प्रवेश सहावा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ गणपतराव घाबरुन व घामाघूम होऊन ’ राम!’ असे म्हणून बिछान्यावर चट्कन् उठून बसतो. ]

गणपतराव : हुश्श ! किती विलक्षण स्वप्न ! ( थांबून ) पण ते स्वप्नच होते, हे किती चांगले झाले ! नाहीतर तेच खरे असते - ( थांबून ) पण खरोखरच मी जागा झालो आहे ना ? नाहीतर  - ( आसपास नीट दोन तीन वेळा पाहून ) उठाच आता. त्याशिवाय नाही खात्री व्हायची, ( इतक्यात कोणीतरी कोमल आवाजाने ’ राम आकाशी पाताळी ! राम नांदे भूमंडळी ॥’ म्हणत असल्याचे ऐकू येते ) अहाहा ! ( उठून पलीकडील खिडकी उघडतो, तोच अरुणोदयाचा प्रकाश त्याच्या तोंडावर व सर्वांगावर पडतो. क्षणभर पहात उभा राहतो, इतक्यात घणघण घणघण असा घंटानाद ऐकू येतो. ’ राम नित्य निरंतरी । राम - सबाह्य - अभ्यंतरी ॥’ असे पुन: भूपाळीचे कर्णमधुर शब्द ऐकू येतात. ) खरे आहे ! ( थांबून ) मघाचे ते स्वप्नच, आणि हे देऊळ - हे शिखर - हे आकाश किती पवित्र ! ( डोळे मिटतो. तोच डोळ्यांतून अश्रुधारा येतात ) छातीत कसे धडधडते आहे ! ( डोळे पुसू लागतो. ) पण हे परमेश्वराचे धडधडणे, ( पुन: डोळे भरुन येतात. ) आणि हे अश्रु ?


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP