मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४४ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ४४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५१ अध्याय ४४ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर हतेषु मल्लवर्येषु विद्रुतेषु च भोजराट् । न्यवारयत्सतूर्याणि वाक्यं चेदमुवाच ह ॥३१॥मल्लयूथप पावलें मरण । इतर पळाले घेऊनि प्राण । विजयी देखोनि रामकृष्ण । उद्विग्न मन कंसाचें ॥६९॥ऐसा समय वर्तला असतां । कंसे दावूनि हस्तसंकेता । प्रेरूनियां निकट दूतां । वाद्यघोश राहविला ॥१७०॥दुंदुभिपटहादि अनेक तुरें । रंगीं गर्जतां विचित्र गजरें । स्वपक्षभंगें आपुल्या करें । कंसें निकरें निवारिलीं ॥७१॥वाद्यघोष राहिले असतां । कंस क्षोभें होय बोलता । तें बोलणें कौरवनाथा । संक्षेपता शुक सांगे ॥७२॥निःसारयत दुर्वृत्तौ वसुदेवात्मजौ पुरात् । धनं हरत गोपानां नंदं बध्नीत दुर्मतिम् ॥३२॥अरे हे वसुदेवाचे कुमर । दुष्ट दुर्वृत्त महाक्रूर । मथुरेबाहीर काढा सत्वर । अन्यायकर दुरात्मे ॥७३॥महाकपटी दुष्ट नंद । लोहनिगडीं बांधोनि पद । यासि करा रे निर्बंध । गुप्तद्वंद्वकारक हा ॥७४॥याचा व्रज लुटूनि आणा । हिरूनि घ्या रे धनगोधना । नागवूनियां गोपगणा । भणगें करूनि सोडा रे ॥१७५॥कैसी नंदाची दुर्मति । मज वधावें कृष्णाहातीं । वसुदेव करावा मथुरापति । आपण क्षिति भोगावी ॥७६॥यास्तव निगडीं कारागारीं । यातें रक्षा बरवे परी । आणिक आज्ञा काय करी । तेही चतुरीं परिसावी ॥७७॥वसुदेवस्तु दुर्मेधा हन्यतामाश्वसत्तमः । उग्रसेनः पिता चापि सानुगः परपक्षगः ॥३३॥सबाह्य निष्कपट दयाळ । सज्जन सत्तम पुण्यशीळ । यांहूनि इतर तो हा कुटिळ । वसुदेव केवळ असत्तम ॥७८॥याची ऐका हो दुर्मेधा । मजसी करूनि साधुवादा । मनीं इच्छी माझिया वधा । युक्ति विविधा कापट्यें ॥७९॥केवढें कैवाड करून । रक्षकांचे वंचूनि नयन । मध्यरात्रीं नगरीहून । व्रजीं नंदन लपविला ॥१८०॥समस्तांसी करूनि चोरी । आणूनि नंदाची कुमारी । आठवी म्हणोनि माझे करीं । देऊनि मैत्री दाखविली ॥८१॥मियां आपटितां ते गगना । गेली वदोनि शत्रुसूचना । निर्मळमनें दोघां जणां । बंदीहूनि सोडिलें ॥८२॥माझें निष्कपट अंतर । सहसा नेणे कुजांतर । यांचा करूनि श्रमपरिहार । स्नेह साचार वाढविला ॥८३॥या तिळासी ऐसें तेल । वसुदेव दुरात्मा केवळ । नेवोनि वधा रे तत्काळ । विलंब अळुमाळ न लावावा ॥८४॥तैसाचि उग्रसेनही पिता । मिळोनि तत्पक्षीं तत्त्वतां । माझ्या इच्छी जीवघाता । धरूनि आस्था राज्याची ॥१८५॥याच्या करूनि शिरच्छेदा । सानुगवर्ग अवघा वधां । द्वितीय आज्ञेच्या अनुवादा । करितां आपदा पावाल ॥८६॥ऐसा निकट दूतांप्रति । क्षोभें आज्ञापी भोजपति । हें ऐकोनि जगत्पति । काय करिता जाहला ॥८७॥एवं विकत्थमाने वे कंसे प्रकुपितोऽव्ययः । लघिम्नोत्पत्य तरसा मंचमुत्तुंगमारुहत् ॥३४॥आयुष्य सरलिला सन्निपातें । जेंवि मुमुर्षु बरळे भलतें । तेंवि या दुरुक्ती कंसातें । वदतां श्रीकांतें परिसोनि ॥८८॥अंतःकरणीं क्षोभ धरिला । समरीं मर्दितां महामल्लां । अव्यय म्हणिजे नाहीं श्रमला । विजयाथिला प्रतापी ॥८९॥लघिमालाघवें उत्पवन । करूनि खगेंद्रासमान । परम उच्च मंचास्थान । नृपासन जे ठायीं ॥१९०॥नावानिगे वीर सावध । शस्त्रास्त्रेंसीं सन्नद्ध बद्ध । भंवते उभे नृपासंनिध । गेला सक्रोध हरि तेथें ॥९१॥तरसा म्हणिजे वेगवत्तर । हिमाद्रीवरी विद्युत्प्रहार । तेंवि सवेग कमलावर । मंचा उच्चतर वळघला ॥९२॥येतां देखोनि जनार्दना । दचक बैसला कंसमना । पुढील कथेच्या निरूपणा । मात्स्यीरमणा शुक सांगे ॥९३॥तमाविशंतमालोक्य मृत्युमात्मन आसनात् । मनस्वी सहसोत्थाय जगृहे सोऽसिचर्मणी ॥३५॥राजा आणि निजासनीं । ऐश्वर्यमंडित वीरकंकणीं । कंस मनस्वी निर्भयपणीं । बोले क्षोभोनि निःशंक ॥९४॥जैसा कुञ्जर मदोन्मत्त । स्वबळें कोणातें न गणित । तंव केसरी अकस्मात । येऊनि बैसत गंडस्थळीं ॥१९५॥तेंवि आपुला जो कां मृत्यु । स्मरोनि नभोवाणीसंकेतु । तो हा आठवा देवकीसुतु । झगटला नधरत आंगेंसीं ॥९६॥त्यातें देखोनि गजबजिला । आसनापासोनि सवेग उठिला । खङ्ग चर्म घेता झाला । रक्षावयाला आपणा ॥९७॥कोश सांडूनि करवाळ । बाळतरणीहूनि तेजाळ । कंस परजी आणि वर्तुळ । अभेद खेटक वामकरें ॥९८॥बंधु आणि पार्षदगण । क्रूर प्रतापी महातीक्ष्ण । समीप असतां कंसावीण । कोणी आंगवण करूं न शके ॥९९॥परम कठिण मृत्युसंधि । समीप असतां आप्तमांदी । कोणा न करवे मोक्षणविधि । नेतां त्रिशुद्धि कृतांता ॥२००॥तैसी पडतां कृष्णमिठी । कंसें खंडा वोडण मुष्टि । पडताळूनियां उठाउठी । उठला संकटीं संग्रामा ॥१॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP