प्रवेश दुसरा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : पूर्वीचे. भाऊराव, बाळासाहेब, व शंकरराव मोठ्या वीरथीने जेहेत्ते खेळत आहेत ]
बाळासाहेब : काय रे थेरड्या ! किती मार्क पाहिजेत तुला ?
भाऊराव : ( शंकररावाच्या मार्करकडे पहात ) सारे एकशे वीस पाहिजेत.
बाळासाहेब : झाले ! मग काहीच नाही.
शंकरराव : दहा हजारांची गेम, पण आपण हाणली की शेवटी !
( इतक्यात ‘ भाऊराव ’ अशी हाक ऐकू येते. )
भाऊराव : या हो. ( एक दोन हात खेळून होतात. )
शंकरराव : हे ऐंशी, अन् हे गुलामांचे चाळीस ! खलास !
( जिन्यात जोराने पाय वाजवीत जोशीमास्तर आत येतात. )
भाऊराव : काय कुठे गेला होता ?
जोशीमस्तर : इथून शाळेत व्याख्यानाला गेलो. ते ऐकले. अन् एक दोन कामे करायची होती. तीही करून आलो.
शंकरराव : म्हणजे वाजले किती ? ( घड्याळाकडे पाहून ) अरे ! सव्वा आठ झाले ! भाऊराव, जोशीमास्तर व्याख्यानाला जाऊन आले ? काय जोशीमास्तराच्या देवाने बोर्‍या उडवलारे आपला ! ऑं ! ( भाऊराव व बाळासाहेब हसू लागतात ) अन् आपण तिघे खेळलो की रे ! बैल आहोत बैल लेक हो ! बायकांसारखे खेळलात् ! धोपट्या घेऊन करा हजामती ! उठा ! काय सोळा आणे उडाली रे आपली ! ( चौघेही मोठमोठ्याने हसू लागतात. )

६ सप्टेंबर १९२६
अप्रकाशित

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP