मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|गणेश जयंती| गणपतीचा त्रिगुणात्मक भाव गणेश जयंती विषय गिरिजेची प्रार्थना शिवह्रदयी गणपतिभावोद्भव गणेशावतार विघ्नसुरकथा गणपतीचा त्रिगुणात्मक भाव गणपतीचे ध्यान गणपतीचा धांवा गणेश जयंती - गणपतीचा त्रिगुणात्मक भाव श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन गणपतीचा त्रिगुणात्मक भाव Translation - भाषांतर सकळांचा गुरु प्रत्यक्ष परब्रह्म । असे परंधाम गजानन ॥१॥प्रत्यगात्मा तैसा असे परमात्मा । स्वयं ज्योति आत्मा गणपती ॥२॥ज्ञानरुप आहे विश्व नटलासे । सूत्र हालवितसे आपणची ॥३॥गणपती हाच सर्व देवाधिदेव । त्याचा श्रेष्ठ भाव जगत्रयी ॥४॥सच्चिदानंदरुप चैतन्य केवळ । सर्वात प्रबळ सामर्थ्याचा ॥५॥अकार उकार आणि तो मकार । मिळोनी ओंकार रुप जाण ॥६॥तेच रुप आहे जाण गणेशाचे । परब्रह्म साचे नटले हे ॥७॥गजाचे ते मुख प्रणव सदृश । तेच जगदीश धरीतसे ॥८॥मध्ये नारायण बाजूसी विधिशिव । त्रिगुणात्मक भाव ऐसा जाणा ॥९॥ब्रह्माविष्णुशिवमय गणपति । सद्गुरु निश्चिती सकळांच ॥१०॥विनायक म्हणे त्रिगुणात्मक देव । ब्रह्मा विष्णु शिव एकवटले ॥११॥ N/A References : N/A Last Updated : January 21, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP