मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७७ वा| आरंभ अध्याय ७७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ अध्याय ७७ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरमात्मनें नमः । कपटविटपपाटनपटो । तव पादाब्जीं वृत्ति हे विनटो । गुणगणकथनीं प्रेमा घटो । अघटित विघटो भवभ्रम हा ॥१॥भवभयहरणचरणारविन्द । विज्ञानकिरणीं प्रकाशप्रद । नमिला चित्सूर्य गोविन्द । अगाधबोध अखिलात्मा ॥२॥यावरी गतकथासंबंध । शाल्वामात्या मन्मथा । युद्ध । होतां मन्मथ केला मुग्ध । मूर्च्छा अगाध त्या आली ॥३॥तिये समयीं सारथियानें । रथ परतविला सांडूनि कदनें । मूर्च्छा भांजूनियां प्रद्युम्नें । सूता कारणें निषेधिलें ॥४॥सूतें कथिली धर्मनीती । सारथियानें रक्षिजे रथी । तैसाच रथियानें सारथी । समरक्षिती रक्षावा ॥५॥म्हणोनि अपोवाह रथ । रणा पासूनि करणें उचित । जाणोनि प्रभूतें मूर्च्छित । म्यां तिरोहित रथ केला ॥६॥इतुकें कथिलें पूर्वाध्यायीं । या वरी प्रद्युम्न वीर कायी । करिता झाला तिये समयीं । ते नवायी शुक सांगे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : June 02, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP