अशी घाल टोपी, ठेव अशी टोपी,
जी घालायला सोपी, जी फिरवायला सोपी, जी मिरवायला सोपी ।
अशी घाल टोई, वेडया घाल अशी टोपी ॥ ध्रृ ॥
कोनावर घाला वा तिरकस घाला ।
नाकावर घाला वा टाळूवर घाला ।
पण टोपी घाला, कुणालाही घाला । कुठेही घाला, पण टोपी घाला ।
अशी ही टोपी, जी घालायला सोपी, जी फिरवायला सोपी,
अन् मिरवायला सोपी ॥ ध्रृ ॥
साह्यबाची टोपी, दिसायला मोठ्ठी ।
पण पायात हवी पँटी, अन् हातात हवी काठी ।
आमची टोपी ढवळी, डोक्याला पावली, किंमतीची आधेली,
उन्हाचा ताप घालवून देते ।
मर्दाची छाप, एकदम आणते ।
घालनाराचं पाप, छपवुन ठेवते ।
कोणाचाही बाप, उलथुन टाकते ।
अशी ही टोपी, घालायला सोपी, जी फिरवायला सोपी,
अन् मिरवायला सोपी । अशी घाल टोपी बेट्या घाल अशी टोपी ।
तुम्ही असा खप्पी वा तुम्ही असा हिप्पी ।
अहो तिला डोक्यावर ठेवा, अहो डोक्यावर ठेवा ।
तुमच्या रुबाबाचा हेवा, अहो डोक्यावर ठेवा ।
तुमच्या रुबाबाचा हेवा । मनांतला कावा मनातच ठेवा ।
मुखात सदा सेवा, जन्तेची सेवा, अन् पैशाचा मेव पोटाबाहेर
खाव, `स्वाहाक्कार हवाना - सहकार हवाना, खुर्ची टिकवा,
खुर्ची टिकवा ।
खुर्चीची ऐट, बस तिथ टाइट, हक्क तुझ्या बाडचा मग काय वाईट ?
अशी ही टोपी, घालायला सोपी, अन् मिरवायला सोपी ।
जी फिरवायला सोपी,
अशी घाल टोपी बेटया घाल अशी टोपी ॥
लोकांना सांगा झालास चेऽअरमन, लोकांना सांगा झालास ना
चेऽअरमन,...आली, आली, पैशाची खाण, आली पैशाची खाण,
देवाची आण, साखरेतलं खाणार त्याला देव देणार, देव खूप देणार,
काय काय देणार ? देणार घरऽदार, येणार मोटार कार, समद्याचं सार या
टोपीला जपा, खुर्चिला जपा, साह्यबांना जपा, साह्यबांना साह्यबांना जपा.
दिल्लीची मर्जी होईल खपा, होईल खपा, अशी ही टोपी, जी घालायला
सोपी, जी फिरवायला सोपी अन् मिरवायला सोपी अशी घाल टोपी
बेट्या घाल अशी टोपी ।
एकदा काय झालं सणक मला आली, सणक मला आली पद् दलितांचा
व्हावा आपण वाली, गेलो वडार गल्लीं तर चक्कर मला आली, आहो
चक्कर मला आली ।
रस्त्यावर टेकलो अहो रस्त्यावर टेकलो ।
जराशाने उठलो, खोपडीवरची टोपी आर ऽ पार मळली ।
आता भट्टीवर जाणार । धुवायला देणार, धुवायला देणार ।
टिनोपाल पुढारी, सभे पुढे येणार, सभे पुढे येणार अन्
भाषण बी ठोकणार,...अशी ही टोपी, जी घालायला सोपी जी
फिरवायला सोपी अन् मिरवायला सोपी ।
अशी घाल टोपी बेटया घाल अशी टोपी ।