गीतेची आरती
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
( चाल-आरती ज्ञानराजा )
आरती ज्ञानगंगे । गीरामाते शुभांगे ॥
अष्टादश प्रवाहांनीं । केलें पावन जगातें ॥ आरती० ॥धृ०॥
सप्तशत दिव्य श्लोक । तेचि ज्ञानामृत कुंभ ॥
अनासक्त कर्म, भक्ति । तेंवी योगही अष्टांग ॥ आरती० ॥१॥
वेदार्थ साररुपें । कल्पवृक्षासम ऐसे ॥
दाखवूनि पंथ लोकां । योजियेलें स्व-स्वमार्गे ॥ आरती० ॥२॥
आई, तुज काय वानुं । ज्ञानाची तूं कामधेनु ॥
रोमरोमीं ज्ञान कोंदे । हरि होई अणु-रेणु ॥ आरती० ॥३॥
अखंड ज्ञानदीप । तेववूनि नंदादीप ॥
अभंग-गीतागानें । ’ वासुदेव ’ कृष्णरुप ॥ आरती० ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 17, 2019
TOP