मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|राम नवमी| रामजन्म राम नवमी विषय दशरथाचा यज्ञाविषयी विचार मसलतीची अंमलबजावणी सूत निवेदन पायसप्राप्ति रामजन्म राम नवमी - रामजन्म श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन रामजन्म Translation - भाषांतर ऋष्यशृंग पदी ठेवोनियां माथा । म्हणे माझ्या अर्था पुरविले ॥१॥सभार्य येवोनी मज धन्य केले । प्रसादाते भले पावविले ॥२॥ऐशी करी स्तुति परम तुष्ट राजा । अयोध्येसी बोजा परतला ॥३॥तीन्ही राण्या होती मग गरोदर । तेज ते प्रखर लोटतसे ॥४॥परब्रह्म आले कौसल्येच्या पोटी । शोभत गोमटी गर्भतेजे ॥५॥चैत्र नवमीसी मध्याह्नी येतां रवि । प्रभाते प्रगटवी तेव्हां मह ॥६॥सुर-वर पुष्पवृष्टि करिताती । दुंदुंभि वाजती स्वर्गामाजी ॥७॥शुद्ध पक्षामाजी देव अवतरे । आनंद संचरे त्रैलोक्यांत ॥८॥अप्सरा नाचती गंधर्व आलपिती । उत्सव करिती त्रिभुवनी ॥९॥कौसल्येसी राम कैकेयीसी भरत । दोन पुत्र होत सुमित्रेसी ॥१०॥लक्ष्मण शत्रुघ्न पुत्र तिला झाले । अभिधान केले वसिष्ठाने ॥११॥रावणवधार्थ राघव पातला । विश्वास जाहला त्रिभुवना ॥१२॥धन्य धन्य धन्य धन्य दिन आज । झाला अधोक्षज प्रगट की ॥१३॥विनायक म्हणे प्रसाद करावा । आम्हांसी बरवा दयाघन ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : January 25, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP