वराह जयंती - वराहावतार-हिरण्याक्षवध

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. ५-९-१९२९

वराहरुपे प्रगटला । उद्धरीता होय भला ॥१॥
त्याचे यश चिंतितो मी । रुप त्याचे ह्र्दयधामी ॥२॥
कूर्मदृष्टीने पाहिले । विष्णुराज-देवे वहिले ॥३॥
अद्भुतरुप धरीयेले । वराहरुपे प्रगटले ॥४॥
उद्धार केला पृथ्वीचा । यशवानी काय वाचा ॥५॥
क्रोडरुपी जनार्दन । तया करितो नमन ॥६॥
जयन्तीचा दिन आज । प्रगटले दिव्य तेज ॥७॥
आदिवराहाचा झाला । अवतार महा भला ॥८॥
तोच पुण्य दिन आज । विष्णु आले भक्त-काज ॥९॥
हिरण्याक्षा मारियेले । वराहाचे चरित्र भले ॥१०॥
अपत्य-कांक्षिणी दिती । प्रार्थितसे निजपती ॥११॥
कामातुर सती नारी । पतिचा ती पदर धरी ॥१२॥
संध्यावेळा घोरा अती । होम देत तीचा पति ॥१३॥
होमशाळेमाजी जाई । भोग म्हणे मज देई ॥१४॥
निवारित तिचा पति । पति न ऐके महासती ॥१५॥
परोपरी कश्यपाने । उपदेशीले बोधवचने ॥१६॥
घोर वेळा ही वर्तत । परि ती दिती न ऐकत ॥१७॥
भोग देता सती नारी । पतिचे पाय मग धरी ॥१८॥
गर्भ लक्षणांते सांगा । व्यर्थ केला म्हणे त्रागा ॥१९॥
पश्चाताप मज झाला । अपराध थोर घडला ॥२०॥
क्षमा करा म्हणे मज । प्रार्थिते मी अपत्यकाज ॥२१॥
लक्षण सांगा अपत्याचे । मजलागी आतां साचे ॥२२॥
कश्यप तिज सांगताती । दुष्ट पुत्र होय निश्चिती ॥२३॥
दैत्य तुझ्या पोटी येती । त्रिभुवने उपद्रविती ॥२४॥
घाबरली दिती माता । कृपा करा भगवंता ॥२५॥
दिनवाणी परिसोनी । सांगताती तीस मुनि ॥२६॥
भगवान अवतरे । पुत्रासाठी जाणी खरे ॥२७॥
त्याचे हाती मृत्यु असे । निश्चय वाचा सांगतसे ॥२८॥
तेव्हां दिती शांत झाली । दोन पुत्र पसवली ॥२९॥
हिरण्याक्ष हिरण्यकश्यपु । पुत्र दोघे विश्वरिपु ॥३०॥
ब्रह्मवरे मत्त झाला । हिरण्याक्ष जाणा भला ॥३१॥
जिंकतसे त्रिभुवन । झुंजार म्हणे मज कोण ॥३२॥
कोपला तो दैत्यराज । शोधी देव युद्धकाज ॥३३॥
रसातळी जातां त्यासी । भेट होई वराहासी ॥३४॥
घन-घोर युद्ध झाले । हिरण्याक्षापाशी भले ॥३५॥
मुहूर्त होता अभिजात । ब्रह्मदेव विनवीत ॥३६॥
समय हा मारण्याचा । योग्य असे देवा साचा ॥३७॥
मग दैत्य मारियेला । आदि वराहाने भला ॥३८॥
चरित्र ऐसे वराहाचे । वानील कोण जाणा वाचे ॥३९॥
विनायक पद नमी । म्हणे कृपा करा स्वामी ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP