वामन जयंती - ज्ञानदेव तु कैवल्यम
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
गुरुवार ता. ४-९-१९३०
ज्ञानाविण मुक्ति नसे लभ्य जाणा । श्रीगुरुचरणां आश्रयावे ॥१॥
कर्माचियायोगं चित्तशुद्धी होत । ज्ञानायोग्य होत चित्त जाणा ॥२॥
हिरण्यगर्भाची करितां उपासना । सामर्थ्य ये मना अनिवार ॥३॥
वाणीमाजी सिद्धी सर्व प्राप्त होती । ज्ञान त्वरित गति साध्य होई ॥४॥
नोहे नोहे नोहे मोक्ष तो कर्माने । हे त्रिविक्रमाने दावीयेले ॥५॥
ह्रदाकाशी आहे स्थित जो वामन । करितां त्याचे ध्यान ज्ञानसिद्धी ॥६॥
विनायक म्हणे तया वामनसी । भजूं आनंदेसी सार्वकाळ ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : February 02, 2020
TOP