मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसद्गुरुलीलामृत|उत्तरार्ध|अध्याय तेरावा| समास पहिला अध्याय तेरावा समास पहिला समास दुसरा समास तिसरा समास चवथा अध्याय तेरावा - समास पहिला श्रीसद्गुरुलीलामृत Tags : pothisanskritपोथीसंस्कृत समास पहिला Translation - भाषांतर मुखें बोलवी सद्गुरु बुध्दीदाता । अहंभार हा वागवी कोण माथां । जडो भावना रामदासी सदा ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ॥१३॥श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्गुरुचरणारविंदाभ्योनम: । श्रीराम समर्थ ॥ जयजयजी मंगलमूर्ती । जयजय माय सरस्वती । आत्माराम सर्वाभूतीं । नमन करुं साष्टांगें ॥१॥नमो सद्गुरु परेशा । विराट रुपा विश्वेशा । मायबाप प्रकृतिपुरुषा । संतसज्जनां नमन असो ॥२॥धन्य सद्गुरुप्रसाद । केला न वचे अनुवाद । त्रिलोकीं दुर्मिळ मकरंद । गुरुपूत भृंग सेविती ॥३॥पाहोन ही प्रसादगोडी । हरिहरादिक झाली वेडी । घेतां जन्म बहुत कोडी । गुरुप्रसाद दुर्लभ ॥४॥एक्या गुरुप्रसादाकारणें । योगयाग पुनश्वरणें । देहादिममत्व सोडणें दृढविश्वास गुरुवचनीं ॥५॥प्रसाद जयावरी झाला । तो कृतकृत्य होवोनि गेला । जीवशिव भेद मावळला । ठाईचे ठायीं ॥६॥गुरुप्रसाद परमामृत । सदा वांच्छी अमरनाथ । दुर्लभ दुर्मिळ अनंत । सुकृतेंही जोडेना ॥७॥पुण्यपाप क्षय झाला । जीवात्म्याचा गोवा तुटला । तरीच सद्गुरुप्रसादाला । पडेल मिठी ॥८॥जडले ते तन्मय झाले । स्वस्वरुपानंदी रमले । त्यांचे स्मरणें अनेक तरले । धन्यधन्य गुरुकृपा ॥९॥गुरुकृपा होय जयासी । काव्य व्युत्पत्ती नको त्यासी । ज्ञान होय सर्वाशीं । समाधान पूर्णत्वें ॥१०॥नि:संदेह जें विज्ञान । तेंचि गुरुचें कृपादान । वेदशास्त्रां जेथें मौन । तेंचि स्वयें गुरुभक्त ॥११॥अंध पंगु बहिरा मुका । परि श्रींसी सलोखा । तया न गणावा फिका । साधुशिरोमणी ॥१२॥नरदेह सार्थक करावें । ऐसें घेतलें ज्याचे जिवें । तेणें हेंचि एक साधावें । अढळ लक्ष गुरुचरणीं ॥१३॥चित्तशुध्दी मनोजय । फलत्याग वासनाक्षय । शून्यावस्थेवरी विजय । गुरुपूएं मिळविला ॥१४॥श्रवण मनन अभ्यास समाधी । कुंडलिनी जे अमृत शोधी । ब्रह्मांड भेदून निरुपाधी । करी क्षणीं गुरुकृपा ॥१५॥स्थूल सूक्ष्म कारण । महाकारण विराट गहन । हिरण्यगर्भ अव्याकृति जाण । मूल प्रकृति कोश हे ॥१६॥ऐसें हे भ्रमबंधन । तत्काल जाय तुटोन । स्वस्वरुपानुसंधान अखंड । ऐक्य संचलें ॥१७॥ रंकाचा होतो राव । जीवाचा होतो शिव । क्षणामाजी हें अभिनव । सद्गुरुस्वरुप देखिलिया ॥१८॥सद्गुरुवीण जिणें पाही । सर्वथा श्लाप होणें नाहीं । देवभक्तां ऐक्य कांही । प्रसादेवीण होईना ॥१९॥सद्गुरुपदी अनन्य । सर्वभावें जावें शरण । व्हावें दीनाहून दीन । तैं होय गुरुकृपा ॥२०॥सद्गुरुपद शाश्वत । तेथें ठेवितां अखंड चित्त । देहादि ममतां समस्त । गुरुचरणी अर्पाव्या ॥२१॥सद्गुरुकृपेलागून । ब्रह्मांड मानावें हीन । जाणीव नेणीग विसरुन । गुरुवचनीं विश्वास धरावा ॥२२॥तरीच होय गुरुकृपा । तरीच चुकती या खेपा । तरीच प्रकास ज्ञानदीपा । अलक्षीं लक्ष्ह विरेल ॥२३॥ऐसा सद्गुरुप्रसाद । आनंदाचा निजकंद । परा उन्मनीहन शुध्द । विध्द करी वासना ॥२४॥नरदही दक्षता गहन । तयामाजि सन्मार्ग गहन । सन्मार्गी अध्यात्म गहन । त्याहीवरी गुरुकृपा ॥२५॥भाविकां सदा सुफलित । इहपर पुरवी मनोरथ । गुरुकृपेवीण स्वार्थ । आन नेणें ॥२६॥सिध्द साधक महानुभाव । जाणती हा अभिप्राय । ना तरी कलीचा स्वभाव । वाकजल्प विकल्प धरावा ॥२७॥सज्जनांसी युगधर्म । न पीडी संगतकर्म । युगनियंता श्रीराम । सर्वकाळ रक्षितसे ॥२८॥येणेपरी कलियुगांत । अनेक होऊन गेले संत । जगदोध्दार हाचि हेत । धरोनियां अवतरले ॥२९॥तैसी ब्रह्मचैतन्य सद्गुरु । आम्हां अनाथांचे तारूं । तयांचा प्रसाद विस्तारू । लीलाग्रंथीं वर्णिला ॥३०॥निमित्यमात्र लेखक । स्फुर्तिरुप गुरुनायक । ऐसा हा प्रसाद देख । अत्यानंदें सेवावा ॥३१॥स्थलावरी राजसत्ता । स्थूलसूक्ष्मीं गुरुसत्ता । अखंड सुत्रें चालविता । एकला एक अलिप्त ॥३२॥तयांचा दासासी प्रसाद । सद्गुरुलीलाहि विषद । श्रवणमनने शुध्द बोध । घेऊन सन्मार्गे चालावें ॥३३॥संतचरित्र परम गोड । श्रवणें तृप्त वासना ओढ । करोनि देईल श्रध्दा जाड । साधकांसी सुनिश्चयें ॥३४॥नास्तिकांचें बंड मोठें । साधकाने आडवाटे । नरदेही येवोन करंटे । केले कितीएक ॥३५॥तेणे पहावी सद्गुरुलीला । द्वादशाध्याय मंत्रमाळा । कीं हा द्वादशादित्यमेळा । अज्ञानतिमिर घालवी ॥३६॥त्रयोदशी ज्ञानरवी । शीघ्रची होईल गोसावी । श्रवण मननक्रिया बरवी । शुध्दांत:करणें केलिया ॥३७॥कवण अध्यायापासूनी । कवण बोध घ्यावा मनीं । वंदन करोनि श्रीचरणीं । विशद करूं गुरुकृपें ॥३८॥प्रथमाध्यायीं मगलाचरण । गणेश शारदा स्तवन । मग सदगुरुवंदन । साष्टांगभावें ॥३९॥गण नामें इंद्रियें समस्त । तयांचा स्वामी गणनाथ । इंद्रियनिग्रह मूळ हेत । परमार्थ साधी निर्विघ्न ॥४०॥शारदा सुविधा सद्बुध्दी । असलीया परमार्थ साधी । अविद्या वैभवोपाधि । लावून फशी पाडील ॥४१॥इंद्रियनिग्रह करोनि । सद्विद्ये शुध्दि साधोनि । शरण रिघतां गुरुचरणीं । समाधान पूर्णत्वें ॥४२॥आधीं विद्या नाही पढला । आणि राजपायाशीं गेला । देई म्हणें फडणविशीला । तरी तें निरर्थक ॥४३॥आधी विद्या शिकावी । तरी राजा स्वयें बोलवी । तैसे शमदम सुविद्या बरवी । असतां सद्गुरु भेटती ॥४४॥क्षेत्र सोज्वळ तयार झालें । मेघजळीं मातीस आलें । तरी धांवून येती कृषिवलें । ज्ञानबीज रुजवाया ॥४५॥नाशिवंत सांडोन समस्त । शाश्वत घ्यावे सद्गुरुनाथ । येथींचा जो गर्भितार्थ । विवर विवरों उकलावा ॥४६॥गुरुगम्य मायानिरास । गुरुगम्य ज्ञानकळस । गुरुगम्य पूर्ण भक्तिरस । समाधान गुरुकृपा ॥४७॥येथें आशंकेची उरी । पतिता कोण उध्दरी । गुरुभक्ती कैशापरी । करवी तेणें ॥४८॥सद्गुरु शाश्वत । तेथें जावया कोण समर्थ । अंतर्बाह्य विषयें लिप्त । बहुतां जन्मांपासोनि ॥४९॥तयासि होता संतभेटिई । बुध्दी वळील उफराठीं । शमदमादि हातोडी । सुबुध्दी होय मानवा ॥५०॥याकारणें गुरुमुर्तीं । सगुणरुपें अवतरती । दुष्प्राप्य वस्तु आयती । अभाग्याचे घर रिघे ॥५१॥धरितां तयाची कास । हळूहळू साधनास । लावोन मनोवृत्तीस । करिता शुध्द ।५२॥मन बुध्दी विषयें लिप्त । तैशाच कामना उठत । त्याहून अन्य वाटे व्यर्थ । गोडी नुपजे निष्कामीं ॥५३॥स्त्रिया पुत्र आणि धन । जगीं मान्यता सन्मान । देह गेला संरक्षण । इच्छिती हेचि आवडी ॥५४॥तयांच्या पुरवोनि कामना । हळूहळू निष्काम भजना । लावोन करिती समाधाना । सद्गुरु संतसमर्थ ॥५५॥जैसी लेकुरें हटट घेती । बाहुलीस जेवूं घलिती । माय करोन तैशा रीती । अर्भका मुखी ग्रास घाली ॥५६॥ऐसे मानत मानत साधनासी । लावोन चित्तशुध्दीसी । झालिया सद्गुरुकृपेसी । पात्र होय ॥५७॥नूतन वधू गृहीं जातां । ठेवा नये तिचे हातां । सुनीतीनें सेवा करितां । धनीण तेचि असे ॥५८॥तैसे सद्गुरु आणि अज्ञान । भेटलिया होय समाधान । जरी साधनी देह झिजवोन । गुरुवचनी विश्वास धरील ॥५९॥ऐसे सद्गुरुवंदन । तैसेंचि संत सज्जन । परमार्थ मार्गीची शिकवण । प्रत्यक्ष क्रियेनें दाविती ॥६०॥जैसा धूर्त शेजारी । दक्षतेनें व्यवहार करी । संगती शिकती नानापरी । पाहोनिया आपेआप ॥६१॥ऐसें संत सज्जन । तयांचे धरितां चरण । वासना मागें वळोण । रामपायीं जडतसे ॥६२॥इतका साधावया स्वार्थ । देह पाहिजे परम पुनित । मायबापे कारणीभूत । शुध्द बीज रक्षाया ॥६३॥मायेपरी ममता नाही । परि जारीणी घात करिते पाही । विपरित बुध्दी सकलही । विपरीत क्रिया तेलिया ॥६४॥कुलवेली राहिल शुध्द । तरी बुध्दी करील भेद । मायोद्भव संसारखेद । बहुत जन्मजन्मीचा ॥६५॥कुलाचार सांडू नये । उपकारिया विसरूं नये । लीनता धरोनि उपायें । अधर्म मात्र त्यागावे ॥६६॥आतां वंदू श्रोतेजन । जे संतकथा भोक्तेगहन । श्रवणी सुबुध्दि धरोन । शुध्द मानसें बैसले ॥६७॥कोणा मिसें कार्य होणें । बुध्दि वक्तयांसी देणें । पहा धृतराष्ट्राकारणीं । ज्ञानचक्षू संजया ॥६८॥श्रोता मिळालिया सावध । वक्त्या सुचे बुध्दिवाद । श्रोता सुप्त आणि सुंद । असतां उल्हास होइना ॥६९॥श्रोता असावा अर्थभोक्ता । श्रोता असावा शंका घेता । निर्भत्सरीं निरभिमानता । प्रेमळ आणि भाविक ॥७०॥ऐसें हें श्रोतृवंदन । पुढें देशकालवर्णन । उत्पत्तिस्थितीसि कारण । मूळमाया नाथिली ॥७१॥भूतभूतांतें प्रसवें । आपणहि नांदे त्यांसवें । भूतें भूतांसीच खावें । तेथील तेथें विलीण ॥७२॥मूळमाया प्रकृतिपुरुष । पुरुषबिंब परमांश । बिंबध्यानें मायानिरास । करावा बिंबासहित ॥७३॥जेथे जें निर्माण होतें । तेथेंचि तें लीन होतें । मातीस माती मिळते । ऐसें वदती सर्वत्र ॥७४॥तैसें या मायेचें पोटीं । सत्वस्नेहें ज्ञानदिवटी । उजळितां जाळील ही मठी । मूल बापास मारील ॥७५॥व्हावया सात्विक ज्ञान । देशकालादि साधन । सात्विक ज्ञानें समाधान । साच आहे ॥७६॥राक्षसी मानवी आणि दैवी । त्रिविध माया जाणावी । फशीं पाडिते गोसावी । थोरथोर ॥७७॥त्यांत एकचि ज्ञानबिंदू । समूळ आटील भवसिंधू । भक्ती उपासना संबंधू । घडलिया सतत ॥७८॥असो माया कैसी मोहवितें । ज्ञान कैसें जागवितें । हें पहावें जी निरुतें । अवतारमालावर्णनी ॥७९॥एकाची तो ऊर्ध्वगती । एकाची असे अधोगती । हें जाणोनियां श्रोतीं । उचित तेंचि घेत जावें ॥८०॥जरी पाहिजे उत्तम गुण । तरी संतचरित्र हें दर्पण । दाविलें पुढती । अवगुण धुवोनि काढावें ॥८१॥ इति श्रीसद गुरुलीलामृते त्रयोदशोऽध्यायांतर्गत प्रथम समास :। ओवीसंख्या ॥८१॥॥ श्रीसद्गुरुचरणारविंदार्पणमस्तु ॥॥ श्रीराम समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : October 23, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP