स्त्रीशिक्षा - बायकांनीं म्हणावयाचें गीत
श्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.
( चाल - रामाची सीता फलपुष्प )
प्रश्न :- अग तूं अससी कुणाचि कोण गे बोल जासि कुठें अबले । इथं आलिस कोठुनि भले ॥
मायबाप भादलें कोण तुझा पति आपलें ॥ जात गोत तुवां जाणिलें असलें तरी तें बोले ॥
तुवां काय कृत्य योजिलें ॥ आजपावत काय काय केलें ॥ तुज असें पुसिलें ॥
उत्तरsदें हें चांगलें ॥ नातरी पुढें चाले दत्तदास येथें बैसलें ॥
( चाल - माझे हातीची मुद्रिका )
उपदेश :- तुझें हित मीग बोलें ऐक । जेणें पावसि इहपर सुख । सत्यसत्यचि घेग भाक । न करीं बाहेर ठाकठीक ॥१॥
रूप लावण्य सौंदर्य । असतां आंगि माधुर्य । देखें जातां नभिंहि सूर्य । होईल तो गतिवीर्य ॥२॥
वृंदा निजधर्माहुनि मुकली । अहल्या साध्वी ही शिला झाली । लंकाधीशें सीता नेली ॥ ब्राह्मी जनकें पळविली ॥३॥
तेव्हां बाहेर तूं होई । भूतराहीं अंतरीं ॥ साधनयुता तोषवि धर्में तुं निजकांत ॥ तेणें तारील तुज दत्त ॥४॥
पद
बाई सांभाळी आपुला हरी ॥ बाई सत्पदरज माखि आतां ॥धृ०॥ बाळपणी त्वां उपयम केला । परी शास्त्रा न तो मानला ॥ तरी त्यजीं महामोहभर्त्याला ॥बाई०॥१॥ कंठी असुरभाव तंतु हा धरिला तो अशिवचि पहा टांकी तोडुनि न विचारी ॥अहा बा०॥२॥
त्रिगुणात्मक गांठ पल्लविं कुणि बांधिलि सोडि ती हवी जरी पूर्णसुखाची पैरवी ॥बाई०॥३॥
आतां प्रवृत्ती कुंकुम फांस । धरी निवृत्ती तीलकाचि आस । लाधे तरीच तुज मुक्तीरपासा । परपुरुष नवरा करीं । सुमन रोजीं रति घे बरी ॥ मग उन्मनी झोंप घे बुरी ॥बा०॥४॥
आपणा तूं म्हणवि न रजस्वला । अथवा तूं म्हणविग पांसुला । परी होसि प्रिय न हरिला ॥बाई०॥५॥
साध्वीधर्म पद
( चाल - पार्वती पूसे महादेवासी )
आतां करुनि एकाग्रता परिसा साध्वी धर्मा । एका भावें तो आचरितां तुम्हां देईल शर्मा ।
नर्मा जोडुनि कर्मा उलंडुनि स्वरुपीं रहाल डसुनि ॥ ऐके हो साजणी ॥धृ०॥१॥
दो नवर्या जी भजे नारी ती ह्या लोकीं असती । इह लोकीं ती घेई अकीर्ति मेल्यावर दुर्गति ।
जे जे पहाती ते ते म्हणती छि थु मरो ही असती ॥ऐका०॥२॥
मरतां असतील बांधुनि नेती यमदूत देउनि मारा । मारा भजलि म्हणुनि न थारा कोण न देती पितरां ।
घेउनि संगे पूर्वाsपरो नरकीं पडे अवधारा ॥ऐका०॥३॥
साधुगुरूची हो तूं कन्या मग तूं होसिल साध्वी । मृदू मनाची सिंधुदयेची होउनि वाणी माध्वी ।
बोल बाई मोल कांहीं तुझे मग नोहें साध्वी ॥ऐका०॥४॥
संसार सासुरा तुज नेदी थारा आतां वळ माघारा । सद्विचार माहेरघरा भीमभाड सोडुनि परा ।
पुरुषासंगे धिंगडा घाली त्याहुनि नाणी मनि दुसरा ॥ऐका०॥५॥
काया वाचा मनें करुनि परपुरुषा तूं भोगि । आठ प्रकारें संशय सोडुनि होशिल मग तूं वेगीं ।
धन्य जाण मान्य बाई जेवीं या जगीं योगी ॥ऐका०॥६॥
मायावरण लुगडीं फेडीं त्रिगुणवेणी सोडी । पापपुण्य सूत्र तोडी घे चवघांत उडी ।
कांतपदाची गोडी न दवडी आवडी आन बाई खंडी ॥ऐका०॥७॥
परावरतु देखसी जरी तरी हृदयग्रंथी तुटती । तेव्हांच जे माये सकळहि संशयघट फुटती ।
ऐशा धर्में लपतिल कर्में दत्तोsप्यभितस्ते ह्मटति ॥ऐका०॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 23, 2016
TOP