मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|गौळणी| लळित गौळणी १६८ ते १८० १८१ ते १८८ लळित संत निळोबाराय - लळित निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत लळित - २७४ ते २९० Translation - भाषांतर २७४असों चरणावरी तुमच्या ठेऊनियां मन । करुनियां कीर्तन रुपीं तुमचियां दृष्टी ॥१॥होईल ते हो कैसी आमुची गती । नणों योगयुक्ति तप साधन दुसरें ॥२॥सांगितलें संती करा नामाचा घोक । नलगे मग आणिक कृपा करील श्रीहरी ॥३॥निळा म्हणे विश्वासें त्या राहिलों ठायी । ठेऊनियां पायीं जीवभाव सकळ ॥४॥२७५उचित अनुचित आम्ही नेणों नेणतीं । सर्वोविशीं मूढचि मती विदीत असावें ॥१॥म्हणोनियां आतां कृपादृष्टी अवलोका । वैकुंठनायका नका उपेक्षा करुं ॥२॥हीन दीन मूर्ख परि शरण तुम्हासी । आलो हषिकेशी अंगिकारावा ॥३॥निळा म्हणे तुम्ही देवा कृपा सागर । मी तंव किंकर लवण रेणू सानसा ॥४॥२७६गोड माझी वाणी तुम्हीं करुनि श्रीहरी । लावावी वैखरी कीर्तनस्तवनीं आपुलिये ॥१॥इतुलेंनिचि सार्थक माझया होईल जन्माचें । अभयदान तुमचें ऐसें झालियावरी ॥२॥बहुत दिवस आस्था मनीं वाहिली हेचि । करावी तुमची सेवा-स्तुति निजभावें ॥३॥निळा म्हणे चरणावरीं ठेविली डोई । अपराध ते माझे कांहीं मना नाणावें ॥४॥२७७ठेऊनियां भाव तुमचिये चरणीं । बैसेन श्रवणीं वैष्णव करितां कीर्तन ॥१॥याचिपरी सार्थक हा करीन काळ । जाऊं नेदी निर्फळ ऐसें आयुष्य नरदेह ॥२॥यथामती वर्णीन तुमचे कीर्तिपवाडे । नाचोनी बागडे नाचोनी बागडे निर्लज्ज होउनी मानसीं ॥३॥निळा म्हणे हेंचि आर्त निरंतर माझें । चरण यासी साक्ष तुझे पंढरीनाथा ॥४॥२७८तुमचीया बळें तुम्हांसवें खेळावें । आपल्या नाडावें मतिवादें धांवता ॥१॥याचिसाठीं क्षणक्षणां विनंति करीं । ठेवावें मजवरी अवलोकन कृपेचें ॥२॥तुम्हांसी न भजतां योगयाग सायास । तैंचि भवपाश होती फळें देऊनी ॥३॥निळा म्हणे जप तप ध्यान संपत्ति । कृपेंविण तुमचे होती बंधना मूळ ॥४॥२७९दुजे नेणोनियां कांही । आठवितों तूतें देहीं ॥१॥यासी साक्षी तूंचि कीं गा । अंतरींच्या पांडुरंगा ॥२॥जे जे उठती संकल्प । मनी तें तें तुमचे रुप ॥३॥निळा म्हणे चित्तें वित्तें । होतें जें जें कांहीं जातें ॥४॥२८०देतां घेतां येतां जातां । सदा तुझी संनिधता ॥१॥नाहीचि कल्पांतीं वियोग । ऐसे व्यापियेले अंग ॥२॥नाहींचि कल्पांतीं वियोग । ऐसें व्यापियेले अंग ॥३॥सवप्न निद्रे आणि जागृती । अवघे ठायीं तुझीचि स्तुती ॥४॥निळा म्हणे देखे ऐके संगें तुझया जें जें चोखे ॥५॥२८१त्रिवेणीसंगमी बुडती बहुत । नेघे प्रायश्चित त्यांचे गंगा ॥१॥ज्यांचे कर्म जैसें भोगिती ते फळ । गंगा ती निर्मळ जैसी तैसी ॥२॥बुडती जहाजें वायूचिया संगे । परि दोष नलगे वायूसी तो ॥३॥निळा म्हणे तैसा परमात्मा श्रीहरी । वर्ते सर्वांतरी अलिप्तपणें ॥४॥२८२न मागों कांही तुम्हां धन वित्त संपत्ती । सोसुनी विपत्ती नाम गाऊं आवडी ॥१॥न घेऊनियां भार जाणीव शहाणीव माथां । करुं तुमची कथा नित्यकाळ आवडी ॥२॥वसउनि संतसमुदाय भोंवते । गाऊं नाचूं प्रेमें आठवुनि तुम्हातें ॥३॥निळा म्हणे ऐशापरी सारुं आयुष्य । करुनियां दास्य राहों तुमचे चिंतनी ॥४॥२८३नामीं गोंवियली वाचा । मनीं संकल्प हा तुमचा ॥१॥ऐसा वेष्टलों जी हरी । हातें पायें अवघ्यापरी ॥२॥देखों जाय रुप तें दिठी । श्रवणीं त्याही तुमच्या गोष्टी ॥३॥निळा म्हणे घरीं दारीं । देशी तूंचि देशांतरीं ॥४॥२८४नि:सीम भाव देखोनियां हरि । केली स्वीकारी पूजा त्याची ॥१॥पत्र पुष्प तोय फल । घाली सकळ मुखींचि तें ॥२॥कांहींची नेदी जाऊं वांया । पाहे भक्तांचिया हाताकडे ॥३॥निळा म्हणे संतोष मानी । क्षीराब्धीहुनी परमामृता ॥४॥२८५परात्पररुपी ज्ञानाज्ञान आटे । परि हा लावी वाटे श्रुतीचिये ॥१॥वेदविहितासी न पाडी अंतर । लाघविया थोर सूत्रधारी ॥२॥भोगुनी गौळणी होय ब्रम्हचारी । अलिप्तपणें चोरी दहीं दूध ॥३॥निळा म्हणे सर्व अग्निसंगे जळे । परि दोशा नातळे अग्नी जेवीं ॥४॥२८६पावो माझीं हेचि सेवा । करितों नित्यानित्य देवा ॥१॥तुजचि आवडीच्या सुखें । गातों वार्णितों ते मुखें ॥२॥पढतों ज्या ज्या नामावळीं । वाजवूंनियां हातें टाळीं ॥३॥निळा म्हणे ध्यानीं मनीं । जें कां चिंतितों चिंतनीं ॥४॥२८७भाविकाचें अवघेंचि गोड । करुनि कोड स्वीकारी ॥१॥भोळा नाथ पंढरीचा । न करी दासाचा अतिक्रम ॥२॥न म्हणे रुक्ष थोडें कांही । घाली अवघेंही मुखींचि तें ॥३॥निळा म्हणे कृपावंत । उभा तिष्ठत विटेवरीं ॥४॥२८८मागें पुढें अवघा हरी । घरीं दारीं हदयांत ॥१॥याविण रितें न दिसे कोठें । सानें मोठें अणु रेणु ॥२॥गगन दिशा महितळी । माजि पोकळीं तोचि तों ॥३॥निळा म्हणे मनाबुध्दी । माजी संधी इंद्रियांच्या ॥४॥२८९राजा जाय तिकडे ऐश्वर्य संपत्ती । वैभवें चालती समागमें ॥१॥वसे वनामाजी तेथें सर्व सिध्दी । घेऊनि समृध्दी वसतीपाशीं ॥२॥नाहीं उणें धनावस्त्रा आणि भूषणा । अन्ना काष्ठा जीवना तृणा सैन्या ॥३॥निळा म्हणे देवा तुम्ही लक्ष्मीवर । उभे कटीं कर जयापाशीं ॥४॥२९०राहो ध्यानीं मनीं हेंचि नित्य रुपडें । जे कां वाडेंकोडे आलें पुंडलिका भेटी ॥१॥ठेवूनियां विटे दोन्ही चरण सुकुमार । विराजले कर सुंदर कटिप्रदेशीं ॥२॥ज्यातें चिंतिताती योगी मुनिजन मानसीं । संत ज्यातें भजती नित्य कीर्तनआवेशीं ॥३॥निळा म्हणे त्याविण दुजें नलगे मज कांहीं । जाणे अंतरीचें पांडुरंग सकळही ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 23, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP