मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|कृष्णजयंती| पृथ्वीची देवांस प्रार्थना कृष्णजयंती विषय कृष्ण जन्मकथा कथा आरंभिण्यास आज्ञायाचना कंसाचे अत्याचार पृथ्वीची देवांस प्रार्थना देवाची विष्णूस प्रार्थना विष्णूचे आश्वासन वसुदेव-देवकी विवाह व आकाशवाणी भ्रुणहत्या देवकी गर्भात भगवत्संचार कृष्णजन्म गोकुळांत आगमन कृष्णजयंती - पृथ्वीची देवांस प्रार्थना श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन पृथ्वीची देवांस प्रार्थना Translation - भाषांतर असुर त्रासे त्रस्त धरा विधिपाशी । घेवोनी सुरांसी जात असे ॥१॥दैत्य वृत्त कथी बहुत आक्रन्दे । स्फ़ुदोनियां रडे विधिपाशी ॥२॥दया आली मग विधि काय करी । तयांसी साचारी कैलासी ने ॥३॥शंकरासी वृत्त कथी ब्रह्मा आपण । म्हणत रक्षण करा आतां ॥४॥धूर्जटिसीं कोप अत्यंत पातला । म्हणे आतां चला विष्णूपाशी ॥५॥क्षीर सागरींचा जो शेषशयन । तया वर्तमान कळविती ॥६॥विनायक म्हणे नारायणापाशी । सकळ शीघ्रेंसी पातले ते ॥७॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP