पार्वण श्राद्ध पूर्वार्ध

पार्वण श्राद्ध पितृ पंधरवड्यात करतात.यात मागील तीन पितृ देवतांचा समावेश होतो.


श्राद्धाचा विधी

वडिलांचे निधन ज्या तिथीला झाले असेल त्याच तिथीला भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत येणार्‍या पंधरवड्यात श्राद्धकर्म करावे. त्यावेळी सर्व पित्रांमध्ये आई, आजी तसेच आईचे वडिलांचे वडील आजोबा, पणजोबा सुद्धा येतात म्हणून इतरांचे वेगळे श्राद्ध करण्याची जरूरी नाही.

ज्या कोणास तिथी माहीत नसेल, अथवा काही कारणामुळे त्या विशिष्ट तिथीला श्राद्धकर्म जमले नसेल तर त्यांनी अमावस्येला (सर्व पित्री अमावस्या) श्राद्ध कर्म करावे.

पश्यन्ति तेऽर्कं निजमस्तकोर्ध्वं...दर्शे...। सिद्धांतशिरोमणि गौ. १३

पित्रगण दर्श अमावस्येच्यादिवशी सूर्याला आपल्या मस्तकाच्या समोर पाहतात.

अमावास्यायां पितृभ्यो दद्यात् । गौतम १५

अमावास्येला पितरांना उद्देशून द्यावे.

अमावस्यायामपराण्हे० -। ऐतरेयब्राह्मण.

अमावास्या तिथिला अपराण्हकाळी श्राद्धादि करावे.

वरील सर्व वचने पाहू जाता श्राद्ध तिथी चुकली असता अमावस्येला श्राद्ध करणे अधिक चांगले.

१ - आचमन

ॐ केशवाय नमः । नारायणाय नमः । माधवाय नमः । गोविंदाय नमः । विष्णवे नमः । मधुसूदनाय नमः । त्रिविक्रमाय नमः । वामनाय नमः । श्रीधराय नमः ।

ऋषीकेशाय नमः । पद्मनाभाय नमः । दामोदराय नमः । संकर्षणाय नमः । वासुदेवाय नमः । प्रद्मुम्नाय नमः । अनिरुद्धाय नमः । पुरुषोत्तमाय नमः । अधोक्षजाय नमः । नारसिंहाय नमः । अच्युताय नमः । जनार्दनाय नमः । उपेंद्राय नमः । हरय नमः । श्रीकृष्णाय नमः ।

(देवांच्या स्थानी बसवावयाचे ब्राह्मण पूर्वेकडे तोंड करून, व पितरांच्या स्थानी बसावयाचे ब्राह्मण उत्तरेकडे तोंड करून बसवावेत.)

'केशवाय नमः' आदि पहिल्या तीन नावांनी एक एक पळी पाणी उजव्या तळहातावर घेऊन प्राशन करावे, आणि चवथ्या नावाने हात धुवावेत.

२ - पवित्र धारणम्

दर्भाची केलेली पवित्रके करांगुलीजवळच्या बोटात घालतात. ते करण्याची पद्धती आरंभी दिली आहे. सोन्याचे, चांदीचे किंवा लोखंडाचे पवित्रक हातात असल्यावर दर्भाच्या पवित्रकाची जरूर नाही. ज्यांचा पिता जिवंत आहे त्यांनी एकच पवित्रक दिग्बंधसमयी घालावे.

३ - दिग्बंध

दिग्बंध तंत्रोक्त, म्हणूनच वैकल्पिक आहे.

हे मंत्र म्हणून शेंडी व जानवे यांना दर्भ बांधावेत. उजव्या कडोसरीस दोन दर्भ व यव खोचावेत व डाव्या कडोसरीस तिळासकट तीन दर्भ खोचावेत. आसनाकरिता दोन दर्भ किंवा दर्भाचे आसन घ्यावे.

शेंडी, जानवे वगैरे ठिकाणी दर्भ धारण करण्याची पद्धत सर्वमान्य नाही,

४ - देशकालोच्चारणम्

श्रीदम्‌भगवती महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य, अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे, विष्णुपदे, श्रीश्वेतवाराहकल्पे, वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणं, अष्टाविंशतितमें युगे, भरतवर्षे, भरतखंडे, जंबुद्वीपे, शालिवाहन शके, बौद्धावतारे, अस्मिन्‌ वर्तमाने, अमुकनाम संवत्सरे, अमुक नयने, अमुक ऋतौ, अमुक मासे, अमुक पक्षे, अमुक तिथौ, अमुक वासरे, अमुक दिवस नक्षत्रे, अमुकस्थिते वर्तमाने चंदे, अमुकस्थिते श्रीसूर्ये, अमुकस्थिते देवगुरौ, शेषषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु, सत्सु एवंगुणविशेषणविशिष्टाया शुभपुण्यतिथौ-

५ - संकल्प

पुरूरवार्द्रव संज्ञकानां विश्वेषां देवानां - (प्राचीनावीति) पितृपितामहप्रपितामहानां अमुकशर्मणा अमुकगोत्रानां वसुरुद्रादित्य-स्वरूपाणां - (मातृश्राद्धे तु मातृपितामहीप्रपितामहीनां अमुकदानां अमुकगोत्राणाम्)-

(सव्यं) श्रेयार्थं मोक्षार्थं तृप्त्यर्थं मम पितृणां प्रतिसांवत्सरिक श्राद्धं सदेवं सपिंडं साग्नौकरणं पार्वणेन विधिना अन्नेन हविषा सद्यः करिष्ये ॥७॥

नंतर 'पुरूरवार्द्रंव सज्ञकानां' असे म्हणून 'प्राचीनावीति' करावी. नंतर 'मम पितृपितामहप्रपितामहानां' असे म्हणून आपला पिता, आजा, पणजा यांची नावे 'शर्मणां' असे शेवटी लावून उच्चारावीत. नंतर गोत्राचा उच्चार करावा. व त्यानंतर वसू, रुद्र, आदित्य या त्यांच्या स्वरूपाचा क्रमाने उच्चार करावा,

आईचे श्राद्ध असेल तर क्रमाने, आई, पित्याकडून आजी, पणजी यांची नावे वरीलप्रमाणे क्रमाने उच्चारावीत. नंतर सव्य करावे.

उपरोक्त मंत्रातील 'सदेव' म्हणजे'देवतासहित' असून 'पार्वण' म्हणजे 'पिता, पितामह प्रपितामह,' अथवा 'माता, मातामह,' आणि प्रमातामह ही त्रयी होय. या त्रयीला उद्देशून केल्या जाणार्‍या श्राद्धास 'पार्वण श्राद्ध' म्हणतात. एकास उद्देशून केल्या जाणार्‍या श्राद्धास 'एकोद्दिष्ट' म्हणतात.

प्रायश्चित्तसूक्त म्हणण्यास सूत्रात आधार नाही. 'तिलोदक, 'यवोदक' सूत्रात व महानिंबधात नाही. हल्ली केवळ शिष्टाचार म्हणुन करतात.

६ - यवोदक तिलोदककरण

नंतर यजमानाने तांब्याची दोन ताम्हणे घेउन डावीकडच्या ताम्हणात यवोदक व उजवीकडच्या ताम्हणात तिलोदक तयार करावे.

इमं मे गंगे यमुने सरस्वति शुतुद्रि स्तोम सचता परूष्ण्या ।

असिकभ्या मरूदृवृधे वितस्तय ऽऽर्जीकीये शृणुह्या सुषोमया ॥ (ऋ.१०,७५,५)

या मंत्राने पाणी,

गंधद्वारां दुराधर्षा नित्यपुष्टां करीषिणीम्‌ ।

ईश्वरीं सर्वभुतानाण तामिहोपह्वये श्रियम्‌ ॥(ऋ. खिल. ११-८)

मंत्राने गंध,

शरसाः कुशरासो दर्भांस सैया उत ।

मौजा अदृष्टा वैरिणाः सवें साकं न्यलिप्सत ॥(ऋ. १. १९१. ३)

या मंत्राने कूर्च,

यवोऽसि धान्यराजो वा वारुणो मधुसंयुतः ।

निर्णोदः सर्वपापानां पवित्रमृषिभिः स्मृतम् ।

मंत्राने यवोदकात सातू किंवा तांदूळ,

तिलोऽसि सोमदैवत्यो गोसवे दैवनिमितः ।

प्रत्नवद्भिः प्रतः स्वधया पितृनिमांल्लोकान्‌

प्रीणयाहि नः स्वधा नमः ॥(इति तिलोदके तिलान्‌ निक्षिप्य)

मंत्राने तिलोदकात तील,

याः फलिनीर्या अफला अपुष्पा याश्च पुष्पिणीः ।

बृहस्पतिप्रसूतास्ता नो मुञ्चन्त्वंहस ॥(ऋ. १०३९७.१५)

(इति पूगीफलं निक्षिप्य)

मंत्राने सुपारी,

हिरण्यरूपः स हिरण्यसंदृगपां नपात्सेदु हिरण्यवर्णः

हिरण्ययात्परि योनेर्निषद्या हिरण्यदा ददत्यन्नमस्मै ॥(ऋ.२.७.२३)

( इति हिरण्यं निक्षिप्य )

या मंत्राने दक्षिणा,

युवा सुवासाः परिवीत आगात्‌ म उ श्रेयान्भवति जायमानः ।

तं धीरासः कवय उन्नयन्ति स्वाध्यो ३ मनसा देवयन्तः ॥ऋ.३.८.४)

(इति यवान् विकीयं)

तिलोदके इदं गन्धं पुष्पं भृंगराजपत्रं च नमः ।

सर्वे उपचारास्तिलैः संपूर्णाः सन्त ।

इति तिलोदकं तिलान्‌ निक्षिपेत्‌)

मंत्राने यवोदकात व तिलोदकात गंध, पुष्प व तुलासीपत्र टाकावे. यवोदकात परिपूर्णता यवाने होते, आणि तिलोदकात तिळाने होते. म्हणून यवोदक व तिलोदक एकदमच तयार करावे.

७ - प्रदक्षिणाकरण

हा लोकाचार आहे. हे मंत्र म्हणून ब्राह्मणांना तीन प्रदक्षिणा व दोन नमस्कार घालावेत. नंतर अपसव्य करावे.

सर्व तर्‍हेने पवित्र असो किंवा अपवित्र असो, जो पावन परमेश्वराचे स्मरण करतो तो आंतर्बाह्य शुद्ध होतो.

कर्ता - "सर्व साहित्य शुद्ध असो."

ब्राह्मण - "सर्व पदार्थ शुद्ध असोत."

८ - अनुज्ञा

कर्ता - "आज पितरांचे प्रतिवर्षी केले जाणारे श्राद्ध करण्याला मला सर्व प्रकारे अधिकार असावा असे आपण म्हणावे."

ब्राह्मण - "श्राद्ध करण्याचा तुला अधिकार असावा."

कर्ता - "श्राद्ध करण्याच्या कालाचा हा मुख्य काळ आहे, असे आपण म्हणावे.'

ब्राह्मण - "हा काळ श्राद्ध करण्याचा मुख्य काळ असो."

८ - आमंत्रण

कर्ता -"शिजविलेले पदार्थ समर्पणीय आहेत असे आपण म्हणावे."

ब्राह्मण - "शिजविलेले पदार्थ समर्पणीय आहेत."

अ)

देवतामन्त्रण

कर्ता - (देवतास्थानी बसविलेल्या ब्राह्मणाच्या उजव्या गुढघ्यास स्पर्श करून) "तुम्ही माझ्या मातापितरांच्या प्रतिवर्षी केल्या जाणार्‍या श्राद्धात पुरूरवार्द्रव संज्ञक विश्वेदेवाकरिता आमंत्रण स्वीकारावे."

ब)

९ - पित्रामन्त्रण

कर्ता - (अपसव्यम् । पितृविप्रस्य वाम जानु स्पृष्ट्‌वा ) "मम पितॄणां प्रतिसांवत्सरिक श्राद्धे पितृपितामहप्रपितामहार्थं त्वयाक्षणः करणीयः ।"

ब्राह्मणाः - "ॐ तथा ।"

कर्ता - (सव्यम्) "देवाः स्वागतम्‌।"

ब्राह्मणाः- "सुस्वागतम् ।"

कर्ता - "देवाः समाध्वम् ।"

ब्राह्मणा - "सुसमास्महे ।"

(सव्यम्) "सर्वेषां (पितृणां) स्वागतम्"।

ब्राह्मणाः- "सुस्वागतम् ।"

कर्ता - "पितरः समाध्वम् ।"

ब्राह्मणाः- "सुसमास्महे ।"

कर्ता - "उपक्रान्तं पितृणां प्रतिसांवत्सरिक श्राद्धं करिष्ये ।"

ब्राह्मणाः- "कुरुष्व ।"

ब्राह्मण "होय"

कर्ता - (पितृस्थानी बसलेल्या ब्राह्मणाच्या डाव्या गुढघ्यास स्पर्श करून अपसव्याने) "आपण प्रतिवर्षी केल्या जाणार्‍या श्राद्धांत आमचे बाप, आजे, पणजे यांना श्राद्धाकरिता आमंत्रण स्वीकारावे."

ब्राह्मण - "होय. मी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आमंत्रण स्वीकारतो."

कर्ता - (सव्याने) "हे देवहो, तुमचे स्वागत असो."

ब्राह्मण - "आमचे स्वागत आहे."

कर्ता - (अंगठ्याशिवाय बोट धरून) - "देवांचे स्वागत असो."

ब्राह्मण - "आमचे स्वागत आहे."

कर्ता - (सव्याने) - 'सर्व पितरांचे स्वागत आहे."

ब्राह्मण - "आमचे स्वागत आहे."

१० - दिग्बंध

रक्षोहणं वाजिनमा जिधमि मित्रं प्रायष्ठमुप यामि शमे ।

शिशानो अग्निः क्रतुभिः सभिद्धः स नो दिवा स रिषः पातु नक्तम् ।ऋ. १०. ८७. १)

मंत्र म्हणून ब्राह्मणांच्या बसण्याच्या जागी, आणि

अष्टौ वसव एकादश रुद्रा द्वादशादित्याः श्राद्धद्वारे वैष्णवो रक्षा गयेयं भूमिः ।

(इति सर्वत्र तिलान् विकीर्य )

मंत्र म्हणून सर्व दिशांना तींळ टाकावेत.

कर्ता - "मी आता आरंभिलेले प्रतिवार्षिक पितृश्राद्ध करतो" (उदक सोडावे).

ब्राह्मणाः- सुभूमिः" ।

ब्राह्मण - "करावे."

११ - पाकप्रोक्षण

ॐ भूर्भुवः स्वः । तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ऋ. ३.६२.१०)

मंत्र म्हणून सव्याने पाकप्रोक्षण करावे. पाकप्रोक्षण करताना गायत्री मंत्र म्हणावा. पाकप्रोक्षण दर्भाने किंवा तुळशीपत्राने करावे. त्यापूर्वी शिजलेल्या भातावर तूप घालण्यास सांगावे.

१२ - पूजन

कर्ता -"आगच्छन्तु महाभागा विश्वेदेवा महाबलाः ।

ये ह्यत्र विहिताः श्राद्धे सावधाना भवन्तु ते"॥

म्हणून यजमानाने ओंजळ जमिनीला टेकवून देवस्थानीय ब्राह्मणाची प्रार्थना करावी व नंतर ब्राह्मणांनी

ब्राह्मणाः- "सावधानाः स्मः" ।

असे उत्तर द्यावे.

नंतर यजमानाने अपसव्य करावे व डावा हात उजव्या हातावर तिरपा उताणा ठेवून तीन वेळा पुढे सरवीत टेकवावा, आणि-

कर्ता - (अपसव्यम्)

'श्राद्धभूमौ गयां ध्यात्वा, ध्यात्वा देवं गदाधरम् ।

वस्वादींश्च पितृन्‌ ध्यात्वा, ततः श्राद्धं प्रवर्तये" ॥

ब्राह्मणा - "प्रवर्तय" ।

मंत्र म्हणून श्राद्धकार्यास प्रारंभ करण्याची अनुज्ञा ब्राह्मणांकडे मागावी.

कर्ता - (सव्यं) (देवविप्रहस्ते अपो दत्वा । सयवं दर्भद्वयासनदक्षिणभागे निधाय)

तदनंतर सव्याने देवस्थानी बसलेल्या ब्राह्मणाच्या हातावर पाणी देऊन उताण्या केलेल्या उजव्या हाताने यव व दोन दर्भ देवस्थानी असलेल्या ब्राह्मणाच्या उजव्या मांडीखाली ठेवावे, व '

पुरूरवार्द्रंव संज्ञकानां विश्वेषां देवानां ब्रह्मणे भूर्भुवस्वरिंदमासनम् ।"

हे वाक्य समग्र म्हणावे. त्यावर

ब्राह्मणाः- 'स्वासनम्'

असे ब्राह्मणाने उत्तरावे. दुसरा ब्राह्मण देवस्थानी असेल तर त्यालाही याच पद्धतीने आसन द्यावे. कर्त्याने ब्राह्मणांना 'आपण येथे बसावे'

ब्राह्मणाः- "अत्रास्यामः" ।

असे म्हटल्यावर, ब्राह्मणांनी 'येथे आम्ही बसतो' (अत्रास्वामः) म्हणावे.

ब्राह्मणाचा अंगठ्याशिवाय बाकीचा हात धरून, 'सांवत्सरिक श्राद्धात देवतास्थानी मी तुम्हास आमंत्रण करतो,' असे म्हणून दोन दर्भ ब्राह्मणाचे हातात द्यावे. 'ॐ तथा असे म्हणून ब्राह्मणाने ते स्वीकारावेत.

कर्ता - "प्राप्नोतु भवान" ।

असे कर्त्याने म्हटल्यावर,

ब्राह्मणः-"प्रापन्वामि" ।

असे ब्राह्मणाने उत्तर द्यावे.

नंतर ब्राह्मणास अर्घ्य देऊन त्याच्या पुढील जमीन प्रोक्षण करून पूर्वेकडे डोके करून दोन दोन दर्भ अंथरावे. नंतर दोन पालथी पात्रे मांडावीत. गायत्री मंत्राने प्रोक्षण करून ती पात्रे उताणी करावीत. गायत्री मंत्राने प्रोक्षून त्या पात्रावर पूर्वेकडे टोके केलेले दोन दोन दर्भ ठेवावेत. नंतर

'शं नो देवीरभिष्ट्य आपो भवन्तु पीतये ।

शं योरभि स्त्रवन्तु नः ॥ऋ. १०.९.४)

या मंत्राने त्या पात्रात थोडे थोडे पाणी घालावे. मंत्र एकदाच म्हणावा. नंतर

यवोसि धान्यराजो वा वारुणो मधुसंयुतः ।

निर्णोदः सर्वपापानां पवित्रमृषिभिः स्मृतम् ॥

हा श्लोक म्हणून देवतांना अर्ध्य देण्याकरिता ठेवलेल्या दोन पात्रात यव, गंध, पुष्प, तुळशीपत्र घालावे. सर्वोपचारपूर्णतेकरिता त्यात यव टाकावेत.

नंतर 'देवांच्या अर्ध्याकरिता तयार केलेली सर्व पात्रे तयार आहेत.' असे यजमानाने म्हणून त्या पात्रांवर आपला उजवा हात पालथा ठेवावा. त्यास

कर्ता - "देवार्घ्यांपात्रे संपन्ने"।

ब्राह्मणः- "सुसंपन्ने" ।

असे ब्राह्मणाने उत्तर द्यावे. यजमानाने '

कर्ता- "स्वाहा अर्घ्याः ।

स्वाहा अर्ध्या' म्हटल्यावर ब्राह्मणांनी त्यास

ब्राह्मणः- - "संत्वर्घ्याः ।

असे उत्तर द्यावे.

नंतर कर्त्याने डाव्या हातात दर्भ व यव घेऊन ब्राह्मणाच्या उजव्या मांडीवर आपला डावा हात ठेवावा व उजव्या हातात यव घेऊन

'आवाहयिष्मे'

म्हणावे. त्यास ब्राह्मणाने 'आवाहय' (आवाहन करा) असे उत्तर द्यावे. तदनंतर

विश्वे देवास आ गत शृणुता म इमं हवम् ।

एदं बर्हिनि षिदत ॥ऋ.२.४१.१३)

हा मंत्र म्हणत ब्राह्मणाच्या डोक्यावर यव वाहून आवाहन करावे.

विश्वे देवाः शृणुतेमं हवे मे ये अन्तरिक्षे य उप द्यवि ष्ठ ।

ये अग्निजिहवा उत वा यजत्रा आसद्यास्मिन् बहिर्ष मदयध्वम् (ऋ. ६. ५२. १३)

हा मंत्र म्हणून झाल्यावर ब्राह्मणांच्या पायापाशी जमिनीवर शिल्लक राहिलेले यव टाकावेत. नंतर देवस्थानीय ब्राह्मणाच्या हातावर पाणी द्यावे. व अर्घ्यपात्रावरील दर्भ ब्राह्मणाच्या हातावर द्यावेत.

नंतर 'पुरूरवार्द्रव संज्ञका विश्वेदेवा' असे म्हणून देवस्थानीय ब्राह्मणाच्या हातावर अर्ध्यपात्रातील उदक द्यावे. त्यावर ब्राह्मणाने 'अस्त्वर्घ्यम्' म्हणावे अनेक ब्राह्मण असल्यास क्रमाने हा विधी करावा.

हातावर दिलेल्या पाण्यापैकी हातातून खाली स्रवणारे पाणी 'या दिव्या' मंत्राने पहावे. नंतर 'इदमर्ध्यं दत्तं त मम,' म्हणून देव ब्राह्मणाचे हातावर यवोदकातील कूर्च द्यावे. त्यावर 'अस्तु दत्तम्' असे प्रतिवचन ब्राह्मणाने द्यावे.

नंतर वरीलप्रमाणे म्हणून गंध, पुष्प, तुलसीपत्र, धूप, दीप व आच्छादन हे सर्व देतो. असे म्हणावे, व शेवटी 'स्वाहा', 'नमः' असे प्रत्येक उपचार देताना म्हणावे. ब्राह्मणाने प्रत्येक उपचार घेताना 'सुगंधाः,'

'सुपुष्पाणि,' 'सुपत्राणि' 'सुधूप;' 'सुदीप;' 'अस्तु स्वाच्छादनम्'

असे म्हणावे. नंतर पुढे अनुलेपनाकरिता गोपीचंदन, अंगावर धारण करण्याकरिता जानवे, फलाकरिता सुपारी व पवित्रतेकरिता, दोन दर्भ असे हे सर्व यजमानाने देवस्थानीय ब्राह्मणांचे हातात द्यावे व ब्राह्मणाने 'अस्तु पवित्रम्' असे प्रतिवचन द्यावे.

कर्ता - "देवेभ्य एतें गंध-पत्र-पुष्प-धूप-दीपाच्छादनानता उपचरा सर्वे परिपूर्णा भवन्तु । अर्चनाविधिः स्वर्चिताऽस्तु । न्यूनातिरिक्तं विधिवदस्तु" 'देवेभ्य एत'

मंत्र म्हणून ब्राह्मणांची प्रार्थना करावी. नंतर यजमानाने

युवा सुवासाः परिवीत धागात् स ड श्रेयान् भवति जायमानः

तं धीरासं कवय उन्नयान्ति स्वाध्यो मनसा देवयन्तः ।ऋ. ३.८.४)

हा मंत्र म्हणून ब्राह्मणांचे मस्तकावर व हातावर यव टाकावे, आणि हात जोडून प्रार्थना करावी. यावर ब्राह्मणांनी 'सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल' (अस्तु विधिवत्) असा आशीर्वाद द्यावा.

यानंतर देवस्थानीय ब्राह्मणास पितृपूजनाची अनुज्ञा मागावी, आणि ब्राह्मणांनी ती देताच पितृपूजनास प्रारंभ करावा.

ब. पितृपूजन

(अपसव्यम् । वामजानु निपात्य )

कर्ता - "अस्मत्‌पितृपितामहप्रपितामहानां अमुकशर्मणां अमुकगोत्राणां वसुरुद्रादित्यस्वरूपाणां ब्रह्मणे इदमासन्म् ।"

(इति सतिलं द्विगुणभुग्नान् दर्भान् वामभाग निधाय)

ब्राह्मणः- "स्वासनम् ।"

कर्ता- (निरंगुष्ठं विप्रकरं धृत्वा) "अत्रास्यताम् । धर्मोऽसि ।"

ब्राह्मणः- अत्रास्यामः ।

नंतर देवस्थानीय ब्राह्मणांच्या अनुज्ञेने पित्रादिकांचे पूजन करावे. (अपसव्याने) पितृस्थानीय ब्राह्मणांसमोर डावा गुढगा जमिनीवर टेकवून बाप, आजा व पणजा (आईचे श्राद्ध असल्यास आई, आजी व पणजी) यांचा नाम-गोत्रासह षष्ठी विभक्तीत वरीलप्रमाणे उच्चार करावा. आईचे श्राद्ध असल्यास 'माता पितामहप्रपितामहानां अमुकदानां अमुकगोत्राणां' असा उच्चार करावा, आणि शेवटी 'वसुरुद्रादित्यस्वरूपाणां' असे वर दिल्याप्रमाणे म्हणावे. पितृस्थानीय ब्राह्मणांच्या डाव्या मांडीखाली दुमडून तोडलेले दर्भ व तीळ ठेवून आसन द्यावे, व 'आपण येथे बसावे' (इदमासनम्) असे म्हणावे. ब्राह्मणाने 'स्वासनम्' म्हणून आसनाचा स्वीकार करावा.

तदनंतर यजमानाने पितृस्थानीय ब्राह्मणांच्या उजव्या हातांचा आंगठा सोडून चार बोटे धरावी, व 'आपण येथे बसावे. आपण धर्मस्वरूप आहात' असे म्हणावे. त्यावर 'श्रात्रास्यामः असे ब्राह्मणांनी उत्तर द्यावे. 'सांवत्सरिक श्राद्धात पितृस्थानी तुम्हाला क्षण देतो,' असे म्हणून ब्राह्मणाच्या हातावर एक किंवा तीन दर्भ द्यावेत. ब्राह्मणाने 'ॐ तथा' असे म्हणू ते स्वीकारावेत.

नंतर यजमानाने ब्राह्मणांस 'आपणास सर्व उपचार प्राप्त होवोत' असे म्हणावे; त्यावर ब्राह्मणांनी सर्व यथासांग मिळत आहे' असे म्हणावे. नंतर ब्राह्मणाला देण्याकरिता यजमानाने अर्घ्य तयार करावा. प्रथम पितृस्थानीय ब्राह्मणांच्या जवळील भूमी तिलोदकाने प्रोक्षित करून शुद्ध करावी, व त्या जमिनीवर दक्षिणेकडे टोके करून तीन तीन दर्भ अंथरावे. त्या दर्भांवर वायव्येकडून आग्नेय दिशेकडे अशी तिन पात्रे क्रमाने उपडी मांडावीत, व गायत्री मंत्राने प्रोक्षित करून उताणी करावीत. त्यामध्ये तिलोदक घालावे व

शं नो देवी देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये ।

शं योरभि स्रवन्तु नः ॥ऋ. १०.९.४)

हा मंत्र एकदाच म्हणावा. नंतर

"तिलोसि सोमदैवत्यो गोसवे देवनिर्मितः ।

प्रत्‍नवद्‌भि प्रतः स्वधया पितृनिमांल्लोकान् प्रीणबाहि नः स्वधा नमः ।"

हा मंत्र प्रत्येक वेळा म्हणून पात्रात तीळ टाकावेत. नंतर या सर्व अर्ध्यपात्रात गंध, पुष्प, भृंगराजपत्र (माका) वहावे. 'तीळ वाहून सर्व उपचार परिपूर्ण होवोत,' असे म्हणावे. ब्राह्मणांनी 'सुसंपन्नानि' असे प्रतिवचन द्यावे.

नंतर उजव्या हातात. तीळ व दर्भ घेऊन पितृस्थानीय ब्राह्मणाने डाव्या गुडघ्यावर हात ठेवावा, व 'अस्मत्.... आवाहयिष्ये,' म्हणजे 'आमचे बाप, आजे,पणजे यांना मी बोलावितो' असे म्हणावे. ब्राह्मणाने 'आवाहय' असे म्हणावे. हातात तीळ घेऊन

'उशन्तस्त्वा नि धमिह्युशन्तः समिधीमहि ।

उशन्नुशत आ वह पितृन् हविषे अत्तवे ।ऋ.१०.१६.१२)

हा मंत्र म्हणून ते तीळ वाहून प्रत्येक पितृस्थानापन्न ब्राह्मणाचे आवाहन करावे.

'आयन्तु नः पितरः सोम्यासोऽग्निष्वात्ताः पथिभिर्देवयानैः ।

अस्मिन्यज्ञे स्वधयय मदंत्वधि ब्रुवन्तु तेऽवन्त्वस्मान् ॥

हा मंत्र म्हणून पितरांची हात जोडून स्तुती करावी, व बाप, आजा, पणजा यांना बोलवावे. हातात शिल्लक राहिलेले तीळ ब्राह्मणाच्या पायाशी जमिनीवर टाकावेत.

नंतर अर्घ्यपात्राखाली घातलेल्या तीन दर्भांसह एकएक अर्ध्यपात्र उचलून ब्राह्मणाच्या जवळ क्रमाने

'स्वधा अर्घ्याः'

हा मंत्र प्रत्येक वेळी म्हणून ठेवावे. ब्राह्मणाने

'सन्त्वर्घ्याः

असे म्हणावे. नंतर यजमानाने सव्य करून ब्राह्मणाचे हातावर तिलोदक कूर्चाने द्यावे.

नंतर अर्घ्यपात्रावरील दर्भ ब्राह्मणाचे हातावर द्यावेत, व

'अस्मत्पितरिदं तेऽर्घ्यं

(हे अर्घ्य आमच्या पित्याला अर्पण असो), असे म्हणून पितृस्थानीय ब्राह्मणाच्या हातावर अर्घ्यपात्रातील उदक द्यावे. नंतर

'या दिव्या आपः पृथिवि संवभूवुर्या अंतरिक्षा उत पार्थिवीर्याः । हिरण्यवर्णा यज्ञियास्ता न आपः शं स्योना भवन्त

हा मंत्र यजमानाने म्हणावा व ब्राह्मणाचे हाताला हात लावावा.

नंतर यजमानाने अपसव्य करून

'पित्रे इदमर्घ्यं दत्तं न मम'

हे वाक्य म्हणून ब्राह्मणाच्या हातावर तिलोदक द्यावे. नंतर ब्राह्मणाने

'अस्तु दत्तम' असे म्हणावे. नंतर पुन्हा सव्य करावे, व ज्याप्रमाणे पितृस्थानीय ब्राह्मणांना अर्घ्य दिले तशाच पद्धतीने पितामहस्थानीय आणि प्रपितामहस्थानीय ब्राह्मणालाही त्या त्या अर्घ्यपात्रातील उदकाने अर्घ्य द्यावे. मात्र जेथे 'पितृ' शब्दाचा उच्चार केला असेल, तेथे 'पितामह' 'प्रपितामह' या शब्दांचे उच्चार क्रमाने करावेत.

नंतर पितृदेवतोद्देशक अर्घ्यपात्रातील उदक अंगठ्याच्या मध्याने ओठाला लावावे व म्हणावे की, हे उदक मी आपल्या ओठाला पुत्रप्राप्तीच्या इच्छेने लावतो.' ब्राह्मणाने म्हणावे, 'पुत्रवान् भव.'

नंतर अपसव्य करून पहिले पित्याचे अर्घ्यपात्र देवस्थानीय ब्राह्मणाच्या उत्तरेकडे दर्भावर पालथे घालून, किंवा प्रपितामहपात्रावर ठेवावे. 'पितृभ्याः' स्यानमसि,' या वाक्याने त्या द्रोणावर तीळ टाकावेत. 'गंध, पुष्प, तुलसीपत्र, माका हे सर्व तिळांनी प्राप्त होवोत,' असे म्हणून पुनः तीळ वहावेत. नंतर कर्त्याने हातापायाला पाणी लावावे.

हे झाल्यावर बाप, आजा व पणजा यांचा संबोधन विभक्तीमध्ये नाव, गोत्र, व वसुरुद्रादित्य स्वरूपे यांच्यासह वर दर्शविल्याप्रमाणे उच्चार करून पूर्वी देवस्थानीय ब्राह्मणांची जशी पूजा केली, त्याप्रमाणे पितृस्थानीय ब्राह्मणांची गंध, पुष्प, तुळशी, माका, धूप, दीप, आच्छादन, यज्ञोपवीत, सुपारी व दोहोपेक्षा अधिक म्हणजे तीन, चार, पाच असे दर्भ वगैरे देऊन पूजा करावी. पूर्वीप्रमाणे त्या त्या पितृस्थानीय ब्राह्मणाने त्यांचा स्वीकार करावा.

नंतर

इदं पितृभ्यो नमो अस्त्वद्य ये पूर्वासो य उपरास ईयुः ।

ये पार्थिवे रजस्या निषत्ता ये वा नूनं सुवृजनासु विक्षु ॥ऋ. १०. १५. २)

हा मंत्र म्हणून पितरांचे म्हणजे पितृस्थानीय ब्राह्मणांचे हातावर तीळ द्यावेत व यजमानाने हात जोडून प्रार्थना करावी की, 'हे गंधादी सर्व उपचार परिपूर्ण होवोत.'

'हे पूजन आपणास सुखाकारक होवो,' असे कर्त्याने म्हटल्यावर ब्राह्मणाने 'स्वर्चितः' असे उत्तर द्यावे. 'कमी जास्त झाले असल्यास त्यासंबंधी दोष न लागता ते यथाशास्त्र असो,' असे कर्त्याने म्हणताच त्यास ब्राह्मणाने 'अस्तु विधिवत्' प्रत्युत्तर द्यावे.

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP