नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। वरुणाय सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो वरुणं इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन वरुण: प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

६. अनाकारो महोजाश्च यश्चादृष्ट गर्तिर्दिवि । जगत्पूज्यो जग्त्प्राणस्तं वायु प्रणमाम्यहम् । वायवे नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। वायव सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो वायु इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन वायु: प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

७. सर्व नक्षत्र मध्ये तु सोमो राजा व्यवस्थित: । तस्मै नक्षत्रपतये देवाय सततं नम: । सोमाय नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। सोमाय सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो सोम इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन सोम: प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

८. सर्वाधिपो महादेव ईशान्यश्चंद्र शेखर: । शूलपाणिर्विरुपाक्षस्तस्मै नित्यं नमो नम: । ईशानाय नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। ईशानाय सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो ईशान इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन ईशान: प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

९. चंद्राकौपितमाकाशं षंढं नीलोत्पलप्रभं । नीलंबर धरं चैव तस्मै नित्यं नमो नम: । आकाशाय नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। आकाशाय सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो आकाश इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन आकाश: प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

१०. सर्वेषामाश्रया भूमिर्वराहेण समुद्धता । अनंत सस्य दात्री या तां नमामि वसुंधराम्‍ । भूम्यै नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। भुम्यै सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो आकाश इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन भुमि: प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

११. जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्दुतिं । तमोरिं सर्व पापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम‍ आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थ गंधाक्षतपुष्पं समर्पयामि । आदित्यादि नवग्रहेभ्य: सांगेभ्य: सपरिवाराभ्य: सा्युधेभ्य: सशक्तिकेभ्यो: इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो आदित्यादि नवग्रहा: अमुं बलिं गृण्हीत । दिशं रक्षत । मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्तार: क्षेमकर्तार: शांतिकर्तार: तुष्टिकर्तार: पुष्टिकर्तार: कल्याणकर्तारो वरदो भवत । अनेन बलिप्रदानेन आदित्यादि नवग्रहा: प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

मूळ नक्षत्रासाठी

१२. निऋतिं खडगहस्तं च सर्व लोकैक पावनम्‍ । नरवाहनमत्युअग्रं वंदेह कालिकप्रियं ।

निऋतये नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। निऋतय सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो निऋति इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन निऋति: प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

आश्लेषा नक्षत्रासाठी

१२. सर्पाधीश नमस्तुभ्यं नागानां च गणाधिप । सर्वारिष्ट प्रशासन भक्तानामभयप्रद । सर्पो रक्तस्त्रिनेत्रश्च द्विभुज: पीतवर्णक: । फलकासि धरस्तीक्ष्णो दिव्याभरण भूषित: । सर्पेभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। सर्पाय सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो सर्प इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन सर्पादि प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

ज्येष्ठा नक्षत्रासाठी

१२. इंद्र: सुरपति: श्रेष्ठो वज्रहस्तो महाबल: । शतयज्ञाधिपो देवस्तस्मै नित्यं नमो नम: । इंद्राय नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। इंद्राय सांगाय सपरिवाराय सा्युधाय सशक्तिकाय इमं सदीप माष पिष्ट बलिं समर्पयामि । भो इंद्रं इमं बलिं भक्ष्य दिशं रक्ष

(येथे यजमानाने म्हणावे)

मम सकुटुंबस्य सपरिवारस्य आयु: कर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता तुष्टिकर्ता पुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव । अनेन बलिप्रदानेन इंद्र: प्रीयताम् ।

पाणी सोडावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP