संगीत मृच्छकटिक - प्रस्तावना
नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’
मृच्छकटिक हे दोन हजार वर्षापूर्वी लिहिलेले संस्कृत नाटक असून देवलांनी याचे मराठी भाषांतर केले.
नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’शकरा’ ची भूमिका ’शिवराम’ ह्या नांवाचा नट करीत असे. त्याच्या इतकी चांगली शकराची भूमिका नंतर कोणीही केली नाही असें स्वत: देवल म्हणत. हा शिवराम जेव्हां पाटणकर संगीत मंडळीत गेला तेव्हापासून ती मंडळी ’ मृच्छकटिक’ नाटकाचे प्रयोग करुं लागली.
किर्लोस्कर संगीत मंडळीनें ’मृच्छकटिक’ नाटकाचे प्रयोग सन १८९५ सालापासून सुरु केले. भाऊराव कोल्हटकर ( भावड्या ) चारुदत्ताची, कृष्णराव गोरे वसंतसेनेची आणि शंकरराव मुजुमदार शकराची भूमिका करीत.भाऊरावांच्या मृत्युनंतर नारायण दत्तोत्रय जागळेकर चारुदत्ताची भूमिका करीत. कृष्णराव गोरे कंपनींतून गेल्यानंतर वसंतसेनेची भूमिका बालगंधर्व करुं लागले.
ललितकलोत्सव मंडळीनें केलेल्या प्रयोगापासून यंदा पाऊणशें वर्षे पुरीं झालीं, ह्या दृष्टीनें प्रस्तुतची ही बारावी आवृत्ति प्रसिध्द करतांना आम्ही एकप्रकारें नाटकाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहों असें वाटते. ही संधि लाभल्याबद्दल आम्ही परमेश्वराचे ऋणी आहोंत.
पहिल्या प्रयोगांतील प्रमुख भूमिका -
चारुदत्त-रामभाऊ वेरुळकर
वसंतसेना-बापूराव पेठे
शकरा-शिवरामपंत जोशी
मैत्रेय-बापूराव केळकर
शर्विलक-श्रीपादराव फडके
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP