मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १७ वा| श्लोक २० ते २५ अध्याय १७ वा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ८ श्लोक ९ ते १४ श्लोक १५ ते १९ श्लोक २० ते २५ अध्याय १७ वा - श्लोक २० ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २० ते २५ Translation - भाषांतर तां रात्रिं तत्र राजेंद्र क्षुत्तृड्भ्यां श्रमकर्शिताः । ऊषुर्व्रजौकसो गावः कालिंद्या उपकूलतः ॥२०॥मग सांडूनि यमुनातीर । निघालीं आनंदें निर्भर । उपकूल म्हणिजे जवळ ना दूर । तेथ स्थिर जाहलीं ॥८८॥उपकूल यमुनाप्रांतीं । कालियविषा वेगळी स्थिति । विशाळ तृणें वाढलीं होतीं । केली वसति ते स्थळीं ॥८९॥तृणावेगळा निर्मळ ठाय । टाकावया न चलती पाय । क्षुधे तृषेचा लागतां धाय । झाला विलय धृतीचा ॥१९०॥कृष्णवियोगें व्याकुळ । होऊनि धांविन्नले । सकळ । वस्त्रान्नेंवीण विकळ । पुढील सांभाळ तैं कोणा ॥९१॥यालागीं श्रमाच्या दाटल्या निजा । म्हणूनि तृणाच्या करूनि शेजा । निद्रिस्त झाले ऐशिये वोजा । अधोक्षजा कवळूनी ॥९२॥म्हणाल वनफळें आणून । कां ते न करिती क्षुधाहरण । तरी सवेगें झाला अस्तमान । न पुरे अवसान फलग्रहणीं ॥९३॥आणि श्रीकृष्णाचें पाहतां वदन । क्षुधेतृषेची आठवण । निशेःष गेली हारपोन । मनें उन्मन हरिवेधें ॥९४॥ऐशा गाई व्रजौकस । यमुनोपकूलीं निवास । रात्रीं करूनि सावकाश । राया अशेष राहिले ॥१९५॥तदा शुचिवनोद्भूतो दावाग्निः सर्वतो व्रजम् । सुप्तं निशीथ आवृत्य प्रदग्धुमुपचक्रमे ॥२१॥ऐसा निद्रिस्त अवघा व्रज । तंव दावाग्नि तेजःपुंज । ग्रीष्मकाळींचा धूम्रध्वज । महासुतेज प्रज्वळला ॥९६॥शुचि म्हणिजे आषाढमास । ग्रीष्म विशेषें कर्कश । शुष्कतृणें वनहुताश । पवनावेशें माजला ॥९७॥अथवा अशुचिवनोद्भूत । दावाग्नि तो असंस्कृत । परम हिंसक नियमरहित । ऐसा अर्थ घडेल ॥९८॥विशेशः प्रेरिला चंडवातें । अवघीं व्रजौकसें प्रसुप्तें । मध्यरात्रीं वेष्टूनि तेथें । जाळावयातें प्रवर्तला ॥९९॥तत उत्थाय संभ्रांत दह्यमाना व्रजौकसः । कृष्णं ययुस्ते शरणं मायामानुषभीश्वरम् ॥२२॥वणवा झगटी झाडां खोडां । वृक्ष फुटती कडकडां । अग्नि धांवतसे भडभडां । गाई हंबरडा फोडिती ॥२००॥शुष्कें तृणें सलंब सकळ । तेणें गगनीं लागती ज्वाळ । घाबरोनि उठिले सकळ । बाळ गोपाळ व्रजौकस ॥१॥पडला प्रळयाग्नीचा वेढा । मार्ग न फुटे कोणीकडां । गाईगोधना हंबरडा । चहूंकडे आकांत ॥२॥पूर्वश्रमाचि निद्रा डोळां । घाबिरे उठोनि देखती ज्वाळा । म्हणती वरपड जालों काळा । मग गोपाळा आश्रयिती ॥३॥जो काम ईश्वर श्रीभगवान । मायिक नटला मनुष्यपण । त्या कृष्णातें जाती शरण । प्राणरक्षण करावया ॥४॥बल्लवा ऊचु :- कृष्ण कृष्ण महाभाग हे रामामितविक्रम । एष घोरतमो वह्निस्तावकान् ग्रसते हि नः ॥२३॥ऐसें आक्रंदतां गोप । दैवें स्मरला प्रकाशदीप । गर्गमुनीचा भविष्यकल्प । सुगम सकृप हरि सुचला ॥२०५॥जो हा नंदाचा नंदन । तोचि प्रत्यक्ष श्रीभगवान । त्यासि अवघे होऊनि शरण । दावाग्निशमन वांछिती ॥६॥महायोगियांचा राजा । ऐकें कृष्णा अधोक्षजा । आम्ही व्रजौकसें तुझिया प्रजा । धूम्रध्वजा सांपडलों ॥७॥अगा स्वामी संकर्षणा । अमितविक्रमा पृथ्वीधरणा । आमुचे प्रवर्तें संरक्षणा । घोर कृशानें ग्रासितां ॥८॥घोराहूनि घोरतम । प्रचंडप्रलयपावक हा विषम । करूं पाहे आमुचा होम । याचा उपशम तूं करीं ॥९॥वणवा जाळील तावकांतें । तैसें न घडावें उपरतें । यास्तव रक्षीं शरणागतें । स्नेहें अंकितें आपुएलें ॥२१०॥सुदुस्तरान्नः स्वान्पाहि कालाग्नेः सुहृदः प्रभो । न शक्नुमस्तवच्चरणं संत्यक्तुमकुतोभयम् ॥२४॥मृत्युरूप हा कृष्णवर्त्मा । यापासूनि रक्षीं आम्हां । निजशरणागतें पुरुषोत्तमा । न करीं दुर्गमा वरपडें ॥११॥दुःखें तरूं न शकती कोणी । स्थावर जंगम समस्त प्राणी । कालरूप हा दावाग्नि । सुहृद यांतुनि वांचवीं ॥१२॥दुस्तराहूनि दुस्तर घोर । त्यातें म्हणावें सुदुस्तर । प्रभु प्रभुत्वें तत्परपार । स्वकीय समग्र पाववीं ॥१३॥आम्ही न घेवों मृत्युभेवे । परी चरणवियोग न साहवे । यालागीं कृपेनें आघवें । स्वकीय रक्षावे विभुत्वें ॥१४॥स्वामी तुझें चरणारविंद । सच्चित्सुखांकुराचा कंद । सर्वदा निर्भय निर्द्वंद्व । अगाधसिंधु स्वसुखाचा ॥२१५॥आमुचे हृदयीं त्याचें स्मरण । आणि ओपी जैं दुर्मरण । हें कोणतें न्यून पूर्ण । तें तूं सर्वज्ञ जाणसी ॥१६॥इत्थं स्वजनवैक्लव्यं निरीक्ष्य जगदीश्वरः । तमग्निमपिबत्तीव्रमनंतोऽनंतशक्तिधृक् ॥२५॥ऐसे दावाग्निग्रस्त स्वजन । त्यांचें देखोनि विकळपण । अचिंत्यैश्वर्य श्रीभगवान । जगज्जीवन जगदीश ॥१७॥अनंतशक्तीचा धर्ता । ऐसा अनंत निजात्मसत्ता । झाला दावानळा प्राशिता । शरणागतां रक्षोनी ॥१८॥दावाग्नि जो कां परमतीव्र । त्यातें प्याला नंदकुमार । परीक्षितीतें समाचार । शुकें समग्र हा कथिला ॥१९॥श्रीमद्भागवतीं हे कथा । दशमस्कंधीं मात्स्यीसुता । शुकें कथिलीं तैशी श्रोतां । परिसोनि दुरिता नाशावें ॥२२०॥श्रीमदेकनाथान्वयीं । चिदानंदें स्वानंदगेहीं । गोविंदसद्गुरुशेषशायी । दयार्णवहृदयीं जलशयन ॥२१॥त्याचिया पादोदकाचे यात्रे । हरिहरब्रह्मादि प्राणिमात्रें । येऊनि करिती अमळ स्तोत्रें । पुण्यचरित्रें वर्णिती ॥२२॥तया श्रवणसुखामृतपाना । अधिकार कैसा असुरां जनां । तें एक लाहणें चरणशरणा । कीं सज्जनां सत्पुरुषां ॥२३॥कालियाचा दुर्मद हरिला । वरे स्वस्थाना धाडिला । जळतां स्वजन वांचविला । चंडदावाग्नि प्राशूनी ॥२४॥इतुकेनि संपला सप्तदश । अष्टादशीं श्रोतयांस । निरूपिजेल जो इतिहास । तो समास अवधारा ॥२२५॥अष्टादशीं ग्रीष्मऋतु । वसंतगुणें उपलक्षितु । आणि प्रलंबाचा धातु । करवी अनंत बळहस्तें ॥२६॥दयार्णवाची वरदवाणी । सर्वव्यापी चक्रपाणि । भाऊनि भगवत्कथाह्स्रवणीं । आळस कोणीं न करावा ॥२७॥( कृष्णें प्राशिला वडवानळ । त्या श्रवणाशीं मन आकळ । होता भव नाशिला समूळ । त्र्यंबकरायें एकदाची ॥२८॥ )इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीपरिक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कालियनिर्यापणं दावाग्निप्राशनं नाम सप्तदशोऽध्यायः ॥१७॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥२५॥ टीकाओव्या ॥२२७॥ एवंसंख्या ॥२५२॥ श्रीगुरुशिवाय नमः ॥ ( सतरावा अध्याय मिळून ओवीसंख्या १००६९ )सतरावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP