मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|बालक्रीडा| ८ ते २० बालक्रीडा ८ ते २० २१ ते २९ अभंग - ८ ते २० निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत अभंग - ८ ते २० Translation - भाषांतर ८गडियां म्हणे पळतां घरें ।नवनितें क्षीरें असती ते ॥१॥म्हणती गोवळ ऐके कान्हा ।आहेसि तूं देखणा पुढें होई ॥२॥आम्ही नेणो थारेमारे ।अवघीं घरें तुज ठावीं ॥३॥निळा म्हणे काढीं माग ।आम्ही सवेग येऊं मागें ॥४॥९ऐकोनि बोल हांसे त्यांचे ।म्हणे हे बेटयाचे पोट पोसे ॥१॥आयतें आणूनि द्यावें हातीं ।मग हे सेविती स्वानंदें ॥२॥तयां म्हणे यारे लागे ।माझिया मागें चोजवित ॥३॥निळा म्हणे पाळतिही करी ।आपणचि चोरी वाटी त्या ॥४॥१०चित्ताचे चिंतनी मनाचें मननी ।जीवाचे जीवनीं कृष्ण त्यांचे ॥१॥बुध्दीचे बोधनीं श्रोत्राचे श्रवणीं ।आमोद घेतां घ्राणी कृष्णीं मन ॥२॥देहीं देहभावा नेणती स्वभावा ।इंद्रियांचीया धांवा कृष्णरुपीं ॥३॥निळा म्हणे त्यांचा वर्तता व्यापार ।अवघा शार्ङगधर होऊनि ठेला ॥४॥११पांवा वाजवी मोहरी ।बार हमामा हुंबरी ॥१॥नाचे गोपाळांच्या छंदें ।क्रीडा करी ब्रम्हानंदें ॥२॥सांगोनी येरयेरां काहाणी ।कोडीं उगविती उमाणीं ॥३॥निळा म्हणे नाना सोंगें ।संपादिलीं पांडुरंगें ॥४॥१२नाहीं त्या उरलें दुजें कृष्णविण ।ब्राह्य अंत:करण कृष्ण झाला ॥१॥जीवाचाही जिव शिवाचाही शिव ।देहीं देहभाव कृष्ण झाला ॥२॥शब्दा शब्दविता बोधा बोधविता ।चित्ता चेतविता झाला कृष्ण ॥३॥निळा म्हणे कृष्णें केलें कृष्णाकार ।सबाह्य अंतर रंगविलें ॥४॥१३दहींदूध तूप लोणी ।आणि दुधाणी चोरुनी ॥१॥म्हणे घ्यारे पोटभरी ।आपणहि स्वीकारी त्यांसवे ॥२॥नाचे हातीं लोणीया गोळे ।नाचवी गोवळें भोंवताली ॥३॥निळा म्हणे चाहाळी करी ।रिचवी वरी आणि हांसे ॥४॥१४घुमघुमिती मोहर्या नादें ।पांवे छंदें वाजविती ॥१॥शिंगें काहाळा गजर झाला ।श्रीहरि शोभला समुदायें ॥२॥अंगी चंदन बाणली उटी ।कास ते गोमटी पितांबरें ॥३॥निळा म्हणे केशर भाळीं ।तेज बंबाळी मुगुटाचें ॥४॥१५नाचती विनोंदें ।क्रीडा करी त्यांच्या छंदें ॥१॥गोवळ वांकुल्या दाविती ।आलें वाचे ते बोलती ॥२॥म्हणती चोरटया शिनळा ।दोघां बापांचिया बाळा ॥३॥लटिकीया कपटिया कुचरा ।निर्बल नपूंसका निष्ठूरा ॥४॥तोंडें वांकुडी पिचके डोळे ।तयां माजीं आवडी खेळे ॥५॥निळा म्हणे विश्वासिया ।न वजे दुरि पासूनियां ॥६॥१६बहुत अवतार घेतलीं सोंगें ।बहुतां भक्तांसी तारिलें मागें ।बहुताचि शोभला बहुतां अंगे ।बहुतां संगे क्रीडा केली ॥१॥मासा कांसव डुक्कर झाला ।नृसिंह वामन होउनी ठेला ।भक्ताचें काजीं संकटे याला ।बहुत अवगला अवगणिया ॥२॥एके दिवशी गोधनामागें ।अवघाचि गिळियला होता नागें ।त्यातें चिरुनियां निघाला वेगें ।वांचला भाग्यें गौळियांच्या ॥३॥एकदां वोणवा गिळितुचि आला ।गोवळे देखोनि धाकिती त्याला ।पसरुनी मुख तो अवघाचि प्याला ।विराट झाला स्वरुपी हा ॥४॥वनामाजी ब्रम्हा चोरुनी आला ।वत्सें गोवळे घेऊनी गेला ।अंगे आपण तैसाचि झाला ।मिरवत आला गोकुळांत ॥५॥इंद्राचि पांजी आपनचि खाय ।त्याचिया क्रोधें पाउसाचे भय ।मग उचलूनी डोंगर तळीं त्या राहे ।गोकुळासगट नाहीं भ्याला ॥६॥चेंडुवाच्या मिसें बुडाला डोहीं ।काळियाचि नाथुनी आणिला पाही ।नाचती गोवळे वोसरल्या गाई ।आनंदासी काई उणे तेथें ॥७॥व्देषिया म्हणोनि मामा तेचि मारी ।विश्वासी म्हणोनी पांडवा घरीं ।आवडत्या म्हणोनी भोगिल्या नारी ।लाघवी मुरारी खेळ खेळे ॥८॥निळा म्हणे हा भक्तांसाठीं ।नाना कचाटें सोसितो आटी ।धरुनियां भावे बैसतां पोटीं ।सोडवी संकटी स्वामी माझा ॥९॥१७ब्रम्ह आणि गोवळपणें ।यज्ञ भोक्ता आणि उच्छिष्ट खाणें ।महर्षिस्तव आणि हुंबरी घेणें ।नाटकी विंदानें अघटित ॥१॥नित्यमुक्त आणि बांधला गळा ।परात्पर आणि कोंडिती बाळा ।ब्रम्हचर्य आणि सहस्त्र सोळा ।भोगिल्या अबळा आणिखीही ॥२॥असुरमर्दन आणि मारिती गौळणी ।लक्ष्मीकांत आणि चोरितो लोणी ।ईशाचा ईश आणि फोडितो दुधाणीं ।गुणातीत अगुणी भरलासे ३॥विश्वव्यापक आणि यशोदे कडिये ।शुकाचें ध्यान आणि दासी पिढिये ।कृपावंत आणि मारिली माये ।रडे ये माये ये माये लटिकाचि ॥४॥रोमीं ब्रम्हांडे आणि बाळक झाला ।आतुर्बळी आणि उखळी बांधिला ।बळीचा व्दारपाळ आणि पंढरियें आला ।पुसतांचि याला नाहीं कोणी॥५॥सखा भावाचा आणि मामासीचि मारी ।धर्मस्थापक आणि अकर्मे करी ।देहातीत आणि आयुधें धरी ।अकर्ता करी मना आलें ॥६॥सर्वज्ञचि आणि नेणता झाला ।काळाचाहि काळ आणि बाऊसि भ्याला ।माउशीचे स्तनीं विषचि प्याला ।उत्तीर्ण तिये झाला जीवघातें ॥७॥अरुप आणि घेतलीं सोंगें ।निष्काम आणि गौळणी मागें ।नित्य तृप्त आणि गोवळसंगे ।नित्य उच्छिष्टें खाय त्यांची ॥८॥भूपति आणि मंत्री माकडें ।अर्धांगी नोवरी आणि नेली म्हणून रडे ।नावा सांडुनी तारितो दगडें ।वनवासी उघडें फळें भक्षी ॥९॥अमरां पूज्य आणि राखितो गाई ।क्षिराब्धीचा जामात आणि घोंगडें डोई ।ईशाचा ईश आणि लोळतो भुई ।नंदाचे गोठणीं गाईवाडा ॥१०॥सनकादिक देव स्तविती भावें ।तो हा लंपट गौळणीसवें ।न मागती त्यांसी देऊचि धांवे ।आणि मागत्यासी व्हावें अतिकृपण ॥११॥जगदानी आणि भिकारी झाला ।विराटरुपी आणि खुजट ठेला ।त्रिपाद देतां त्रैलोक्य नेला ।शेखीं बळीनें बांधला व्दारदेशीं ॥१२॥नित्य पूर्ण आणि भोजन मागे ।बाळकाचि दात्याचें कांपवी अंगे ।न जेवितां सवें पळोचि लागे ।मग धांवे त्यामागें विमानीं घालीं ॥१३॥दयावंत आणि अंगींच चिरलें ।मयोरध्वजाचीं केलीं शकलें ।उदार कर्णाचे दांतचि पाडिले ।शिबीतें सोलिले कपोतासाठीं ॥१४॥ब्राम्हणभक्त आपणा म्हणवी भला ।आणि नारदाची नारदी करुनी ठेला ।सख्ये बहिणीची भीड नाहीं याला ।जांबळाच्या निमित्यें केला उपहास ॥१५॥वेदांसी स्तवितां उगाचि बैसे ।आणि गौळणीच्या शिव्या ऐकोनि हांसे ।नित्यानंद आणि रडतचि बैसे ।आळी घेउनी मिसे जेवणाच्या १६॥निळा म्हणे हा लाघवी हरी ।कांहींही न करुनी अवघेंचि करीं ।भक्तां व्देषियां एकेचि परी ।निंदा स्तुतीवरी सम देणें ॥१७॥१८भाविक गोवळ ।अंगी विश्वासाचें बळ ॥१॥तेणें स्थिरावली बुध्दी ।निश्चळ झाली हरीच्या पदीं ॥२॥नाही ओढा वारा ।चित्तीं चैतन्याचा थारा ॥३॥निळा म्हणे हरीच्यासंगें ।करिती क्रीडा नानारंगें ॥४॥\१९तुमच्या कीर्तनें पावलों पार ।भवसिंधूचा लहान थोर ।पशुपक्षी दैत्य निशाचर ।नारीनर बाळकें ॥१॥पुण्यपावन तुमची कथा ।एकाक्षर श्रवणीं पडतां ।झाडा करुनियां दोषां दुरितां ।कलिमल तत्वता विध्वंसती ॥२॥हरिनामाच्या घोष गजरी ।ध्वनि रिघतांचि कर्णविवरी ।भितरील पातकांचिया हारी ।दिशा लंघोनि पळताती ॥३॥आनंदासि उणेंचि नाहीं ।कोंदोनि ठाके अंतर्बाही ।नाना चरित्रांची नवाई ।श्रोते ऐकोनि संतोषती ॥४॥गिरी उचलिला गोवर्धन ।निजमुखें प्रासिला हुताशन ।काळिया आणिला नाथून ।मिसें जाऊन चेंडूवाच्या ॥५॥वत्सें गोवळे चतुराननें ।नेतां अवघीं आपणचि होणें ।स्तनीं लावितां पूतनाशोषणें ।केलीं विंदानें अघटित ॥६॥परता सारुनियां सागर ।माजी रचिलें व्दारकापूर ।निद्रा न मोडितां नारीनर ।मथुरा नेऊन सांठविली ॥७॥काळयवनासि ठकिलें कैसें ।मुचकुंदावरी नेला पळत्या मिसें ।जाळूनि त्याचे केलें कोळसें ।आपण निराळा साक्षपणें ॥८॥भाजीदेठें तृप्त होणें ।पांडवा नेणतां ऋषिभोजनें ।परीक्षितीसी गर्भीचि रक्षणें ।अपूर्व विंदाने श्रीहरीचीं ॥९॥यशोदेचें स्तनपान करीत ।नंदा कडिये विराज तेथ ।गोपिकांचे मनोरथ ।पूर्ण करित रासक्रीडे ॥१०॥गौळणी रंजवी नानापरी । दूध लोणी त्यांचे चोरी ।उणें पडतां त्यांचिये घरीं ।अधिकचि करीं वाढूनियां ॥११॥गायींमागें धांवे रानीं ।घोंगडें काठी पावा घेउनी ।नानापरीचीं खेळे खेळणीं ।लीलाविग्रही अवतारी ॥१२॥ऐशीं अगाध दिव्य चरित्रें ।गाती ऐकती त्यांची गात्रे ।अवघीं होऊनियां पवित्रें ।जाती वैकुंठा निळा म्हणे ॥१३॥२०वळत्या आम्हांसी पाठवी ।त्याचा नाठवी उपकारही ॥१॥नका येऊं देऊं संगें ।लावा मागें भोवंडुनी ॥२॥याची वोढाळें धांवती ।सैरा नाटोपती तें आम्हां ॥३॥निळा म्हणे ऐकोनी हरीत्यांचे करी समाधान ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 21, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP