विठूराया विठूराया, आता थकलीरे काया ।
मिळेल कां अवसान, मुखीं तुझे नाम गाया ?
नाहीं पंढरीला आलो, वाळवंटीं विसावलो ।
नामयाच्या पायरीला, हात लावोनी वाकलो ।
शतयोजने चालून, मुखीं घोष, तुझे नाम ।
नाहीं नाचलो दिंडींत, मागे पुढतीं होऊन ।
परी सांगतो विठ्ठला, द्वेष पोटीं ना ठेविला ।
कामक्रोधाचा उमाळा, दूर दूर रे सारिला ।
वित्त मिळविण्यां कधीं, नाहीं बाळगिली हाव ।
मन शुध्द ठेवोनियां, जोपासिला प्रेमभाव ।
पंढरीच्या विठूराया, ऐशां निर्मळ साधकां ।
ठाव आहे तुझ्यापाशीं, देशी काय एक मौका ।
जगीं, व्यवहार सदा, बंधु-भावाचा म्या केला ।
जगीं, मानव हा देव, तीच जाती, नाती मला ।

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP