दैवतविचार:

प्रस्तुत ग्रंथात मंत्र, व्याख्यान, मराठी अर्थ आणि मंत्रविधान एकत्र मिळाल्याने जिज्ञासूंची तृप्ती पूर्ण होईल असा विश्वास आहे.


या वचनांत सर्व मंत्राची देवता श्री व अग्नि आहे असें सामान्य असलें तरी
‘आद्याया: श्रीरग्नि: तत: सर्वासां श्रीरेव’ हा मंत्रकोशोक्त विशेष लक्षांत
घ्यावा. ‘अग्निरत्र भगवान्‌ रुद्र:’ येथे अग्निशब्दानें ऐश्वर्यद रुद्र ही देवता
उक्त आहे असें श्रीकण्ठ भाष्यकार लिहितो. पण ‘अग्निरत्र भगवान्‌ नारायण
उच्यते’ असें गीर्वाणेंद्रींत म्हटलें आहे. अग्नि ही देवता उदकांत राहणारी -
‘अग्निं या गर्भं दधिरे विरूपा:’ - असल्यानें अग्निपदवाच्य नारायण घ्यावा.
अर्थात या सूक्ताची लक्ष्मीनारायण देवता असा गीर्वाणेंद्रीकाराचा आशय आहे.
प्रथम ऋक्स्थ ‘जातवेदस्‌’ या पदाचा ‘शास्त्रयोनि: भगवान्‌ नारायण:’ असा अर्थ
शतानंदवृत्तिकारानें केला आहे. म्हणजे त्याचेही मतानें नारायण ही देवता स्पष्ट
होते. पायगुंडे म्हणतात : वस्तुतस्तु एतत्सूक्तदेवतात्वात नारायणस्य तत्पदवाच्यस्य
प्रार्थनेति । - म्हणजे तत्पदवाच्य नारायण देवतेची ही प्रार्थना आहे. मीमांसान्यायाप्रमाणें
लक्ष्मीप्रीत्यर्थ सूक्तविनियोग कर्तव्य असतां सूक्तस्य श्रीदेवता असाच ऊह
करणें न्याय्य आहे. अत एव - राघवभट्टयां तदन्यत्र ‘देवता श्री: प्रकीर्तिता ।
श्रीरेव वा देवता वै मतभेदात प्रकीर्तिता’ इत्यादय उक्तय: संगच्छन्ते । इत्यलम्‌ ।

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP